तुम्हाला कोणत्या गोष्टीने जीवनातील सर्वात आनंदी माणूस बनवले आहे?
"मला तुमचा चेहरा लक्षात ठेवायचा आहे जेणेकरुन मी जेंव्हा तुम्हाला स्वर्गात भेटेन तेव्हा तुम्हाला ओळखू शकेन आणि पुन्हा एकदा आभार मानू शकेन." जेंव्हा नायजेरियन अब्जाधीश फेमी ओटेडोला यांना टेलिफोन मुलाखतीत रेडिओ प्रेजेंटरने विचारले, "सर तुम्हाला कोणत्या गोष्टीने जीवनातील सर्वात आनंदी माणूस बनवले आहे?" फेमी म्हणाले: "मी आयुष्यातील आनंदाच्या चार टप्प्यांतून गेलो आणि शेवटी मला खऱ्या आनंदाचा अर्थ समजला." पहिला टप्पा संपत्ती आणि साधन जमा करण्याचा होता. पण या टप्प्यावर मला हवा तसा आनंद मिळाला नाही. मग मौल्यवान वस्तू गोळा करण्याचा दुसरा टप्पा आला. पण या गोष्टीचा परिणामही तात्पुरता असतो आणि मौल्यवान वस्तूंची चमक फार काळ टिकत नाही हे माझ्या लक्षात आले. त्यानंतर मोठा व्यवसाय मिळविण्याचा तिसरा टप्पा आला. तेव्हा मी नायजेरिया आणि आफ्रिकेत 95% डिझेल पुरवठा करत होतो. मी आफ्रिका आणि आशियातील सर्वात मोठा जहाज मालक होतो. पण इथेही मला कल्पनेतला आनंद मिळाला नाही. चौथा टप्पा तेंव्हा आला जेंव्हा माझ्या एका मित्राने मला 200 अपंग मुलांसाठी व्हीलचेअर घेऊन देण्याची विनंती केल