◾कविता :- कधी तू
कधी तू...येशील परतून
सांगून मज जाशील का ?
दिलंय वचन मीच तुला
येऊन जरा पाहशील का ?
कधी तू...हळूच हलवून
झोपेतून उठवशील का ?
निघून गेलेल्या क्षणांची
ती झलक दाखवशील का ?
कधी तू...मला कुरवाळून
गुपीत तुझे सांगशील का ?
परत कधीच येत नसते
सत्य हे समजावशील का ?
कधी तू...निघून गेलीस हळूच
विचार करून डोकं फिरलंय
येशील कधीतरी याच आशेने
जगून घेण्याचं वारं शिरलंय
कधी तू...दिलीस हुलकावणी
ना कधी जाणली मी महती
करता आलेल्या संधीचं सोनं
आनंदाश्रू नयनी या वाहती
कधी तू...पुन्हा येण्याची
वाट पाहत नाही बसणार
फुलवेन कष्टानं जीवनमळा
क्षणांनाच त्या लागेल लळा
क्षणांनाच त्या लागेल लळा
✍️ श्री.संग्राम कुमठेकर
मु.पो.कुमठा (बु.)
ता.अहमदपूर जि.लातूर
सहप्रशासक/परीक्षक/संकलक
©️मराठीचे शिलेदार समूह
असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी आमचे YouTube चैनल सबस्क्राईब करा
दररोज प्रेरणादायक माहिती वाचण्यासाठी खालील Whatsapp व Teligram समुहा मध्ये सहभागी व्हा
-{ आणि लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
📱आवडल्यास नक्की शेअर करा📱
धन्यवाद
ह्या पैकी काय वाचायचे आहे ❓
Zakas
उत्तर द्याहटवा