◾विशेष लेख :- प्रवास... आयुष्याचा
आयुष्याच्या वळणावर अशी कही माणसे भेटतात, जी आपल्याला जगायचं कसं हे शिकवून जातात. मग शिकवणारे फक्त शिक्षक नसतात. तर आयुष्य जगताना जे अनुभव येतात, ते शिक्षणापेक्षा जास्त मौल्यवान असतात.
आज इस्लामपुरला चाललेलो, काही कामा निमित्त. एक वृद्ध, वयस्कर आजोबांनी हात केला, खुप थकलेला चेहरा होता. मी गाड़ी थांबवली, तर आजोबांनी विचारलं साखर कारखान्यावर सोडनार का?
मी हो बोललो. आणि त्यांना गाड़ीवर निट बसता येईल का, याची खात्री केली. ते हो बोलले, आणि एक अनुभवी प्रवास आमचा सुरु झाला.
मी सहज विचारलं, "आजोबा राहता कुठे?" तर आजोबानी सांगितलं पैसे नाहीत म्हणून असं हात करून जातो मी. कदाचित त्यांना मी विचारलेला प्रश्न निट ऐकता आला नसावा. मी पुन्हा विचारलं, "आजोबा राहता कुठे?" उत्तर आलं, येडे गावात.
मग ना राहून विचारलं, कुठे जाताय तुम्ही? तर साखर कारखान्यावर एका माणसाला भेटायला.
मग आजोबाना विचारलं, त्यांची ती अवस्था बघून, की तुम्ही जे बोलला पैसे नाहीत. तर आजोबा तुम्हाला मूल नाहीत का? आजोबा बोलले "दोन बोकड आहेत." मला नाही समजलं.
मी पुन्हा विचारलं, "तुम्हाला मूलं नाहीत का?" त्यांच उत्तर तेच होत.
"माझ्या मुलांमधे आणि जनावरां मधे काही फरक नाही." "असं का ?" मी प्रश्न केला.
तुम्हाला सांभाळत नाहीत का ते लोक? तर आजोबांच उत्तर खुप वेगळं होतं.
"ज्या मुलांसाठी मी पंच किलो पेढ़े वाटले जन्म झाल्यावर, आज त्या मुलांनी पांच पैशासाठीच या बापाला रस्त्यावर उतरण्याची अवस्था आणली.
ते ऐकून मन सुन्न झालं. ख़रच का माणूस वृद्ध अवस्थेत एवढा हतबल असतो? की तो काहीच नाही करू शकत? माणूस म्हातारा झाला की त्यांची किंमत संपते का? ज्या आशेने ज्या आपक्षेने जी मूलं वाढवली, तीच मूलं आज त्या बापाला रस्त्यावर उतरवतात... काय स्वप्न असतात एका बापाची? ज्या मुलाला मी जग दखवतोय, तो मुलगा मला या परक्या जगात आपलसं म्हणून हक्कानी माझ्या पडत्या काळात साथ देईल. पण जर तीच मूलं त्या बापाला वाऱ्यावर सोडून देत असतील, तर तो बाप या परिस्थिति येतो की, त्यांचा जन्म होणं हीच माझी चूक होती.
आजोबांच्या हक्काची साथ अर्धवट सूटली. त्यांची बायको वारली काही वर्षापूर्वी. तेंव्हा पासून त्यांचा हा हालाकीचा प्रवास सुरु झाला. आजोबांना विचारलं, मग मूलं संभाळत नाहीत मग जेवता कस ?
त्यांचा उत्तर होतं, रात्री एकानं सफ़रचंद दिल होतं, ते खल्लाय फक्त... हे सर्व ऐकून मन तर हेलावत होतं. तो पर्यंत आमचा प्रवास त्या शेवटच्या टप्प्यावर आला होता. जिथं कारखान्यावर त्यांना उतरायच होतं. मी न राहून विचारलं, आजोबा काही खाणार का? होकरार्थी मान हालवली.
मी आजुबाजूला पाहिलं, एक हॉटेल होतं. तिथ घेऊन गेलो. काय खाणार विचारलं, तर तिथं नाष्टा भजी आणि वडापाव होता. भजी घेतली एक प्लेट खावा बोललो. मला बोलले तुपण खा की... मी नाही बोललो, खावा तुम्ही... त्यांना विचारलं, अजुन एक प्लेट ख़ाणार का? तर हो बोलले. मी अजुन एक प्लेट सांगितली. नाष्टा पोटभर झाला. हे त्यांचा तोडूंन ऐकलं. मग अजुन खाणार का? मी विचारलं. नाही नको अस उत्तर आलं. मग बांधून घेणार का? तर एक प्लेट बांधून दिली.
मन राहावलं नाही, आजोबा जेवणाचं कस करता तुम्ही? तर आजोबांच उत्तर काळजाला भिड़णारं होतं.
तुझ्यासारखी माऊली भेटत असत्यात. तेच देत्यात मला खायला असं... अहो, पण आजोबा, असं माझ्या सारखे रोज तुम्हाला भेटत नसेल ना कोणी? मग कधी कधी उपाशी झोपावं लागतं. ज्या बापानं स्वतः उपाशी राहून त्या पोरांची हौस पूर्ण केली असेल, घशातला घास पोरांसाठी राखून ठेवला असेल, आज तोच बाप एका घासासाठी वनवन फिरतोय. खुप विचित्र होत ते सर्व.
तो विचार डोक्यात फिरत होता. चहा दिला आजोबांना. आजोबा जाताना बोलले, नाव चिट्टिवं लिहून दे तुझं. मी सांगतो माझ्या मित्राला... तूझ्या सारखा माऊली आज भेटला होता. लय उपकार झाले. आजोबा उत्तरले.
मी बोललो, आजोबा उपकार नाहीत हो. जे माझ्याकड़ून होतं, ते मी प्रामाणिकपणे केलं. तुमचा आशीर्वाद द्या फक्त बाकी काही नकोय मला.
तो निरागस हात डोक्यावरुन फिरला... असं वाटलं, एक नवीन ऊर्जा भरली जात आहे. भले आपण त्यांना ओळखत नाही, पण हे मी जे केलं ते एक माणूस म्हणून केलं, त्यांच्या नजरेत आज मी देव होतो, पण माझ्या नजरेत त्यांचं जगणं एक अनुभव होता. जो खुप मौल्यवान होता.
त्यांच्या आयुष्यतील अनुभव मला जगायच का? कशासाठी? आणि कोणासाठी? हे सांगून गेला. त्यांचा माझा प्रवास संपला होता. पण माझ्या विचारांचा प्रवास सुरु झाला होता. त्यांनी माझ्या गाडीला हात करणं, हा निव्वळ एक योगा- योग होता. पण तो अनुभव मी जगलो. ही माणुसकी होती. जगायला शिकायचं असेल, तर शाळेत जावं नाही लागत. हे आयुष्य एवढी मोठी शाळा आहे की, पावलो- पाऊली जगायला शिकवतं. फक्त शिकता आलं पाहिजे.
कुछ करने के लिए दिल बड़ा होना चाहिए.... हैसियत नही ।
लेखक: अज्ञात...
🌀🌀🌀🌀🌀🏵️🌀🌀🌀🌀🌀
_____________________________________________
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा