◾गीत :- गणपती महिमा सांगणारे गाणे

🌻 आनंदी पहाट 🌻  
⚜️⚜️⚜️⚜️⚜️  
शब्दप्रभू जगदीश खेबूडकर   
       
         "माझी परंपरा कोण चालवेल ही चिंता या जगदीश खेबूडकर पोराने मिटवली".. इति गदिमा.
        आपल्या क्षेत्रातील दुसऱ्या प्रतिभावंताला दिलखुलास दाद देणारे.. कौतुक करणारे.. मोठेपणा मान्य करणारे लोक फारच थोडे. गदिमां यापैकीच एक.
        जेव्हा मराठी चित्रपटात गीतकार म्हणून गदिमांचा एकछत्री अंमल होता तेंव्हा जगदीश खेबूडकरांचा प्रवेश झाला. लवकरच हे नाव सर्वोतमुखी झाले. गदिमांचेही याकडे बारीक लक्ष होते. खेबूडकर यांची गीते विविधांगी तरीही सकस.. ते पण सहजसुलभ भाषेत हे गदिमांना मान्य होते.
        "हा.. पूढे माझीही आठवण विसरायला लावेल.." अशी गदिमांनी सर्वासमक्ष केलेली स्तुती ऐकताच तत्काळ खेबूडकर म्हणाले.. "गदिमा हे हिमालय आहेत.. मी गदिमांच्या पाऊलवाटेवर चालतोय.. त्यांचे ठसे समुद्राच्या वाळूवरचे नाहीत, तर पाषाणावरचे कधीच न मिटणारे ठसे आहेत.. मी हा हिमालय चढणार नाही, तर या भव्य हिमालयाला प्रदक्षिणा घालेल.." असे आपले शिष्यत्व खेबूडकरांनी जगजाहीर केले. एकमेकांचा सन्मान करणारी ही गुरुशिष्य जोडी.
        खेबूडकरांवरही या चौदा विद्या चौसष्ट कलेच्या अधिपतीची कृपा होती. अन्यथा एवढे लिखाण अशक्यच.
        अष्टविनायकांचे वर्णन आणि महिमा किमान शब्दांत खेबूडकर मोठ्या खुबीने असा काही सांगतात की भाविक हा महिमा ऐकून प्रत्यक्ष दर्शनाचा लाभ प्राप्त झाल्यासारखे सुखावतात. प्रत्येक संकष्टीला आवर्जून आठवणारे.. सुखावणारे.. मन प्रसन्न करणारे हे गीत.

🌹🌼🎼🌺🛕🌺🎼🌼🌹

  स्वस्तिश्री गणनायकं गजमुखं मोरेश्वर सिद्धीदम्‌
  बल्लाळं मुरुडं विनायकं मढं चिंतामणी थेवरम्‌
  लेण्यांद्रिं गिरीजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरम्‌
  ग्रामोरांजण स्वस्थित: गणपती कुर्यात्‌ सदा मंगलम्‌

  जय गणपती गुणपती गजवदना
  आज तुझी पूजा देवा गौरीनंदना
  कुडी झाली देऊळ छान काळजात सिंहासन
  काळजात सिंहासन मधोमधी गजानन
  दोहीकडे रिद्धिसिद्धि उभ्या ललना

  अष्टविनायका तुझा महिमा कसा
  दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा
  *.*
  *.*
  *.*
  मोरया मोरया मंगलमूर्ती, मोरया मोरया मयुरेश्वरा मोरया
  मोरया मोरया चिंतामणी मोरया, मोरया मोरया
  सिद्धिविनायक मोरया मोरया मोरया महागणपती मोरया, 
  मोरया मोरया विघ्नेश्वरा मोरया
  मोरया मोरया गिरिजात्मजा मोरया, मोरया मोरया
  वरदविनायक मोरया मोरया मोरया बल्लाळेश्वर मोरया,
  मोरया मोरया अष्टविनायक मोरया

🌹🎼🌹🔆🎶🔆🌹🎼🌹

गीत : जगदीश खेबूडकर

संगीत : अनिल-अरुण

  स्वर : अनुराधा पौडवाल, जयवंत कुलकर्णी, शरद जांभेकर, चंद्रशेखर गाडगीळ, मल्लेश                      🎤
  चित्रपट : अष्टविनायक (१९७९)📺

        विघ्नहर्ता सुखकर्ता गणपती बाप्पा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करोत. हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना.. !!

     ‼️गणपती बाप्पा मोरया‼️

     !! नियम पाळा, सुरक्षित रहा !!

    🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹

___________________________________________
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- 
 सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

फक्त व्यक्त व्हायला शिका...

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾थोडं मनातलं :- नवरा बायको मधील प्रेमल संवाद| Marathi Audiobook | audio story

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट