◾कविता :- तुझ्यासाठी पांडुरंगा
बोलता बोलता देवा
आली आषाढी वारी
सांग तुच आम्हा आता
कसे यावे तुझ्या दरबारी...
केलेस तुच आमचे
इथले सारे रस्ते बंद
कसा ठेवायचा देवा
तुझ्याशी आता संबंध...
तुला अशक्य नाही काही
पण तु मनात आणत नाही
आता तरी तुझ्यासाठीच
जरा आमच्याकडे पाही...
करुन टाक सारे रस्ते
कायमचेच आता खुले
तुझ्यासाठीच पांडुरंगा
खुशीत वारकरी डुले...
कवीवर्य- आत्माराम रामदास शेवाळे
'शब्दस्नेही' रा. वाघोली
ता.शेवगाव जि. अहमदनगर ८२७५२००७२०
____________________________________________
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा