देणार्याने_देत_जावे ...या कवितेत विंदा म्हणतात शेवटी ... Olympics storys

#देणार्याने_देत_जावे ...या कवितेत विंदा म्हणतात शेवटी ...
                
                       #देणार्याचे_हात_घ्यावेत.

या ओळीचा नक्की अर्थ काय आहे हे मला आता या क्षणापर्यंत समजलं नव्हतं ते आत्ता उमगलं ही बातमी वाचताना.
        हल्ली असं म्हटलं जातं की जगात लोकांची संकुचित वृत्ती वाढत चाललीय. जो तो फक्त मी आणि माझं या पलिकड फारसं जायला तयार नाही. कोणी कोणाला फारसं मदत करायच्या भानगडीत पडत नाही.
 मात्र ही अशी  काही उदाहरणं ही आपल्याला कायमस्वरूपी आदर्श घालुन देतात. विचार करायला भाग पाडतात. 

कालचीच गोष्ट.

#टोकियो_ऑलिंपिक्स मधे भाला फेकीत महिलांमधे रौप्य पदक मिळवणारी  पोलंडची #मारिया_आंद्रेज्क (Maria Andrejczyk) हिची ही कहाणी.

   २०१६ साली पदक हुकलेली ही पोलंडची ॲथलिट. २०१९ साली एका मोठ्या शस्रक्रियेतुन बाहेर पडली आणि २०२१ ला रौप्य पदक मिळवलं जिद्दीनं.

   मात्र तिच्या नजरेत एक बातमी आली. पोलंड मधीलच एका आठ महिन्याच्या  Miłoszek Małysa या मुलावर  तातडीनं हृदय शस्रक्रिया अमेरिकेत करण्यासाठी मदत निधि गोळा केला जात होता. 

   या मुलासाठी लागणाऱ्या रकमेपैकी निम्मी रक्कम उभी राहिली होती. उर्वरित निम्मी रक्कम तातडीनं उभी करुन त्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी पालकांनी आवाहन केलं होतं. 
   मारियानं ही बातमी वाचुन तात्काळ निर्णय घेतला आणि एव्हड्या मेहनतीनं मिळवलेलं आपलं #ऑलिंपिक_पदक चक्क #लिलावात काढलं आणि मिळणारी रक्कम त्या मुलाला देण्याचं जाहिर केलं. 

   तिच्या या कृतिचं कौतुक होत असतानाचा लिलाव सुरु झाला आणि तिचं हे चांदीचं पदक पोलंड मधीलच एका #सुपरस्टोअर्स चेन नं #Zabka नं चक्क १,२५,००० #सव्वा_लाख_डॉलर्स ना खरेदी केलं
.
  ही रक्कम त्या मुलाच्या आईला देण्यात आली आणि पुढील सोपस्कार सुरु झाले. 

संपली गोष्ट ? नाही ... खरा ट्विस्ट इथुन पुढे आहे.

      या सुपर स्टोअर च्या संचालकांनीही एक अनोखा निर्णय घेतला आणि त्यांनीही एक घोषणा केली ..
सदरचे विकत घेतलेले मारियाचे रौप्यपदक ते  परत #तिलाच सुपूर्द करणार आहोत  आपल्याकडं न ठेवता. 

 एका बाजुला आपलं #अनमोल असं पदक या चांगल्या कामासाठी देणारी ही २५ वर्षाची सहृदय तरुणी अन तितक्याच मोठ्या मनानं ते खरेदी करुन परत करणारं  सुपर स्टोअरचं व्यवस्थापन...!!

माणसाचं मन मोठं असावं म्हणतात पण ते इतकं ? 

आपल्या आयुष्यातली सर्वोच्च कमाई इतक्या सहजपणानं देवुन टाकायला  या मुलीवर नक्की कोणते संस्कार झाले असतील ? इतक्या तरुण वयात कुठुन आली असेल एव्हडी प्रगल्भता. 
आणि त्या कंपनीनं मोठ्या मनानं ते तिलाच परत दिलं सहजपणे... समाजातली संवेदनशीलता कमी होतेय म्हणत असताना या अशा घटना कुठेतरी आशा प्रफुल्लीत करतात. 
देणाऱ्याची ऐपत नसली तरी मनात दानत हवी असं जे म्हटलं जातं ते या घटनेनं अधोरेखित केलंय परत एकदा .

तुम्ही खुल्या मनानं कोणतीही आपेक्षा न ठेवता क्रेलेली मदत परत तुमच्या पदरात कित्येक पटीनं वेगळ्या रुपात का होईना येते.

म्हणुन विंदा म्हणतात 

देणार्‍याने देत जावे
घेणार्‍याने घेत जावे
घेता घेता एक दिवस
देणार्‍याचे हात घ्यावे.

देणार्याचे हात घ्यावेत याचा मला आज उमगलेला अर्थ म्हणजे  

ज्या हातानं त्यानं दातृत्व दाखवलंय त्या हातांचा तो दातृत्वाचाच गुण घेणार्यानं आपल्या हातात घ्यावा आणि ही साखळी अशीच पुढे चालावी ..!!
मारिया आणि त्या पोलंडच्या स्टोअर्स च्या व्यवस्थापनाला मनापासून मानाचा  मुजरा 

#नतमस्तक_मिशि

टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

आपली सहल खूप छोटी आहे ... Short Tour

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट