आयुष्याच्या वळणावर अशी कही माणसे भेटतात, जी आपल्याला जगायचं कसं हे शिकवून जातात. मग शिकवणारे फक्त शिक्षक नसतात. तर आयुष्य जगताना जे अनुभव येतात, ते शिक्षणापेक्षा जास्त मौल्यवान असतात. आज इस्लामपुरला चाललेलो, काही कामा निमित्त. एक वृद्ध, वयस्कर आजोबांनी हात केला, खुप थकलेला चेहरा होता. मी गाड़ी थांबवली, तर आजोबांनी विचारलं साखर कारखान्यावर सोडनार का? मी हो बोललो. आणि त्यांना गाड़ीवर निट बसता येईल का, याची खात्री केली. ते हो बोलले, आणि एक अनुभवी प्रवास आमचा सुरु झाला. मी सहज विचारलं, "आजोबा राहता कुठे?" तर आजोबानी सांगितलं पैसे नाहीत म्हणून असं हात करून जातो मी. कदाचित त्यांना मी विचारलेला प्रश्न निट ऐकता आला नसावा. मी पुन्हा विचारलं, "आजोबा राहता कुठे?" उत्तर आलं, येडे गावात. मग ना राहून विचारलं, कुठे जाताय तुम्ही? तर साखर कारखान्यावर एका माणसाला भेटायला. मग आजोबाना विचारलं, त्यांची ती अवस्था बघून, की तुम्ही जे बोलला पैसे नाहीत. तर आजोबा तुम्हाला मूल नाहीत का? आजोबा बोलले "दोन बोकड आहेत." मला नाही समजलं. मी पुन्हा विचारलं, "तुम्हाला मूलं नाहीत का?"...