आमचाही एक 'जमाना' होता

आमचाही एक 'जमाना' होता ..

पाचव्या इयत्तेपर्यंत पाटीवरची लेखणी जिभेने चाटत कॅल्शियमची कमतरता भरून काढायची आमची जन्मजात सवय होती.😅😅

अभ्यासाचं टेन्शन आम्ही पेन्सिलीचं मागचं टोक चावून झेललं होतं...🤪

पास / नापास हेच आम्हाला  कळत होतं... % चा आमचा संबंध कधीच नव्हता.😛

शिकवणी लावली, हे सांगायला लाज वाटायची.... कारण  "ढ" असं हीणवलं जायचं...🤣🤣🤣

पुस्तकामध्ये झाडाची पानं आणि मोरपिस ठेवून आम्ही हुशार होऊ शकतो, असा आमचा दृढ विश्वास होता...☺️☺️

कापडाच्या पिशवीत पुस्तकं आणि वह्या रचण्याचा शिरस्ता हे आमचं एक निर्मितीकौशल्य होतं.😁

दरवर्षी जेव्हा नव्या इयत्तेचं दप्तर भरायचो त्याआधी, पुस्तकं आणि वह्यांना कव्हर्स घालणे, हा आमच्या जीवनातला एक वार्षिक उत्सव असायचा...🤗

आई वडिलांना आमच्या शिक्षणाची फारशी फिकीर नव्हती आणि ना ही आमचे शिक्षण त्यांच्यावर फारसा बोजा होते. वर्षानुवर्षं आमच्या आईवडिलांची पावलं कधी आमच्या शाळेकडे वळत नव्हती आमच्यामध्ये टायलेंट च तेवढं होतं...🤭🤗🤭

एका मित्राला सायकलच्या पुढच्या दांड्यावर व दुसऱ्याला मागच्या carrier वर बसवून, आम्ही रस्तोरस्ती किती फिरलो हे आता आठवतही नाही... बस्सं!......काही धूसर आठवणी उरल्यात इतकंच.......!!🥸😎

शाळेत मार खाताना आणि पायांचे अंगठे धरुन उभं राहताना आमचा 'ईगो' कधीही आडवा येत नव्हता, खरं तर आम्हाला 'ईगो' काय असतो हेच माहीत नव्हतं...🧐😝

मार खाणं, ही आमच्या दैनंदिन जीवनातील एक सामान्य प्रक्रिया होती. मारणारा आणि मार खाणारा दोघेही खुष असायचे. मार खाणारा यासाठी की, 'चला, कालच्यापेक्षा तरी आज कमी धोपटला गेलो म्हणून आणि मारणारा आज पुन्हा हात धुवून घ्यायला मिळाले म्हणून......😜🤣😜

आम्ही आमच्या आईवडिलांना कधी सांगूच शकलो नाही की, आम्ही तुमच्यावर किती प्रेम करतो, कारण आम्हाला 'आय लव यू' 🥰🥰🥰 म्हणणं माहीतच नव्हतं...

आज आम्ही असंख्य टक्के टोमणे खात, संघर्ष करत दुनियेचा एक हिस्सा झालोय. काहींना जे हवं होतं, ते त्यांनी मिळवलंय तर काही 'काय माहीत....? कुठे हरवलेत ते...!😇😇

आम्ही जगात कुठेही असू पण हे सत्य आहे की, आम्ही वास्तव दुनियेत जगलो, आणि वास्तवात वाढलो.🙃😉🙃

कपड्यांना सुरकुत्या पडू न देणं आणि नात्यांमध्ये औपचारिकता जपणं आम्हाला कधी जमलंच नाही. त्या🎈 बाबतीत आम्ही मूर्खच राहिलो.

आपल्या नशिबाला कबूल करून आम्ही आजही स्वप्नं पहातोय. कदाचित ती स्वप्नच आम्हाला जगायला मदत करतायत नाहीतर जे जीवन आम्ही आतापर्यंत जगलोय त्याची वर्तमानाशी  काहीच तुलना होणार नाही.😌😗😌

     आम्ही चांगले असू किंवा वाईट, पण
 *आमचाही एक 'जमाना' होता*.✨                                            आपलाच 
 मित्र

टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

फक्त व्यक्त व्हायला शिका...

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट