◾गझल :- मंगेश शिवलाल बरई यांच्या निवडक गझला
'एकदा तरी'
एकदा तरी..
स्वप्नात माझ्या येउन जा,
वेदना 'ती' देऊन
भावना माझ्या रिझवून जा,
मन वेडे,
गीत तुझेच गाते चांदण्यात,
शब्दांचा गोडवा त्यांना देऊन जा,
रुप तुझे,
साठवले नजरेत
रंग त्यात भरवून जा,
सामावलेली आठवणीत तू,
आठवणींना माझ्या
एकदा झूलवून जा,
एकदा तरी...
स्वप्नात माझ्या येऊन जा.
मंगेश शिवलाल बरई.
हिरावाडी, पंचवटी, नाशिक-४२२००३.
_____________________________________
'तुझ्या श्वासांना...'
तुझ्या श्वासांना विचार
ते मला विसरले का ?
काया देऊन त्यांनी...
प्राण माझे,
विकत घेतले का ?
प्रेमाचं कोडं
त्यांना जमलं का ?
ह्रुद्यातलं,
भावविश्व अगदीच आटलं का ?
माझ्या स्वप्नातली नायिका
स्वप्नातच राहीली का ?
प्रीतीत,
काही घडीची प्यास बुजवली का ?
मंगेश शिवलाल बरई.
हिरावाडी, पंचवटी, नाशिक ४२२००३.
______________________________________
' तमन्ना '
धुंद असू दे,
कविता तुझी,
शब्दात हरवण्यासाठी,
गंध असू दे,
प्रितीला तुझ्या,
यौवनात माझ्या दरवळण्यासाठी,
पंख असू दे,
भावनांना तुझ्या,
ह्दयात माझ्या भरारी घेण्यासाठी,
लाली असू दे,
तुझ्या गालीची,
प्रितीची कहाणी माझ्या आठवण्यासाठी,
अश्रू असू दे,
तुझे....
दुख: माझे वेचण्यासाठी.
मंगेश शिवलाल बरई.
हिरावाडी, पंचवटी, नाशिक ४२२००३.
संपर्क ९२७१५३९२१६.
______________________________________
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा