◾विशेष लेख :- टर्निंग पॅाईंट..

‘टर्निंग पॅाईंट..!’ 
           १० वर्षापूर्वी नुकत्याच लागलेल्या नवीन नोकरीवरून घरी परत येताना तो भयानक ॲक्सीडेंट झाला.डॉक्टरांनी दोन्ही हात कोपरापासून काढण्याशिवाय पर्यायच नाही हे सांगितले.फार मोठा धक्का होता तो घरच्यांसाठी.
वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी ही घटना घडल्याने भविष्याचा विचार केला की फक्त अंधार दिसायचा.
किती मेहनतीने,हुशारीने प्रतिष्ठीत आय आय टी मधे कॉम्प्युटर इंजिनीरिंग मिळवून मी सर्वोत्तम संस्थेत शिरलो होतो.खूप सारी स्वप्न घेऊन!
ही घटना माझं पूर्ण आयुष्यं हादरवून टाकणारी होती.
अनेक शस्रक्रियांनंतर शेवटी दोन्ही हात कृत्रिम बसवायचा सल्ला दिला डॉक्टरांनी.. घरात एकच भयाण वातावरण पसरलं होतं पण दुसरा पर्यायच नसल्याने कृत्रिम हात रोपण शस्त्रक्रीया करावीच लागली.
रोज स्वत:चे असे हात बघून आयुष्यं खरंच जगायचं का ?हाच विचार मनात येऊन जायचा. 
मनातून  तर जवळ जवळ संपलो होतो मी.दोन महिने झाले आणि त्या सततच्या परावलंबित्वाची, त्या सहानभूती भरलेल्या नजरांची  अक्षरशः किळस यायला लागली होती.
अनेक मित्र,नातेवाईक समजवायला यायचे.आयुष्यं असं थांबवून चालत नाही जगावंच लागतं वगैरे सगळं.
दुसऱ्याला सांगणं सोपं असतं वेळ स्वतःवर आलीकी कळतं, हे मला पूर्ण समजलं होतं.आता त्या सूचनांचा रागही येणं बंद झालं होतं.आयुष्यं संपवण्याचा विचार हजारदा मनात येऊन गेला. पण आईबाबांकडे बघितलं की वाटायचं माझे हात गेले तर माझी अशी अवस्था झाली,मी तर त्यांच सर्वस्व आहे.मी त्यांना आयुष्यातून उठवू शकत नाही.
कुठलाही संकटकाळ असो जग पुढे जातंच राहतं....तसंच आषाढ संपून श्रावण महिना आला आणि घरोघरी सणाचे वेध लागले होते...
घरात कोणालाच काही साजरं करायची आतून पूर्ण इच्छा संपली होती. पण 
बाकी काही असलं तरी गौरी गणपती आले की त्यात काही हयगय आईला चालायची नाही.
देवावर प्रचंड श्रद्धा आईची.आपलं काहीतरी चुकलं असणार मागच्या वेळेस म्हणून आपल्या शेखरच्या बाबतीत असं झालं हीच चुटपुट तिचं मन खात होती. त्यामुळे ह्यावर्षी श्रद्धेचं रूपांतर थोड्या भीतीत झालं होतं.घराची साफसफाई करण्यापासून आईने सगळं करायला घेतलं.बघता बघता श्रावण संपत आला घरी बाप्पा येण्याची सर्व तयारी झाली.
आज बाप्पा घ्यायला जायचं होतं....आम्ही ३,४ कुटुंब एकत्रच जायचो.
 मोठमोठ्या दुकानात न जाता थेट मूर्तिकारांकडून गणपतीची मूर्ती घ्यायचा आमचा नियम होता.मला मुळीच जायची इच्छा नव्हती, मनातल्या मनात त्या देवाशी रोज भांडायचो मी .ज्या हातांनी इतके वर्ष पूजा करून घेतली होती आईने तेच हात देवाने माझ्यापासून  नेले होते.
गणपती आणायला म्हणून नाही निदान चक्कर मारून होईल म्हणून चल असे म्हणून सगळ्या मित्रांनी,आईबाबांनी बळजबरी गाडीत घातलं.
मी जगतच माझ्या घरच्यांसाठी होतो त्यामुळे झापडं लावल्यासारखा खिन्न मनाने त्यांच्याबरोबर निघालो.. 
दरवर्षी प्रमाणे मूर्तीकार शंकर काकांकडे पोहोचलो आम्ही.शंकर काका हे नाव लोकांनी खास दिलेलं होतं त्यांना त्यांचं मूळ नाव काय हे आता बहुदा त्यांनाही आठवत नसावं.
गणपती बाप्पाची जन्मदात्री देवी पार्वती असली तरी त्याला गणपतीरूप देणारे भगवान शंकर होते.त्यामुळे गावातले सगळ्यात उत्तम गणपती कारागीर म्हणून गावातल्या लोकांनी त्यांना शंकरकाका म्हणायला सुरुवात केली.
माझ्या अपघातानंतर ते पहिल्यांदाच मला बघणार होते.मला परत एकदा अनेक प्रश्नांना सामोरं जायचं होतं. मी बाजूला पडलेली एक खुर्ची घेऊन तिथे बसलो होतो.बाकीचे सगळे गणपती बघत होते. 
तेवढ्यात काका आले आणि शिल्पकाराची नजर ती ताबडतोब माझ्या कृत्रिम हातावर गेली.
ते काही विचारणार तेवढ्यात मी म्हणालो, “ज्या हातांनी इतके वर्ष गणपती उचलून नेले ते हातच बाप्पा घेऊन गेला काका माझ्याकडून.आता हे उसने हात घेऊन जमेल तसं जगायचं”
"शेखरभाऊ नशीबवान आहात तुम्ही बाप्पाच्या पंक्तीतले झाले आता... बाप्पाकडेपण त्यांचा मूळचेहरा नाहीच की,
तो काळ असा होता की रागाच्या भरात शंकराने शीर धडावेगळं केलं त्यामुळे हत्तीचं तोंड बसवावं लागलं गणपती बाप्पाला .
पण आजच्या काळात किती प्रगती झाली बघा तुम्हाला कृत्रिम का होईना हाताच्या जागी हात बसवले आहेत.
 गणपती बाप्पाची सगळं जग आज बुद्धीची देवता म्हणून पूजा करतं कारण आपल्यात निर्माण झालेलं व्यंग त्यांनी वैशिठ्य असल्यासारखं जगासमोर ठेवलं.
सगळे देव मानव साच्यात असतांना फक्त गणपती गजमुखात आहे पण जगात सगळ्यात जास्त घरांमधे सापडणार लाडकं आराध्य दैवत आहे.. 
दादा बघा तुम्ही तुमच्यावर आलेली ही आपत्ती संधी म्हणून वापरायचं ठरवलं तर तुम्हीसुद्धा घरोघरी पोहोचाल.
तुमचे फक्त हात कृत्रिम आहेत माणूस अजूनही तुम्ही तोच आहात.”
माझ्या अपंगत्वावर इतकी सकारात्मक प्रतिक्रिया त्या दिवशी मी पहिल्यांदा ऐकली.. मूर्ती घडवताना अवयवांना आकार देणाऱ्या त्या हातांनी माझ्या मनावर संजीवनी फिरवली होती.
अचानक मला माझे हात न दिसता बाकीचं शरीर जाणवायला लागलं होतं,त्या जीवघेण्या अपघातात वाचलेलं ते आख्ख शरीर मला गेलं वर्षभर जाणवलंच नव्हतं .
दोन हात सोडले तर मी बाकी पूर्णपणे धडधाकट होतो हे अचानक माझ्या लक्षात आलं होतं.इतके दिवस रोज उठून नसलेल्या हातांकडे बघण्यात मी माझ्या बाकी वाचलेल्या शरीराकडे दुर्लक्ष करत आलो होतो.
कृत्रिम का होईना आज हाताच्या जागी हात होते.बाप्पाला तर गजमुख असूनही ते साजरं होतं हा विचार कोणी शिकलेल्या माणसाने मला दिला नव्हता तर असंख्य गणपतींना मूर्तरूप देणाऱ्या शंकर काकांनी दिला होता.
त्या विचारांनी जागी झालेली ही सकारात्मक ऊर्जा,आयुष्यं जगायची इच्छा घरोघरी पोहोचवायचा प्रण केला मी.
दोन कृत्रिम हात आणि कॉम्पुटर च घेतलेलं ज्ञान ह्याच्या मदतीने वेगवेगळे  कार्यक्रम बनवायला सुरुवात केली.आज १० वर्ष झाली साडे अकराशेच्या वर शोज मी इन्फ्लुएन्सर म्हणून केले आणि आज ज्या नामांकीत शिक्षण संस्थेत मी माझं शिक्षण घेतलं त्या संस्थेने आज मला सन्मानाने इथे तुमच्यासमोर बोलावलं आहे.
करोडो लोकं त्यांच्या अपंगत्वावर मात करण्यासाठी आवर्जून माझ्या कार्यक्रमांना येतात.प्रत्येकात बाप्पाचा अंश आहे गरज असते ती त्याची जाणीव व्हायची.
‘एखादी गोष्ट वेगळी असणं आपलं व्यंग नसून वैशिष्ठ्य आहे !’
ह्या विचाराने सुरुवात केली तर आयुष्यात खूप मोठी झेप घेणं अशक्यं नाही. 
माझा तो अपघात झाला नसता तर एखाद्या कंपनीत नोकरी करत कुठेतरी पोहोचलो असतोच .पण आज जी उंची मला मिळाली ती त्या घटनेनंतरच.घरोघरी पोहोचायचं माझं स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण झालं.
मित्रमैत्रिणीनो कुठलंही काम अशक्य नाही आयुष्याला दिशा देणारा टर्निंग पॅाईंट कधीही येऊ शकतो. एकदा गणपती बाप्पा मोरया म्हणा आणि श्रीगणेशा करा.. ! 
धन्यवाद !
प्रिंसिपल सरांनी शेखरला कडकडून मिठीच मारली!
हे सर्व ऐकून संपूर्ण सभागृह जागीच उभे राहिले आपल्या दोन हातांनी टाळ्यांच्या कडकडाटात शेखरच्या कृत्रिम हातांची प्रेरणादायी कथा प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्शून गेली होती.. एका वेगळ्या उर्जेचा संचार झाला होता सगळ्यांच्या मनात..
आयुष्याला कुठल्या दिशेने घेऊन जायचं हे एकदा मनाशी पक्क ठरवावं लागतं.चमत्काराला नमस्कार होणारच मग तो ईश्वराने घडवलेला असो किंवा सामान्य माणसाने.. नाहीका ?
😊😊
=======================


टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- 
 सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

मस्त आयुष्य जगण्याचा स्वस्त फंडा - एक मजेशीर गणित

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

निसर्ग किमया कि देवता ... Mother Nature

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

फक्त व्यक्त व्हायला शिका...

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...