जगावे कसे ?
जगावे कसे ?
कळत नाही दुनियेत
आम्ही जगावे कसे,
भावनांचा या बाजारात
करावे स्वताचे हसे,
कळत नाही दुनियेत
आम्ही जगावे कसे,
पडता आहे उलटे
आमच्याआनंदाचे फासे,
कळत नाही दुनियेत
आम्ही जगावे कसे,
व्यर्थ सारे आसू
नयनी सुख नासे,
कळत नाही दुनियेत
आम्ही जगावे कसे
माणसाला माणसाची उणीव
कधी न भासे,
कळत नाही दुनियेत
आम्ही जगावे कसे,
माणुसकीच्या ओसाड रानात
विखुरलेली स्वप्नांची पिसे,
कळत नाही दुनियेत
आम्ही जगावे कसे,
पाहत रहावे नुसतेच
आस्तिक झालेले नाहीसे,
आम्ही जगावे कसे...
आम्ही जगावे कसे...
मंगेश शिवलाल बरई.
हिरावाडी, पंचवटी, नाशिक-४२२००३
_________________________________
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा