एक होतं गाव. "महाराष्ट्र" त्याचं नाव....
मराठी भाषा दिवस २७ फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आहे तोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात पोचवा एक होतं गाव. "महाराष्ट्र" त्याचं नाव. गाव खूप छान होतं, लोक खूप चांगले होते. "मराठी" भाषा बोलत होते, गुण्यागोविंदानं नांदत होते. त्यांचं मन खूप मोठ्ठं होतं. वृत्ती खूप दयाळू होती. दुखलं- खुपलं तर एकमेकांच्या हाकेसरशी धावून जायचे. आल्या-गेल्याला सांभाळून घ्यायचे. एकमेकांना साथ देऊन जगण्याचं गाणं शिकवायचे, महाराष्ट्रात होता एक भाग. "मुंबई" त्याचं नाव. मुंबईसुद्धा छान होती; महाराष्ट्राची शान होती. सर्वांच्या आकर्षणाची बाब होती. आजूबाजूचे सगळेच मुंबईसाठी धडपडत होते. इथं आले, की इथलेच होऊन राहत होते. "अतिथी देवो भव...!" या उक्तीनुसार महाराष्ट्रातील लोकांनी सर्वांचं आदरातिथ्य केलं. पाहुण्यांचा मान म्हणून मागतील ते देऊ लागले. हळूहळू परिस्थिती बदलू लागली. "अतिथी" जास्त आणि "यजमान" कमी झाले. मुंबई कमी पडू लागली, आजूबाजूला पसरू लागली. सगळ्यांचीच भाषा वेगवेगळी होती. मराठी आपली वाटत नव्हती. प्रश्न ?मोठा गहन होता,पण माण