रुस मधील विवाह | सुधा मूर्ती यांचा अनुभव

रुस मधील विवाह

सुधा नारायण मूर्ती आपला अनुभव सांगताना लिहितात :

"नुकतीच मी रशिया मधील माॅस्को येथे गेले होते. तेथे एक दिवस मी बागेत गेले. त्या दिवशी रविवार होता.
 उन्हाळ्याचा महिना होता, पण हवामान थंड होते व  थोडा रिमझीम पाऊस पडत होता. मी छत्रीखाली उभी राहून तेथील परिसराच्या सुंदरतेचा आनंद घेत होते. तेव्हा अचानक माझी दृष्टी  एका तरूण जोडप्यावर पडली. 

 मला स्पष्टपणे दिसत होते, की त्यांचे नुकतेच लग्न झालेले होते. ती तरुणी वीस वर्षाची वाटत होती. दाट केस, निळे डोळे व सडपातळ बांध्यामुळे ती खूपच आकर्षक दिसत होती. 

तरुणही तिच्याच वयाचा दिसत होता.आणि सुंदर अशा लष्करी गणवेषात होता.

 त्या तरुणीने पांढऱ्या रंगाचा सुंदर सॅटिनचा वेडींग गाऊन घातला होता. जो मोत्यांनी आणि सुंदर अशा लेसने सजवलेला होता. तिच्या मागे दोन तरुण करवल्या उभ्या होत्या, ज्यांनी  वेडींग गाऊन खराब होऊ नये म्हणून, त्याचे काठ उचलून धरले होते.

त्या युवकाने भिजू नये म्हणून आपल्या डोक्यावर छत्री धरली होती आणि ती तरुणी एक पुष्पगुच्छ घेऊन उभी होती. दोघेही आपले हात जोडून उभे होते. 

ते दृश्य खूपच सुंदर होते.

 त्यांना बघून मला खूप आश्चर्य वाटले आणि मी विचार करू लागले की लग्नानंतर लगेचच ते अशा पावसात, या बागेत का  आले आहेत ? जर त्यांना हवे असते तर ते दुसर्‍या कुठल्या चांगल्या ठिकाणीही जाऊ शकले असते. मी त्यांना स्मारकाजवळ असलेल्या चौथऱ्यावर एकत्र चालत येताना बघितले. त्यांनी तो पुष्पगुच्छ तिथे ठेवला, शांतपणे स्तब्ध उभे राहून आपले मस्तक झुकवले आणि सावकाशपणे परत निघून गेले.

बराच वेळ मी ह्या दृश्याचा आनंद घेत होते. पण मला जाणून घेण्याची उत्सुकता होती की हे काय चालले  होते?  

माझी नजर एका वृद्ध गृहस्थाकडे गेली जो त्या नवविवाहित जोडप्याबरोबर उभा होता. त्या वृद्ध माणसाची नजर माझ्या साडीकडे जाताच त्यांनी विचारले, "आपण भारतीय आहात का?" मी प्रेमाने उत्तर दिले, "होय, मी भारतीय आहे." अशा तर्‍हेने आमच्यामध्ये आपुलकीचे संभाषण सुरू झाले. त्या दरम्यान, मी मला पडलेला एक प्रश्न विचारण्याची वाट बघत होते. आणि म्हणून कुतूहलाने मी त्यांना विचारले की त्यांना इंग्रजी कसे काय येते?

अतिशय नम्रपणे त्यांनी उत्तर दिले, "मी परदेशात काम केले आहे." लगेच मी विचारले, "कृपया आपण मला हे सांगाल का की हे तरूण जोडपे आपल्या लग्नाच्या दिवशी या युद्ध स्मारकावर का आले आहे?"

त्यांनी सांगितले, "ही रशियातील परंपरा आहे आणि येथे विवाह नेहमी शनिवारी किंवा रविवारीच होतात.” ते पुढे म्हणाले, "येथे प्रत्येक नवविवाहित जोडप्यांना कार्यालयामध्ये जाऊन रजिस्टरवर हस्ताक्षर केल्यानंतर, हवामानाची पर्वा न करता जवळच्या महत्त्वपूर्ण राष्ट्रीय स्मारकांना भेट द्यावी लागते. या देशातील प्रत्येक तरुणाला कमीत कमी दोन वर्षे तरी सैन्यात नोकरी करावीच लागते. आणि तो कोणीही असो, त्याला त्याच्या लग्नात त्याचा लष्करी गणवेषच घालावा लागतो."

हे ऐकून आश्चर्याने मी विचारले, "येथे अशी प्रथा का आहे?"

हे ऐकून ते म्हणाले की, "हे एक कृतज्ञतेचे प्रतीक आहे.  आमच्या पूर्वजांनी रशियाने लढलेल्या अनेक लढायांमधे आपल्या जीवाचे बलिदान दिले आहे. त्यातील काही युद्धे आम्ही जिंकलो, काही हरलो. पण त्यांचे बलिदान हे नेहमी देशासाठीचे होते. म्हणूनच, प्रत्येक नवविवाहित जोडप्यांनी ही आठवण ठेवली पाहिजे की आपल्या पूर्वजांच्या बलिदानामुळेच ते शांतीपूर्ण आणि स्वतंत्र अशा रशियामध्ये राहात आहेत. आणि यासाठीच त्यांनी त्यांचे आशीर्वाद घेतले पाहिजेत." 

"आम्ही वयस्क हे मानतो की देशप्रेम हे कुठल्याही लग्नकार्यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. म्हणूनच आम्ही ही परंपरा चालू ठेवण्यावर जोर देतो. मग ते मास्को असो, सेंट पीटर्सबर्ग असो किंवा रशियाच्या कोणत्याही अन्य भागात असो. म्हणूनच लग्नाच्या दिवशी त्यांना जवळ असलेल्या युद्ध स्मारकाला भेट द्यावीच लागते.”

त्या वृद्ध व्यक्तीबरोबर झालेल्या संभाषणानंतर माझ्या मनात सारखा सारखा एकच विचार येत होता, की आपण आपल्या इथे आपल्या मुलांना काय शिकवतो? आपल्याकडे असा शिष्टाचार आहे का, की आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या दिवशी आपण आपल्या शहीदांचे स्मरण करावे?

आपल्याकडे लग्नसमारंभाच्या वेळी आपण साड्या व दागदागिने खरेदी करण्यात, लग्नाच्या दिवशीचे जेवणाचे पदार्थ ठरवण्यात व डिस्कोमध्ये पार्टी करण्यात मग्न असतो.

आपण कधीही ह्या गोष्टीचा विचारही करत नाही.

 हे सर्व बघून माझे डोळे अश्रूंनी भरून आले. मला वाटू लागले की आपणही रशियन लोकांकडून या उदात्त कल्पनेचा आणि परंपरेचा धडा शिकायला हवा.

आपणही आपल्या शहिदांचा सन्मान करायला हवा, ज्यांनी आपल्या देशासाठी आणि आमच्या आजच्या व उद्याच्या भविष्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे...!

                   ♾️

”जेव्हा एखादे सत्कर्म केले जाते तेव्हा त्यातून मिळणारा आनंद सर्वांबरोबर वाटावा. म्हणजे आपल्या चेतनेचा अविरतपणे विस्तार होतो."

______________________________________
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- 
 सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

◾विशेष लेख :- प्रारब्धवशात जे आहे तेच होते...उदाहरणासकट

फक्त व्यक्त व्हायला शिका...

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾विशेष लेख :- प्रारब्धवशात जे आहे तेच होते...उदाहरणासकट