तशी पैसा, सत्ता, प्रसिद्धी ची हाव वाईटच | मंगेश बरई
आज पैसा, सत्ता,प्रसिद्धी या तीन गोष्टींशिवायआपलं समाजात अस्तित्व काहीच नाही. असं प्रत्येक माणसाला वाटू लागलंय. किंबहुना हा त्याचा एक 'गोड' गैरसमज होऊन बसलाय. तो या तिन गोष्टींमागे अक्षरश बेभान होऊन धावतोय. त्याला त्या गोष्टींशिवाय त्याच्या समोर काहीच दिसत नाही. त्या गोष्टी मिळवण्यासाठी तो साम, दाम, दंड, भेद या गोष्टींचाही अगदी बेधडक उपयोग करतो. त्या गोष्टींची जणू नशाच त्याला चढली आहे. त्यासाठी तो कोणत्या थराला जाईल हे सांगता येत नाही. ह्याचं उदाहरण आपण पाहू.
एका छोट्याशा खेड्यात दोन मिञ रहायचे. अगदी बालपणीचे सवंगडी होते ते. दुसर्या भाषेत सांगायचे झाले तर लंगोटी यार. दोघं ही शिक्षणात अगदीच तरबेज. अगदी बालवाडीपासून त्यांचं शिक्षण एकञच झालेलं. शिक्षणाशिवाय त्यांच्यात अतिशय उत्तम कलागुण होते. कविता लिहिण्यात दोन्ही पारंगत होते. इतर गुणही त्यांच्यात होते माञ गावातील कोणत्याच प्रकारच्या सोयि सुविधा नसल्याने त्यांच्यात असलेल्या कलागुणांना वाव मिळत नव्हता. दोधही जेव्हा एकाद्या काव्य लेखन स्पर्धेत भाग घ्यायचे तेव्हा एक आणि दोन नंबर घेऊनच यायचे.असे 'एक से बढकर एक' होते ते. दोघांनीही मोठ्या शहरात जाऊन एम.एड. पर्यंत शिक्षण पूर्ण केलं. कर्म-धर्म संयोगाने दोघांनाही जिल्हापरिषद शाळेत उत्तम प्रकारे शिक्षकाची नोकरी लागली. नोकरी निमित्ताने दोघेही वेग-वेगळ्या गावात 'सेटल' झाले. काळ उलटत गेला. कालांतराने दोघांचीही लग्न झाली. दोघांनीही आप-आपले संसार थाटले. दोन्ही आप- आपल्या संसारात रममाण झाले. मात्र एकाची काव्यसाधना कमी पडू लागली आणि दुसरा काव्यक्षेत्रात पटापट यशाच्या पायऱ्या चढू लागला. आपल्या मिञाचं यश पाहून. काव्यक्षेत्रात मागे पडलेल्या मिळाला अतिशय दुख झाले. तो आपल्या प्रसिध्दीच्या शिखरावर आरूढ झालेल्या मिञावर जळू लागला.
त्याच्या मनात मिञाबद्दल द्वेषाचे भावना निर्माण झाली आणि त्या भावनेतूनच त्याने आपल्या मिञाचा घात केला. मिञाने पाठवलेल्या कविता स्वताच्या नावावर छापायला सुरवात केली व त्याला न कळवताच त्याच्या कविता एकत्र करून आपल्या नावाने त्या कवितांचा एक काव्यसंग्रह छापला.
माञ, जेव्हा मिठाच्या या कपटकारस्थानाबद्द्ल कळले. तेव्हा चोरी करणाऱ्या मिञाला त्याच्या कर्माचे योग्य फळ मिळाले.
...तर मिञांनो, आपल्याला ह्या प्रसंगातून एकच गोष्ट शिकायला मिळाली की, इतरांची बरोबरी करू नये, प्रसिद्धीसाठी कोणत्याही थराला जावू नये.
_______________________________________
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा