टागोरांचे भावविश्व संपन्न करणाऱ्या दोन स्त्रिया
टागोरांचे भावविश्व संपन्न करणाऱ्या दोन स्त्रिया रवींद्रनाथ टागोर म्हटले की समोर येते ती पांढरी शुभ्र दाढी असलेली भव्य चेहऱ्याची व्यक्ती. त्यांनी लिहिलेले ' जनगणमन 'आठवते. टागोर म्हटले की त्यांच्या ' गीतांजलीला ' मिळालेला नोबेल पुरस्कार आठवतो. टागोर म्हटले की त्यांचे शांतिनिकेतन आठवते.टागोर हे महान गीतकार आणि संगीतकार. त्यांनी इंग्रज सरकारला'सर 'ही पदवी परत केल्याचे आठवते. आणि आठवतात अशाच साऱ्या अनेक गोष्टी. बंगाली माणसाच्या घराघरात आणि मनात मानाचे स्थान असलेले हे व्यक्तिमत्व. पण त्यांच्या तरुणपणातील एक अधुरी प्रेमकहाणी आपल्याला फारशी माहिती नसते. आणि तिचा संबंध आपल्या महाराष्ट्राशी आणि मराठी मुलीशी आहे. आत्माराम पांडुरंग तर्खडकर किंवा तर्खड हे त्या काळातील मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टर आणि समाजसुधारक. त्यांच्यावर बंगालमधील केशवचंद्र सेन यांचा प्रभाव होता. त्यांच्या कार्याने प्रेरित होऊन तर्खडकरांनी मुंबईत प्रार्थना समाजाची स्थापना केली. या स्थापनेच्या वेळी त्यांचा उद्देश होता, तो म्हणजे समाजातील जातीभेद दूर करणे, मुलींना शिक्षणासाठी उत्तेजन देणे, बालविवाह रोखणे आण