मित्र मैत्रिणींनो आपल्याला आयुष्य एकदाचं मिळते...
ते भरभरून जगता आले पाहिजे आणि हे भरभरून जगणे अनेक नात्यांच्या स्पर्शाने शक्य होते नाती अनेक प्रकारची असतात आईवडिल मुलं पती पत्नी सासू सूना नणंद भावजय आजीआजोबा नातवंड मामा भाचे काका पुतण्या दिर भावजय मित्र मैत्रिणी अनेक नात्यात आपण गुतलेलो असतो या सर्व नात्यातून एक मला भावलेले नाते म्हणजे मैत्रीच नाते या सर्व नात्यांत मैत्रीचं नाते फुलंले तर काय जादू होईल कुणीच दु:खी दिसणार नाही मैत्रीच्या नात्यात अपेक्षांचे ओझं नसते आपण स्वतः ठरवून रक्ताच्या नात्यापेक्षाही हे नातं अधिक घट्ट बनवू शकतो मैत्रीला काळाची वेळाची वयाची काहीच बंधने नसतात लहान मुलांपासून ते आबालवृद्धापर्यंत कोणाशीही मैत्री होऊ शकते आयुष्यात असंख्य लोक आपल्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर भेटत असतात त्यातील अनेकांशी ताटातूट होते पण मैत्री झाल्यावर मात्र ते संबंध कायम रहातात मैत्रीला वयाचं बंधन नसतेच लहान वयातले पहिले मित्रमैत्रिण आपले असतात म्हणजे आजी आजोबा नातवंडाबरोबर आपलंही गोड मैत्रीचं नातं निर्माण होते नंतर शालेय जीवनातील मैत्री आपल्याला बाहेरच्या जगातल्या मैत्रीची ओळख शालेय जीवनात सुरू होते एकाच बाकावर बसून एकमेकाना मदत करत खेळताना एकमेकांशी भांडत रागवत आपण मैत्रीची सुरुवात करतो त्या वयात एकमेकांचे स्वभाव ओळखणे आपल्या निरागस मनाला माहित नसते त्यामुळे आपण सगळ्यांशी मैत्री करतो पण जसजसे वय वाढत जाते आपणही समाजाच्या दृष्टीकोनातून विचार करायला लागतो आपल्या ऑफिस मधील व्यक्ती म्हणा किंवा आपले सहप्रवासी म्हणा यांच्या सहवासात आपण अधिक तास घालवतो समोरच्या माणसाच्या स्वभावातील विविध गुण जाणून घ्यायला लागतो आणि जिथे स्वभाव जुळतात तिथे मैत्रीचे नाते दृढ होते हि मैत्री अगदी वृद्धापकाळापर्यंत साथ देते पण काही व्यक्तीना खूप अलिप्त रहायला आवडते त्यांची मैत्री करण्याची पद्धत वेगळी बहुतेकजण पुस्तकासोबत आपली मैत्री करतात काही जण निसर्गाशी मैत्री करतात तर काही जण मुक्या प्राण्यांमधे आपले मित्र मैत्रिणी शोधू पाहतात कधी कधी अशी मैत्रीही आपल्याला आनंद देते कधी कधी काळाच्या ओघात काही मित्रमैत्रीणी दुरावल्या जातात संपर्क तुटतो पण मनांत मात्र कायम असतात पण अलीकडे सोशल नेटवर्किंग साइट्समुळे लहानपणीचे वा तरुणपणीचे मित्र मैत्रिणी एकत्र येताहेत त्या त्या अभ्यासक्रमानंतर दुरावलेल्या मित्र-मैत्रिणींना एकत्र आणायची मोठीच कामगिरी फेसबुक आणि व्हॉट्स अॅपसारख्या सोशल मिडिया करत आहेत प्रौढ मैत्री उदयास येत आहे नव्याने एकमेकांशी बोलून सुखदु:खाची देवाणघेवाण करत आहेत आणि त्यातूनच खूप काही विधायकही घडत आहे असं हे मैत्रीचं अमुल्य नाते आयुष्यामध्ये मित्र नाही मिळत पण मित्रांमध्ये आयुष्य नक्की मिळते हेच खरे आहे...
________________________________________
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा