एकदा एक बाई रामकृष्ण परमहंसाकडे आल्या आणि म्हणाल्या , " मला या संसाराचा विट आला आहे . मुलं मोठी झाली. आता... प्रपंच सुटेल असे वाटले. पण... नातवंडांच्या प्रेमात पडले . रोज त्याला सांभाळावे लागते . परंतु आता घर सोडायचा विचार आहे . " रामकृष्णांनी विचारले , " घर सोडून तुम्ही काय करणार ? " त्या बाई म्हणाल्या , " गंगेच्या तीरावर एक झोपडी बांधणार . त्यात श्रीकृष्णाची मूर्ती बसविणार . रोज त्या मूर्तीची पूजा करणार . कृष्णाला नेवैद्याने जेवू घालणार . कृष्णाला झोपेतून उठविणार, आंघोळ घालणार." परमहंसांनी विचारले, " श्रीकृष्णाची मूर्ती दगडाची असणार ना ? " तेव्हा त्या बाई ' हो ' म्हणाल्या . रामकृष्णांनी विचारले , " आपण दगडाच्या मूर्तीत श्रीकृष्ण पाहणार ? " त्या बाई ' हो ' म्हणाल्या . त्यावर रामकृष्ण म्हणाले . "आपण दगडाच्या मूर्तीत श्रीकृष्ण पाहणार , मग नातवंडामध्ये श्रीकृष्ण का पाहत नाहीत ? श्रीकृष्ण समजून नातवंडाला जेवू घाला. श्रीकृष्ण म्हणून आंघोळ घाला. श्रीकृष्ण म्हणून त्याला झोपवा. " तुम्ही तुमच्या नातवंडानाच तु...