पोस्ट्स

◾कविता :- उजळू दे गं पणती...

इमेज
              उजळू दे गं पणती              दोन हात‌ जोडूनी करते आई विनंती, येऊ दे या जगात उजळू दे गं पणती ." धृ " तुझ्या गर्भातूनी गे जन्म घ्यायचाहे मला, सार्थक माझ्या जन्माचे दिसणाराहे तुला असायलाच हवी तुम्हा दोघांची अनुमती!!१!! येऊ दे या जगात उजळू दे गं पणती.... छान शिक्षण घेईन जन्मा आल्यानंतर, मिटेल मुलामुलीतील भेदाचे अंतर, नाही कोणते मागणे ना अपेक्षा कोणती!!२!! येऊ दे या जगात उजळू दे गं पणती.... प्रगतीच्या भरारीने नसे,हुंड्याचा भार, मुलीच्या अभावी जगा,आई कशी मिळणार? अंकुरा कुस्ककरणाऱ्यांची वाढताहे गिणती!!३!! येऊ दे या जगात उजळू दे गं पणती... जिजाऊ अहिल्या सावित्रीचा मला दे वारसा, दाविन मी जगाला बाबांसह तुझा आरसा, हसू बागळू खेळू दे तुमच्या गे संगती!!४!! येऊ दे या जगात उजळू दे गं पणती.... कु.दिपाली निरंजन मारोटकर रा.पळसखेड,ता.चांदूर(रेल्वे),जि.अमरावती ➖➖➖➖◾➖➖➖➖◾➖➖➖➖ टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }  सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

◾विशेष लेख :- इच्छा तिथं मार्ग...

इमेज
मनाचा निश्चय केला की, व्यक्ती आपले ध्येय निश्चितपणे गाठू शकते. फक्त गरज असते ती प्रबळ इच्छाशक्तीची! जगात कोठेही असलात तरी एकदा तुमच्या मनाने ठरवले, तर तुम्ही तुमचा हेतू सहज साध्य करू शकता.  यश प्राप्त करण्यासाठी यशाची तीव्र ओढ असावी लागते. हृदयापासून काही करायचे ठरवले आणि ते पूर्ण करण्याची ज्वलंत इच्छा असली, तर ठरविलेले कार्य निश्चित पूर्ण होऊ शकते. प्रबळ इच्छाशक्तीमुळे आत्मविश्वास बळावतो, निर्णयक्षमता वाढते, उत्साह निर्माण होतो; तसेच ध्येय गाठण्यासाठी गतिशीलता आणि कृतिशीलता दोन्हींमध्ये आवश्यक असणारा समन्वयही निर्माण होतो. एकदा एका तरुणाने महान विचारवंत सॉक्रेटिस यांना विचारले,  ‘‘सर, आपण आयुष्यात इतके यशस्वी झाला आहात म्हणून मी आपल्याकडे यशाचे रहस्य जाणून घेण्यासाठी आलो आहे.’’ तरुणाची जिज्ञासा पाहून त्यांनी त्याला दुसऱ्या दिवशी गावातील नदीकाठी भेटायला बोलविले. अगोदर ठरल्याप्रमाणे ते दोघे नदीच्या काठावर भेटले. सॉक्रेटिस यांनी तरुणाला आपल्याबरोबर नदीकडे चालायला सांगितले. असे करीत करीत ते नदीच्या पात्रातून चालू लागले. खांद्यापर्यंत पाण्यात गेल्यावर सॉक्रेटिसनी अचानक त्या तरुणाचे

◾बोधकथा :- अति कोपता कार्य जाई लयाला

इमेज
"राग" ही एक भयानक विकृती माणसाच्या अंगी असते.अती राग केल्याने माणसाची विचार करण्याची प्रवृत्ती खुंडते.आयुष्य बरबाद होते.कितीतरी आयुष्य उद्वस्त झाले या रागामुळे. रागामुळे इतरांचे नुकसान करता करता स्वतः चे ही नुकसान करून घेतो जीवन आनंदी व यशस्वी जगायचे असेल तर"राग छू मंतर करावे" लागते. रागाचे खूप सारे दुष्परिणाम आपल्या आयुष्यात दिसून येते.       आटपाट नगर होतं तिथं राम आणि शाम नावाचे छान मित्र होते . त्यांची मैत्री खूपच घट्ट होती. राम, शाम एकत्र राहायचे , एकत्र शिकायचे , एकत्र खेळायचे . दोघांनाही संगीत शिकण्यात रस होता . एका महान गुरू कडे संगीत शिकायचे. राम अतिशय सुस्वभावी , शांत, मेहनती मुलगा .त्याच्या प्रत्येक गाण्याचे कौतुकच होत असे. आणि हेच कौतुक श्यामला खुपत असे.  जुगलबंदी स्पर्धा चालायची तेंव्हा प्रत्येक वेळेला राम अव्वल नंबर असायचा. मित्रच ते पण पराभवाने शाम रामचा तिरस्कार करू लागला.राग आणि द्वेष श्यामच्या प्रगती मध्ये अडथळा करत असे. गाण्यातल्या हरकती सराव कमी करू लागला आणि त्याला कसे मागे टाकता येईल याचाच विचार करू लागला. अति रागाने शाम राम बद्दल कधीच चांगला व

◾जीवन मंत्र :- हे क्षण ही निघून जातील !

इमेज
      एका राजाला जीवनाविषयी अपार कुतूहल होते. त्याच्या दरबारात येणाऱ्या प्रत्येक साधू , संत, फकिराला तो विचारत असे की मला एक असा छोटा मंत्र द्या की तो अगदी कुठल्याही क्षणाला मला उपयोगी पडेल व मला कायम आनंदी ठेवेल.          अखेर एका बौद्ध भिक्षुने त्याला एक अंगठी दिली व सांगितले की यातील डबीत एका कागदावर मंत्र लिहिलेला आहे, पण जेव्हा जीवन-मरण असा प्रश्न तुझ्यापुढे उभा राहील तेव्हाच डबी उघड, तेव्हाच मंत्र कामाला येईल.          बरीच वर्षे शांत गेल्यावर राजाचे दिवस फिरले. राज्यात बंडाळी झाली व त्याच्याच दुष्ट व  कपटी प्रधानाने त्याला तुरुंगात टाकले. पहाटेला फाशी द्यायचे ठरले.         विश्वासू सेवकाने राजाला रात्री सोडवून, एक घोडा बरोबर दिला. मजल दरमजल करीत राजा सीमेपासून दूर पळाला.     हे समजल्यावर प्रधानाने सैनिकांची तुकडी राजाच्या मागावर पाठवली. राजा एका डोंगराच्या शिखरापर्यंत पोहोचला. पुढे दरी होती. घोड्याला चरायला सोडून, मोठ्या खडकाआड लपला. त्याला वाटले आता थोड्या वेळात सैनिक गाठणार व आपण मरणार.  त्या क्षणी त्याला त्या अंगठीची आठवण आली अन् ती त्याने उघडली. त्यात एकच वाक्य लिहिले

◾बोधकथा :- संवेदना... | bodhkatha | yashacha mantra

इमेज
नेहमीप्रमाणे माझं लिखाण सुरू होतं... बाई सुद्धा तिचं काम मन लावून काम करत होती...फरशी वर तिचं फडकं एका लयीत फिरत होतं...प्रत्येक खोली पुसताना फॅन फुल्ल करण्याची तिची सवय...त्यामुळे फरशी वरचा तिचा प्रत्येक फरांटा पट्कन वाळत होता....फरशी पुसताना तिची बडबड सुरू होती..... कोण गावाला गेलं होतं म्हणून तिला दोन कामांना सुट्टी मिळाली होती ते आनंदानं सांगत होती आणि दुसरीकडे वैतागून म्हणाली..ताई, ती तिसऱ्या माळ्यावरची आहे ना तिची नणंद आलीये.. तिच्याबरोबर तिच्या दोन पोरी पण आल्यात...नुसता पसारा घालतात.. एकेक भांड धुवायला टाकतात...इतकंच नाही तर ती टवळी येताना तिचा पोपट पण घेऊन आलीये..मलाच धुवायला लागतो तो पिंजरा रोज...ती बसते त्याला मांडीत घेऊन..तिचं बोलणं ऐकून मला हसायला आलं....त्या मालकीणी पेक्षा हीच तिच्या नणंदेवर जास्त कावल्यासारखी वाटली....मी ऐकतेय की नाही याच्याशी तिला काहीही घेणं-देणं नव्हतं...ती फक्त घडाघडा मनातला राग बाहेर काढत होती.. गॅलरीतल्या ग्रील वरच्या सावलीत चिमण्या आणि साळुंक्या रोजच्या सारख्याच कुंडयांमध्ये बागडत होत्या...बंद काचेवर चोच मारत होत्या...त्यांनाही आज बाईंनं हुसकावून

◾बोधकथा :- सदाचरण | bodhkatha | yashacha mantra

इमेज
फार वर्षापूर्वी वाराणसी येथे देवमित्र नावाचे राजपुरोहित राहत होते. राजाला राजपुरोहितांच्या विद्वत्तेचा व योग्येतेचा यथायोग्य आदर होता म्हणूनच तो त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकत असे. प्रजेमध्ये सुद्धा राजपुरोहितांबद्दल सन्मानपूर्वक आदर होता.  एक दिवस राजपुरोहितांना वाटले की... राजा आणि इतर सर्व प्रजा आपल्याला इतके  आदरपूर्वक का वागवतात... ? याचे कारण जाणून घेण्यासाठी राजपुरोहितांनी  एक गुप्त योजना बनविली.  दुस-या दिवशी त्यांनी दरबारातून परतताना राजाच्या खजिन्यातून एक सुवर्णमुद्रा गुपचुप उचलून घेतली. हे खजिनदाराने पाहिले पण ते पाहून त्याने न पाहिल्या सारखे केले. हा प्रकार परत दुस-या दिवशीही घडला. राजपुरोहितांनी पुन्हा दुस-या दिवशी हळूच एक सुवर्णमुद्रा उचलली व स्वत:जवळ ठेवली. तिस-या दिवशी त्यांनी एक मुठभर सुवर्णमुद्रा उचलल्या व खिशात भरल्या. यावेळी मात्र खजिनदाराने सैनिकांना बोलावले व राजपुरोहितांना कैद करण्यास सांगितले.  राजपुरोहितांना कैद झाली ही गोष्ट राजाच्या‍ कानावर गेली. न्यायदान करताना राजाने आपला निर्णय दिला की राजपुरोहितांकडून  घडलेल्याु या चुकीबद्दल त्यांना तीन महिने सक्त कारावासाची

◾बोधकथा :- तृप्तता... | bodhkatha | yashacha mantra

इमेज
प्राचीन काळी एका देशात एक राजा राज्‍य करत होता. त्‍याचा असा एक नियम होता की... जोपर्यंत तो संन्‍याशांना दान करीत नाही तोपर्यंत तो भोजन ग्रहण करत नसे.  एके दिवशी दानासाठी निश्र्चित केलेल्या वेळेच्‍याआधीच एक संन्‍याशीबुवा आपल्‍या हातात एक छोटेसे भिक्षापात्र घेऊन राजवाड्याच्‍या द्वाराशी हजर झाले. राजाला हे पाहून आश्र्चर्य वाटले.  संन्‍याशाने राजाला पाहिले व तो म्‍हणाला, '' हे राजन, जर तुम्‍हाला शक्‍य असेल तर माझ्या या छोट्याशा भिक्षापात्रात काही ना काही दान टाका.''  राजाला त्‍याच्‍या बोलण्‍याचा रागही आला आणि आश्चर्यही वाटले. राग यासाठी की... राजाला तो तुम्‍हाला शक्‍य नाही असे सुचवित होता आणि भिक्षापात्राचा आकार खूपच लहान होता याचे आश्चर्य वाटले. राजाने आपल्‍या सेवकांना आज्ञा केली की या भिक्षुकाचे लहानसे भिक्षापात्र आताच्‍या आता सोन्याच्‍या मोहोरांनी भरून टाकावे व सन्‍मानाने याचकाची बोळवणी करावी. सेवकांनी पहिल्‍यांदा ताट भरून सोन्‍याच्‍या मोहोरा आणल्‍या आणि भिक्षापात्रात टाकल्‍या पण भिक्षापात्र मात्र मोकळेच. परत परत सेवक ताटे भरून सोन्‍याच्‍या मोहोरा आणत होते पण भिक्षापात्र

◾थोडं मनातलं :- आयुष्य खुप सुंदर आहे...

इमेज
गरम गरम भुईमुगाच्या शेंगाची कढई समोर आणुन ठेवतो. कढईभोवती बसुन शेंगा फोडुन खायला सुरवात करतो. अशातच शेंगा फोडत असताना एखाद्या शेंगेतील शेंगदाणा हातातुन खाली पडतो आणि खालच्या टरफलांमध्ये गायब होतो. आपण मग तो बोटाने शोधायला सुरवात करतो.अगदी अर्धा ते एक मिनिटाची ही क्रिया पण शेजारी कढईभर शेंगा असुनही त्या एका शेंगदाण्याला आपण शोधत बसतो, थोडेसे तरी वैतागतो. या नादात जवळ बसलेली व्यक्ती शेंगा जास्त संपवते. आयुष्याचे देखील असेच आहे का? पाटीभर आनंद शेजारी असुनही, आपण वाटीभर आनंदासाठी झुरतो. पाटीकडे लवकर कधी लक्ष जातच नाही आणि जेव्हा पाटीकडे वळतो तेव्हा ती रिकामी झाल्याचे दिसुन येते.  आयुष्य खुप सुंदर आहे त्याला अनुभवत गेलेल्या क्षणासाठी झुरत बसण्यापेक्षा समोर असलेलं आयुष्य भरभरून जगा....   ______________________________________ टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

◾जीवन मंत्र :- बुध्दांच्या म्हणण्यानुसार या जगात चार प्रकारचे लाेकं असतात

इमेज
सौजन्य  thespiritofzindagi.com प्रा.विद्यार्थी मित्र रफिक शेख  परभणी बुध्दांच्या म्हणण्यानुसार या जगात चार प्रकारचे लाेकं असतात अंधारातुन अंधाराकडे जाणारे अंधारातून प्रकाशाकडे जाणारे प्रकाशाकडून अंधाराकडे जाणारे प्रकाशातून प्रकाशाकडे जाणारे १ .अंधारातून अंधाराकडे जाणारे ➖अशा व्यक्ती ज्यांच्या जीवनात अंधकार आणि फक्त अंधकारच आहे. म्हणजे त्याच्या जीवनात गरीबी आहे,चिंताआहे,व्याकुळता आहे,सर्वत्र परेशानी आहे.म्हणुन अशा व्यक्तीमध्ये क्रोध आणि द्वेष उत्पन्न होत असतो.आणि ती व्यक्ती त्याच्या दु:खाचा दोष नेहेमीच दुस-याला देतअसतो. मनातल्या मनात दुस-याला जबाबदार धरत असतो, नेहेमीच दुस-याला शिव्या देत असतो व दु:खाला विसरण्यासाठी सतत नशापान करतो. असा व्यक्ती आज म्हणजे वर्तमानात तर दु:खी असतोच भविष्यासाठी दु:खाचे बीज पेरत असतो म्हणजेच अंधारातुन अंधाराकडे तो जात असतो. २ .अंधारातुन प्रकाशाकडे ➖ अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये अंधार आहे परंतु मनात प्रज्ञा जागृत होत आहे.तो असा विचार करतो की,हे जे काही माझ्या बरोबर होत आहे हे माझ्या दुष्कर्मामुळे होत आहे,मग मी दुस-याला दोष का देऊ?ते तर माध्यम असतात.जो आपले स्वत:

◾बोधकथा :- जपानी मानसाची राष्ट्रनिष्ठा... | मिखाईल गोर्बाचेव्ह

इमेज
_____________________________ मिखाईल गोर्बाचेव्ह हे रशिया चे एके काळचे प्रेसिडेंट होते.. त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात सांगितलेली एक  गोष्ट शेअर  करत आहे.. दुसऱ्या महायद्धानंतर च्या काळात ते इंग्लंड येथे शिकत होते.. तेव्हा त्यांच्या बरोबर दोन जापनीज विद्यार्थी पण शिकायला होते.. युध्दात जपान चे अतोनात नुकसान झाले होते.. आणि अनेक निर्बंध पण त्यांच्या वर लाधले गेले होते..  त्या दरम्यान.. दोन जापनीज विद्यार्थी जेव्हा नोट्स काढायचे तेव्हा ते जपान मेड निकृष्ट क्वालिटी ची पेन्सिल वापरायचे.. आणि त्या पेन्सिल चे टोक नोट्स काढता काढता अनेकदा तुटायचे.. त्या मुळे एक विद्यार्थी नोट्स लिहीत असे.. आणि दुसरा सतत पेन्सिल शार्प करत असे.. बरोबर शिकणारे अनेक विद्यार्थ्यांनी त्यांना अनेकदा आग्रह केला की.. तुम्ही इंग्लंड मेड उत्कृष्ट क्वालिटी ची पेन्सिल वापरा.. म्हणजे तुम्हाला असा त्रास होणार नाही.. पण अनेकदा सांगूनही ते फक्त आणि फक्त जापनीज मेड पेन्सिलच वापरायचे.. त्यांचं म्हणणं होतं की.. आम्हीच जर आमच्या देशातील वस्तू विकत घेतल्या नाहीत आणि वापरल्या नाहीत.. तर दुसरे कोण वापरणार.. आणि ते विश्वासाने सांगाय

◾परिचय :- अजय भट्ट USB चे जनक

इमेज
USB लेखक - जितेंद्र दाते Image from wikipedia अजय भट्ट .... हे  नाव  टेक्नॉलॉजि  विश्वात  आभाळा इतक मोठं. १९९६ साली मी अमेरिकेंत फिलाडेल्फिया नामक  शहरांत, लेक्टॉनिक रिसर्च लॅब- LRL म्हणुन कंपनीत कामानिमित्त गेलेलो असतांना, अजय भट्ट हे नाव पहिल्यांदा कानावर पडले. अर्थात  नाव भारतीय असल्यामुळे जास्त आत्मीयता वाटली. कम्प्युटरला  अतिशय सोप्या  रीतीने बाकीचे उपकरण जोडता यावेत व हाय स्पीड डेटाची देवाण घेवाण करण्याचा दृष्टिने  हा  इसम  इंटेल सारख्या  जगविख्यात  कंपनीत, एक  मोठी   क्रांती  घडवत होता. माझ्या  तत्कालिन कलीग व खास मित्र सॅम ऱ्हुबेन ने  मला हें  सांगितले. त्याकाळी  इंटरनेट, गुगल, इमेल  असलं फारसं कांही नव्हत. मी इंटेल कंपनींच्या फॅक्स लाईन वर  सरळ  एक फॅक्स  केला. टू : अजय भट्ट  फ्रॉम  : जितेंद्र दाते . डिअर  अजय सर , आय  आम  अँक्शसली  लुकिंग फॉरवर्ड फॉर  युअर रेव्होल्यूशनरी  मॅजिकल  USB डिव्हाईस .वन ओफ  द  वन्डर्स  ऑफ द  सेन्चुरी .!!  यौर्स अफेक्शनेटली  जितेंद्र  LRL सॅम ऱ्हुबेन  माझे  प्रयत्न पाहुन, माझ्या  खुळचटपणाला हासला.  "यू  मस्ट  बी  क्रेझी  जितु ".  पण  त्याला

◾आरोग्य :- स्वतःच बना स्वतःची आई...

इमेज
"स्वतःच बना स्वतःची आई " नमस्कार मी शुभदा गोडबोले. पेशाने मी आयुर्वेदिक डॉक्टर आहे.  माझ्या 27   वर्षांच्या प्रॅक्टिस मधे मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली,  ती म्हणजे प्रत्येक माणूस वयाच्या कुठल्याही टप्प्यावर का असेना तो प्रेमाला मिस करतो, आता प्रेम म्हंटल्या वर लगेच आपल्याला ते हिरो आणि हेरॉईनच सिनेमा मधलं प्रेम आठवत.  पण ते प्रेम नाही म्हणत मी,  तर ज्याला आपण माया, ममता,  वात्सल्य म्हणतो ते आईच प्रेम प्रत्येकाला आपल्या जीवनाच्या प्रत्येक टप्यावर हवं असतं. थोडे स्वतःच्या  आयुष्यात डोकावून बघाना...  मग तुमच्या लक्षात येईल की, मी काय म्हणते ते.  कारण प्रत्येक फॅमिली मधे कोणीतरी खूपच प्रेमळ असतं, जे दुसऱ्यांसाठी खूप झटतं, त्यांची जीवापाड सेवा करतं, कारण त्याचा तो स्वभाव असतो. त्याला ते जमतं. ती व्यक्ती स्वतःचे छंद, आवडी निवडी बाजूला ठेऊन दुसऱ्यांसाठी झटते (आणि जास्त करून घरातली स्त्रीच हे करत असते) पण पुरुष ही थोड्या फार प्रमाणात असे आपण पहातो. तर सांगायचा मुद्दा हा की, त्या व्यक्तीला दुसऱ्यांकडून तितकसं अटेंशन मिळत नाही. तिला नेहमी गृहीत धरलं जातं. ती व्यक्ती त्याची फिकीर ही कर

◾व्यक्तीविशेष :- डॉ. विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर

इमेज
 मानवी जीवनाला अर्थ देणारी  भारतरत्न डॉ. बाबासाहेब    आंबेडकरांच्या जन्मदिनाची 🌹⚜🌹⚜🌸⚜🌹⚜🌹         भारतातील असे एक व्यक्तीमत्व ज्यांची ओळख विश्वरत्न म्हणून आहे. त्यांच्या जीवन कार्याने करोडोंच्या जीवनात स्वातंत्र्य सूर्य उगवला. सूर्यप्रकाशात जीवन उजळले. हे अव्दितीय कार्य करणाऱ्या महामानवाचे नाव आहे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर.         भीमराव ते भारतरत्न हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांना अत्यंत प्रतिकुल परिस्थितीला तोंड देत संघर्ष करावा लागला, तो सुद्धा बुरसट विचांरानी ग्रस्त अशा जगण्यासाठी मानवी हक्कही नाकारणाऱ्या अन्यायी स्वकियांशीच. पण त्यांनी ही लढाई अचाट बुद्धिमत्ता.. कष्ट आणि प्रामाणिकतेच्या बळावर जिंकली. समाजात सौदार्ह राखून लोकांचे मन आणि मत परिवर्तन घडविले.         नेतृत्व कसे असावे याचा आदर्श म्हणजे डॉ. बाबासाहेब. देशातील प्रत्येकाला स्वतःचे असे अस्तित्व निर्माण झाले. जगातील प्रत्येकाने स्वतःची उन्नती कशी करावी याचा ते आदर्श ठरले. वडिलांच्या संस्काराने बालपणीच वाचनाची आवड लागली. कबीर.. महात्मा फुले आणि भगवान बुद्ध हे बाबासाहेबांचे आदर्श. या ज्ञान तपस्वींनी विकास

◾कविता :- सरत्याला निरोप येणाऱ्याचे स्वागत... | कवी - महेन्द्र सोनेवाने

इमेज
गंधीत होऊन धरा आपली ,  वारा ही पुलकीत झाला ।  नववर्षाच्या आगमनाला ,  सारा आसमंत उजाळला ।। आज आहे ते जुने होईल ,  नविन येतील दुसरे ।  नाते मित्रत्वाचे राहो ,  नेहमीसाठी सदा हासरे ॥  जे झाले त्याला विसरा ,  नका दोष ही देत राहू ।  नविन काही चांगल्यासाठी ,  येणाऱ्याचे स्वागत करु ॥  व्टेंटी व्टेंटी आला गेला ,  प्रेम जिव्हाळा तसाच राहिला ।  यापुढेही तो कायम असूदया ,  नववर्षाचे क्षण घेऊन आला ॥  सरत्या वर्षाला निरोप देऊ ,  नविन वर्षाचे स्वागत करुया ।  मागील वर्षाच्या गोष्टी विसरुन ,  नवी नाती , नवे कार्य घडवूया ॥  ======================= महेन्द्र सोनेवाने , “ यशोमन " गोंदिया ======================== टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-  सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

◾कविता :- गुढीपाडवा... | कवी - महेन्द्र सोनेवाने | yashach amantra

इमेज
चैत्राची सुरुवात करीत ,  आनंद उधळत आली ।  प्रत्येकाच्या नव्या जीवनात ,  उत्साहाची पालवी फुलली ।।  कडूनिंबाच्या पानासंगे ,  साखर ही सुख देई ।  पानाफुलांचे तोरण बांधून ,  गुढी आकांक्षांची येई ॥  रेशमाची गुढी उभारु ,  श्रीखंड पुरी खाऊ ।  लिंबाचं पान अन् साखरगाठी ,  सर्वाना आम्ही देऊ ॥  सोनपिवळया किरणांनी ,  आले नविन वर्ष ।  सर्वाच्या मनात दाटे ,  नव वर्षाचा हर्ष ॥  नववर्ष घेऊन आला ,  चैतन्याचा नवा स्पर्श ।  गुढीपाडव्याच्या कोटी शुभेच्छा ,  सर्वाना होई हर्ष ॥  महेन्द्र सोनेवाने , “ यशोमन " गोंदिया दिनांक : ११/०४/२०२१ ======================= टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

◾कविता :- तो मीच आहे... | कवी - रा. र. वाघ | यशाचा मंत्र

इमेज
ज्ञान,धन,बल,सत्ता- या भ्रमाच्या भोपळ्यांना भुलून ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, रामदास सारख्या अनेक संतांनी स्वानुभूतीने सांगितलेले सत्य दुर्लक्षून शिवाजी महाराज,ज्योतिबा फुले, भगवान बुध्द, डॉ.बाबासाहेब यांच्या साक्षात कृतियुक्त जीवनाच्या तत्वज्ञानाचा आपल्याच सोयीचा अर्थ लावून त्याचाही बाजार मांडणाऱ्या स्वार्थांध धृतराष्ट्राचा वारसा हक्क जपणाऱ्यांकडून-- माझ्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह लावून, काल-परवापर्यंत माझ्यावर श्रध्दा ठेवणाऱ्यांना अंधश्रध्दाळूचे लेबल लावण्याचे प्रमाण  तराजूच्या तागड्यात जडच झाले-- आणि तराजूचाच समतोल बिघडला. जीवांच्या जन्मापासूनच त्यांची सोबत करणारा मी श्वासरुपात सो ऽ हम सो ऽ हम तो मी आहे!तो मी आहे! अशी हर एक श्वासागणिक साक्ष देत असुनही -- मायाजालाच्या भ्रमाने भ्रमित होऊन मलाच नाकारणाऱ्या भ्रमिष्टांसाठी माझे अस्तित्व सिध्द करणे मला क्रमप्राप्त आहे. म्हणूनच फक्त म्हणूनच आता चेंडू (कोरोनारुपात) त्यांच्या कोर्टात उसळून येत आहे! येत आहे!!                     निर्मिती:- रा.र.वाघ,धुळे. (मो.नं.७५०७४७०२६१) ________________________________________

◾विशेष लेख :- मन साफ, तर सर्व माफ

इमेज
नेहमी भूतकाळातील गोष्टी विसरून जात चला... कारण सतत मागच्या गोष्टींचा विचार करत राहिलात, तर त्याचा परिणाम वर्तमानातील जगण्यावर आणि भविष्यावरही होत असतो... लोक आपल्याविषयी काय बोलतात याकडे अजिबात लक्ष देण्याची गरज नाही... कारण पाठीमागे लोकं तर राजालासुध्दा शिव्या देत असतात... प्रत्येक समस्येवर उपाययोजना आहेच... काळाच्या ओघात सगळ्या गोष्टींवर उपाय सापडतो...पण त्यासाठी काही वेळ  जाऊ द्यावा लागतो... स्वतःच्या आयुष्याची कधीही इतरांशी तुलना करू नका आणि त्यावरून इतरांविषयीचे मत बनवू नका... कारण त्यांच्या आयुष्यातील वादळे आणि संकटांची तुम्हाला बिल्कुल कल्पना नसते... अतिविचार करीत बसू नका... काही प्रश्नांची उत्तरे न मिळालेलीच बरी असतात... कदाचित तुम्ही अपेक्षा ठेवली नसताना देखील ती तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील... तुमच्या आनंदाला फक्त तुम्हीच जबाबदार आहात... आपण आनंदी राहायचे की दुःखी हे ठरवण्याचे अधिकार कुणालाही देऊ नका... पोट दुखेपर्यंत हसा... लक्षात ठेवा, जगातील सगळ्या प्रश्नांचा भार कुणीही तुमच्या डोक्यावर दिलेला (ठेवलेला) नाही.... सुंदर डोळ्यांनी जगातील फक्त चांगल्या गोष्टींकडेच पहा... सुंद

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

इमेज
1) हिऱ्यावर कितीही प्रखर सूर्यकिरणे पडली तरी त्यावर काही परिणाम होत नाही, कारण त्यात परीवर्तनाची क्षमता जबरदस्त असते. 2) चुका स्विकारण्याची तयारी ठेवली की माणसं गमावण्याची वेळ येत नाही... प्रत्येकाला आनंदी ठेवणे आपल्या हातात निश्चित नाही... पण प्रत्येकाबरोबर आनंदी राहणे हे मात्र निश्चीतच आपल्या हातात आहे" 3) जीवन कोणासाठी थांबत नाही फक्त जीवन जगण्याची कारण बदलतात.. सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत काही प्रश्न “सोडून” दिले की आपोआप सुटतात. 4) मुस्कुराते इंसान की कभी जेब टटोलना... हो सकता है उसका रुमाल गीला मिले.... ५) मंझीले उन्हीको मिलती है जिनके सपनो में जाण होती है, यूही पंख होने से कुछ नहीं होता हौसलोसे उडान होती है. ६ ) चेहऱ्यावरचं तेज हे तुमच्या अंतःकरणातल्या विचारावर अवलंबून असतं, मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो, मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो, मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो, मनातले हे भावच तर माणसाला सुंदर बनवत असतात. _७) विरोधक तयार करण्यासाठी मारामारी करावी लागत नाही. तुम्ही चांगले कर्म करु लागला की आपो

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾विशेष लेख :- प्रारब्धवशात जे आहे तेच होते...उदाहरणासकट