◾ललित लेख :- प्रेमाचा खरा अर्थ

❗🌸 प्रेमाचा खरा अर्थ 🌸❗

 ❤️  प्रेम म्हणजे नक्की काय? या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाकडे वेगवेगळे असू शकेल. माझे स्वतःचे असे मत आहे की खऱ्या प्रेमाचा अर्थ हा खूप व्यापक, सर्वदूर   सर्वसमावेशक, अनंत आहे. प्रेम म्हणजे जीवन आहे
  
❤️ खरे प्रेम आपणाला समर्पण, त्याग, निष्ठा, स्वतःला पूर्णपणे  झोकून देणे, कुठल्याही फळाची अपेक्षा न करता निरंतर कार्यरत राहणे शिकवते.

 ❤️  प्रेम हे सर्व विश्वव्यापी, कणाकणात, सगळीकडे ओतप्रोत भरलेले असून त्याची प्रचिती आपल्याला नित्य येत असते परंतु आपणाला हेच प्रेम आहे  हेच समजत नाही.
 
 ❤️  आजही  समाजात बऱ्याच लोकांनी प्रेमाची व्याख्या ही अत्यंत संकुचित व मर्यादित स्वरूपात आपल्याला  जशी  पाहिजे  तशी  केलेली आहे.   प्रेमाची व्याख्या करणे खूप अवघड आहे. शब्दांच्या चौकटीत आपण प्रेमाला बांधू शकत नाही. प्रेमाचा आवाका किंवा व्याप्ती प्रचंड मोठी आहे. माझे तर असे स्पष्ट मत आहे की  खूप जणांना अजून खरे प्रेम म्हणजे काय व प्रेमाची ताकद अद्यापही कळून, उमजून आलेली  नाही व त्यामुळे  त्यांना  खऱ्या प्रेमाची अनुभूती सुद्धा आलेले नाही.

 ❤️  खरे निस्वार्थी प्रेम आपणाला आनंदाने, आपले सर्व दुःख  बऱ्यापैकी विसरायला लावून खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जगायला शिकवते व आपला   समाजाकडे बघण्याचा दृष्टीकोन अत्यंत व्यापक व परिपूर्ण होतो  प्रेमाने आपण आपल्या शत्रूच्या मनातील गैरसमज दूर करून त्यालाही आपला मित्र बनवू शकतो एवढी प्रचंड ताकत प्रेमामध्ये आहे

❤️  प्रेम कोणावर करावे?  सर्वप्रथम प्रेम स्वतःवर करावे. त्यानंतर घरातील  सर्व सदस्यांवर, नातेवाईक, मित्रमंडळी, आपल्या कामावर, पक्षांचा चिवचिवाट, गाईचे हंबरणे,पशु, पक्षी प्राणी, हवा, नभातुन बसणाऱ्या टपोऱ्या थेंबावर, नवीन पुस्तकाच्या  सुवासावर, नदी, नाले, वेलींच्या पानावरील  दवबिंदुंवर,  कोकिळेच्या मधुर स्स्वरावर, एखाद्या नर्तकीच्या लयबद्ध  पदलालित्ययावर, विविध प्रकारच्या वाद्यातून बाहेर पडणाऱ्या स्वर्गीय सुरांवर, गायकांच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या सुरेख गाण्यांवर, श्वासाच्या लयीवर, समुद्रातील लाटांवर, मोगऱ्याच्या  फुलाच्या वासावर, आकाशात स्वच्छंदपणे उडणाऱ्या गरुडावर, मोराच्या पिसावर, कृष्णाच्या बासरीवर, लेखणीतून उमटणाऱ्या शब्दांवर, तलवारीच्या पात्यावर, लहान बाळाच्या निरागस हास्यावर,  डोळ्यातुन ठिबकणाऱ्या अश्रूंवर, सूर्याच्या तप्त उष्णतेवर, चंद्राच्या शीतलतेवर, अग्नीच्या    दाहकतेवर, समुद्राच्या लाटांवर,  शंकराच्या जटावर, सरस्वतीच्या विणेवर, मीरेच्या भक्तीवर,    देवळातील  घंटेच्या आवाजावर, शबरीच्या  ऊषट्या बोरावर,   राधेच्या कृष्णावरील प्रेमावर, लक्ष्मण व भरत यांच्या बंधू प्रेमावर,  छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेल्या स्वराज्यावर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची महाराजांच्या प्रती असलेल्या निष्ठेवर, एखादी व्यक्ती  हसत असताना त्याच्या गालावर  पडलेल्या खळीवर,अर्जुनाच्या धनुष्यावर, सोसाट्याच्या वाऱ्यावर,आजी आजोबांच्या चेहऱ्यावर वयोमानानुसार पडलेल्या सुरकुत्यांवर, वारकऱ्यांच्या टाळावर इत्यादीवर.

❤️   प्रेम कुणावर, कशावर करावे  हे ठरवून किंवा जाणून बुजून करता येत नाही ते कधी व केव्हा कोणावर होईल हे आपल्याला बऱ्याच वेळा कळतही नाही. प्रेम फक्त सजीव वस्तूंवर करायचे नसून या विश्वातील सर्वच सजीव व निर्जीव वस्तूंवरही करावयाचे असते.

 ❤️  प्रेम माणसाला कोणाशी कसे बोलावे, वागावे, इत्यादी शिकवते प्रेमाची अनुभूतीही अत्यंत सुंदर, आनंददायक, अल्हाददायक,  आश्वासक असते. आपल्या  सर्वांशी प्रेमपूर्ण वागण्यामुळे आपले जीवन खऱ्या अर्थाने परिपूर्ण होऊन आपण सुखी निरोगी आयुष्य व्यतीत करू शकतो.

✍🏻 लेखक : आनंद रुद्रप्पा हूलगेरी
1,पर्ल रेसिडन्स,मिरानगर,
जुळे सोलापूर,सोलापूर.
पिन--413008
भ्रमणध्वनी ---
📲 9175087388 / 8208306246

असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी आमचे YouTube चैनल सबस्क्राईब करा

दररोज प्रेरणादायक माहिती वाचण्यासाठी खालील Whatsapp व Teligram समुहा मध्ये सहभागी व्हा 

-{ आणि लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-

📱आवडल्यास नक्की शेअर करा📱

धन्यवाद

ह्या पैकी काय वाचायचे आहे ❓

टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

◾विशेष लेख :- प्रारब्धवशात जे आहे तेच होते...उदाहरणासकट

फक्त व्यक्त व्हायला शिका...

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट