◾विशेष लेख आणि गाणी :- वटपौर्णिमा | जगदीश खेबूडकर
वटपौर्णिमेची
🌹🥀🌿🌸🌳🌸🌿🥀🌹
प्राणवायू.. हा सध्याच्या काळात जगभर चर्चा होणारा विषय. पण भारतीय संस्कृतीने हे प्राणवायूचे महत्त्व केव्हाच ओळखले होते, म्हणूनच सण कोणताही असो आम्ही निसर्गाशी मैत्री करतो.
जगदगुरु संत तुकाराम म्हणूनच वृक्षवेलींना सोयरे मानतात. निसर्ग संरक्षण, संवर्धन.. संगोपनासाठी श्रद्धेचे कथाभाग जोडून हे निसर्ग पूजनाचे संस्कार रुजविले गेलेत.
वड तर औषधी वृक्ष. याची साल.. पाने.. फळेच काय पण समिधाही जीवनाला उपकारक. वड हा मोफत प्राणवायूचा खजिनाच. शेकडो वर्षाचा सेवाव्रती. आजही विस्तिर्ण डेरेदार वृक्षाच्या सानिध्यात पिढ्यानपीढ्या सुखेनैव जगताहेत.
स्त्रीच्या जीवनात पती हा तिच्या संसाराचा प्राण. यमराजाकडून पतीचे प्राण पुन्हा परत मिळवणारी ही भार्येची.. वटसावित्रीची पूजेची कथा. ही सावित्री वटवृक्षाप्रमाणेच आपल्या पतीला सत्यवानाला दीर्घायुष्य लाभण्याचे वरदान प्राप्त करते.
सावित्री ही बुद्धिमान.. आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी जंगलात राहणारी चतुर पतिव्रता होती. प्रत्यक्ष यमाच्या कार्याआड आली. वादविवाद करुन यमाला प्रसन्न करुन घेत आपल्या पतीचे प्राण परत मिळवले. तसेच अंध सासूसासऱ्यांनाही न्याय मिळवून दिला. आता या कथाभागापेक्षा प्राणवायू देणाऱ्या वड वृक्ष महात्म्य सांगायला इथे पौराणिक कथाशी संबंध जोडलाय.
आज महिला सौभाग्यालंकाराने नटुन मनातील पवित्र सावित्रीभावाने पतीच्या दिर्घायू निरामय आरोग्याची कामना करतात. मधूर आम्रफळे.. फुले.. त्याला अर्पण करुन त्या वृक्षाचे पूजन करतात. आज उपवासही.. म्हणजेच निसर्गपूजनाला भक्तीची जोड.
सर्व सत्यवानांच्या सावित्रींना वटपौर्णिमेच्या शुभेच्छा. आपले पतीदेव यांना निरायम दीर्घायुष्य लाभो हीच शुभकामना..!
🌸🌿🌷🌳🙏🌳🌷🌿🌸
1
_वटपौर्णिमा आली गं,_
_ओटी आंब्यांन भरूया_
_सण वर्षाचा आज,_
_पूजा वडाची करूया llधृ ll_
_पतिव्रतेचा हा वसा गं,_
_सुवासिनींचे हे वाण_
_नारीजातीने करावा,_
_भोळ्या भ्रताराचा मान_
_हाथ जोडुनी देवाला,_
_प्रदक्षिणेला फिरूया_
_सात जन्माचा सोबती,_
_धनी माझा पतीदेव_
_माझ्या संसाराच्या मंदिरी,_
_लाख मोलाची ही ठेव_
_काया वाचा मने,_
_मनामंदी त्याच्या नावाला स्मरूया_
_सावित्रीच्या कुंकुवाला,_
_सत्यवानाचा गं रंग_
_औक्ष उदंड मिळावं,_
_भाव फिरे धाग्यासंग_
_भाव सात जन्माचं,_
_आशा मनात धरूया_
गीत : जगदीश खेबूडकर ✍️
संगीत : प्रभाकर जोग
स्वर : अनुराधा पौडवाल
चित्रपट : जावयाची जात (१९७९)
🌹🍃🌷🌿👩❤️👨🌿🌷🍃🌹
2️
_पतिव्रता मध्ये थोर_
_सावित्री गं सती_
_जिंकूनिया प्राण पुन्हा_
_आणिला गं पती_
_मद्रदेशी अश्वपती_
_राज्य करितो नृपती_
गुणवत
_एकुलती कन्या त्याची_
_रूप गुणवती_
_सवे घेऊनिया सेना_
_निघे वर संशोधना_
_सावित्रीने सत्यवान_
_वरीला ग चित्ती_
.......
गीत : डॉ. वसंत अवसरे✍️
संगीत : वसंत पवार
स्वर : आशा भोसले
चित्रपट : साता जन्माचा सोबती (१९५९)
🎼🎶🎼🎶🎼 🎧
__________________________________________
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा