◾अभंग :- भेटी लागी जीवा लागलीसे आस

🌻 *आनंदी पहाट* 🌻

           *मनाचिये वारी पंढरीची*
         *भक्ती मार्गाच्या वाटेवरची*
     
        *श्रीक्षेत्र देहूनगरीतून आज तुकोबांच्या पालखीचे प्रतिनिधिक प्रस्थान.*
          🛕
         🚩👣🚩
                🚩👣🚩
                                        
🌹⚜️🚩🔆🙏🔆🚩⚜️🌹

        *परमेश्वरी शक्तीवर ज्यांचा विश्वास आहे त्यांना हे नक्कीच पटते की केव्हा कसे वागावे याची सद्बुद्धी परमेश्वरच देतो.*
        *यंदा विठुरायाची इच्छा अशी की तुम्ही माझ्या भेटीसाठी येण्याची गरज नाही. त्यासाठीचे कष्ट तुम्ही उपासनेत खर्च करावेत. मानस पूजेने तुम्ही माझे चिंतन करा.*
        *मनाचे वैशिष्ट्य असे की तुम्ही ज्या गोष्टीचा विचार करता, त्या गोष्टीचा जगभर प्रवास मन घडविते. जेव्हा हे मन विठ्ठलालापाशी स्थिरावते तेव्हाही याची अनुभुती प्राप्त होते.*
        *चांगल्या आठवणी या मनात सदैव आनंद.. उत्साह.. चैतन्य निर्माण करतात. मग आज डोळ्या समोर यावा पंढरीला निघालेला तो देहू नगरीतला जगदगुरुंचा पालखी प्रस्थानाचा देखणा सोहळा. ते शिस्तीतले शुभ्र वेषातील टोपी घाललेले वारकरी. फुलांनी सुशोभित पालखी.. तुकोबांच्या पादुका. पालखीचे भोई होण्याचा मान प्राप्त झाल्याने आनंदी झालेले वारकरी. सोबतचे पगडीधारी चोपदार. गगनी फडकणाऱ्या भगव्या पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या भगीनी. कानी ऐकू यावा टाळमृदुंगासह गजरात  "निवृत्ती.. ज्ञानदेव.. सोपान.. मुक्ताबाई.. एकनाथ.. नामदेव.. तुकाराम" आणि विठ्ठलनामाचा जयघोष. दिसावेत ते वय विसरुन आनंदाने फुगडी खेळणारे, नाचणारे.. पावली खेळणारे वारकरी. या मागील सर्व सोहळ्याच्या आठवणीही आम्हांला रोमांचीत करतात. मग ती देहूनगरीच समोर उभी राहते.*
        *संत तुकोबा हे भक्ती मार्गाचे प्रदीप. त्यांनी ईश्वर प्रेमाची अत्युच्च पातळी गाठलेली होती. आपली सर्व संपत्ती वाटणारे हे निस्वार्थ.. निस्संग.. निस्पृह कर्मयोगी भक्त होते. आज या आमच्या मानस पूजेत विठ्ठलाविषयीचा भाव हा संत तुकोबांप्रमाणेच हवा. तुकोबांना विठ्ठल भेटीची अशी ओढ होती की ते त्यासाठी भुकेल्या चकोराची, माहेरी जाण्यासाठी आतुर लेकीची, आईसाठी आकांत करणाऱ्या भूकेल्या बाळाची उपमा देतात.*
        *एवढीच ओढ आमची असेल तर नक्कीच आज आमचीही चार पाऊले 'मनाने' तुकोबांच्या पालखीसोबत पंढरीची वाट नक्कीच चालणार. तरच आपण खरे भक्त होण्यास पात्र ठरू..* 

🌹⚜️🚩🍃🌹🍃🚩⚜️🌹

  *_भेटी लागी जीवा लागलीसे आस,_*
  *_पाहे रात्रंदिवस वाट तुझी ॥धृ॥_*

  *_पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन,_*
  *_तैसे माझे मन वाट पाही ॥१॥_*

  *_दिवाळीच्या मुळा लेकी आसावली,_*
  *_पाहतसे वाटूनी पंढरीसी ॥२॥_*

  *_भुकेलिया बाळा अति शोक करी,_*
  *_वाट पाहे परी माऊलीची ll३ll_*

  *_तुका म्हणे मज लागलीसे भूक,_*
  *_धावूनी श्रीमुख दावी देवा ॥४॥_*

🌺🥀🚩🌸🛕🌸🚩🥀🌺

  *रचना : संत तुकाराम महाराज* ✍

  *संगीत : श्रीनिवास खळे*         🎹

  *स्वर : लता मंगेशकर*             🎤

🌻🥀🌸🌿🌺🌿🌸🥀🌻

टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- 
 सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

फक्त व्यक्त व्हायला शिका...

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾थोडं मनातलं :- नवरा बायको मधील प्रेमल संवाद| Marathi Audiobook | audio story

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट