स्वप्नभंग | मराठी कविता | marathi poem
विषय :- स्वप्नभंग लाख मोलाचे अश्रू माझे आठवणीत तुझ्या किती रडत बसू ? नाही आधार तुझा डोळे पुसावया मग का तरी मी तुझ्यावर रुसू ? जन्मोजन्मीची गाठ आपुली ती सत्य वचने दिलंस तू मला हातात हात तुझा नी माझा प्रेम माझं कळलं तरी काय तुला ? बाबांच्या शब्दाबाहेर जाण्याची हिम्मत तरी का नव्हती तुझ्यात बोलके नव्हते तुझे डोळे तरीही नजरेने घायाळ केलंय तुझ्या प्रेमात स्वप्न भरले ते डोळ्यांत माझिया दोघांच्या प्रेमळ सुखी संसाराचे मला कधी का कळालेच नाही ? फसवे होते सगळं फक्त एकट्याचे शेवटी एकांतात पडली मी अशी बघत बसली सख्या वाट तुझी खऱ्या प्रेमात स्वप्न नक्की भंगतेच चूकभूल असावी त्यात थोडी माझी स्वप्नांना अशी कुरुवाळीत मी दुरावा तो अंतरीचा अपुल्यात स्वप्नभंग करुनिया माझे तू कधीचा राहिला ना आता माझ्यात कु. सोनाली कोसे, डोंगरगाव ( बुज.) ___________________________________________ टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅