◾कविता :- बहुरंगी देश...
बहुरंगी देश
जरी येथे असती सर्व धर्म
आम्ही राहतो राखूनी मान ,
सारे एकत्र नांदून म्हणतो
माझा भारत देश महान ||१||
एकाच छताखाली सर्व जाती
आपुलकीचे गोड संवाद साधती,
चहूबाजूंनी देखणा निसर्ग वसती
बहुभाषिकतेचा येथे मेळ साधती ||२||
हिरवळीने सजलेला माझा देश
विविध रुप परिधान करी वेश ,
छाती फुगवून सांगतो आम्ही
प्राणाहून प्रिय माझा भारत देश ||३||
बर्फाच्छादित पर्वत लक्ष वेधून
पवित्र गंगेचा आहे निवारा,
तेथे उंच हिमालय देती पहारा
शत्रूला वाटे त्याचा किती दरारा| |४||
सदैव भूमातेची शपथ घेऊनी
तयार सैनिक देशरक्षणासाठी,
हसतमुखी करी प्राण बलिदान
वीरजवान प्रेरणा देई आम्हासाठी ||५||
स्वर्गाहून सुंदर माझा देश
विविधतेत एकता हीच शान ,
अन एकमुखाने रोजच बोला
हा माझा भारत देश महान ||६||
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
श्रीम. सुषमा सुनिल जाधव
जि. पुणे
फोन नंबर = 9552003581
असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी आमचे YouTube चैनल सबस्क्राईब करा
दररोज प्रेरणादायक माहिती वाचण्यासाठी खालील Whatsapp व Teligram समुहा मध्ये सहभागी व्हा
-{ आणि लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
📱आवडल्यास नक्की शेअर करा📱
धन्यवाद
ह्या पैकी काय वाचायचे आहे ❓
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा