◾जीवन मंत्र :- कसल्याही प्रकारच्या निराशेला नाहीशी करणारी चौदा सुत्रे
मानसिक आजार पळवुन लावणार्या चौदा कृती!… कसल्याही प्रकारच्या निराशेला नाहीशी करणारी चौदा ही खालील सुत्रे आहेतः - 1) सतत पॉझीटीव्ह - कितीही वाईट घडो, नेहमी पॉझीटीव्हच रहायचं! उदा. “एक डोळा गमावला पण दुसरा डोळा शाबुत आहे,” ज्यामुळे मी हे सुंदर जग पाहु शकतो, देवाची किती कृपा आहे. प्रत्येक अपयश मला एक संधी देऊन जात आहे. उदा. जेव्हा लोक आपल्याला टाळतात, आपल्याकडे बघुन नाकं मुरडतात, तेव्हा तर अधिकधिक आकर्षक दिसण्याबद्द्ल, आपण जागरुक होतो. आपली मस्करी उडवली की, आपला कोणी कळत नकळत अपमान केला की, आपल्यातल्या महत्वकांक्षा जागृत होतात. 2) पॅशन निर्माण करा - आयुष्यात पोकळी आणि निराशा आली की एक असं पॅशन शोधावं, ज्यासाठी संपुर्ण आयुष्यच पणाला लावावं. पॅशन म्हणजे अशी एखादी गोष्ट जी गोष्ट न थकता, अगदी उत्साहाने, महिन्याचे तीस दिवस, दिवसातल्या दहा-बारा तासाच्या वर आपण ते करु शकतो, ह्याला म्हणतात पॅशन! त्या गोष्टीसाठी अक्षरशः आयुष्य झोकुन द्यावं. अगदी स्वतःला विसरायला लावतं, तेच खरं पॅशन! कोणासाठी व्यापार हे पॅशन असेल, कोणासाठी खेळ हे पॅशन असेल, कोणासाठी भटकंती हेच पॅशन असेल. त्याच्याशिवाय आपण