बोधकथा - जे होते ते भल्यासाठीच होते

पूर्वीच्या काळातील घटना आहे.
एक राजा होता त्याचा एक खास मंत्री होता. जो मंत्री  होता त्याचे वडील नेहमी त्याला सांगायचे." जे होत ते चांगल्या साठीच होतं."
 त्यामुळे त्या मंत्र्याच्या तोंडात ते वाक्य नेहमी यायचं. 

असंच एक दिवस मंत्री आणि राजा बसले असताना राजा  तलवारीला धार किती आहे हे बघत होता. हे बघत असताना तलवारीवरुन हात फिरवताना राजाच्या हाताच्या करंगळीचा थोडासा भाग कापला गेला . लगेच मंत्री सवयी प्रमाणे राजाला म्हणाला. 
*"  जे होत ते चांगल्यासाठी होत ."*
माझी करंगळी कापली हे चांगलं झाल का ? राजाला राग आला त्याने मंत्र्याला तुरूंगात   पाठवलं. 
तरीही तो मंत्री म्हणाला 
*" जे होत ते चांगल्यासाठी होतं ".*
राजा म्हणाला आत हवा खात बस काय चांगलं होत ते बघ.
             
       दुसऱ्या दिवशी राजा शिकारीला निघाला त्याला जंगलात हरिण दिसले. हरणाचा पाठलाग करत राजा घोडयावरुन चालला होता . घोडा वेगाने पळत होता. राजाचे सर्व केस विस्कटलेले होते . कपडे खराब झाली . राजा पुर्ण थकला पण हरिण काही सापडले नाही. रस्ताही चुकला... शेवटी राजा कंटाळून एका झाडाखाली बसला.

    तेवढयात तिथे काही लोक आले. त्या काळात यज्ञाला नरबळी देण्याची प्रथा होती. त्या लोकांना त्यांच्या यज्ञासाठी नरबळी पाहिजे होता. नेमका त्यांना राजा असा विस्कटलेल्या अवस्थेत झाडाखाली बसलेला सापडला. त्यांनी राजाला पकडला आणि जिथे यज्ञ होता तिथे घेऊन गेले. 

 यज्ञातील नरबळीसाठी शरीराचा एखादा अवयव खंडित झालेला चालत नाही . त्या लोकांनी राजाला संपूर्ण तपासलं तेव्हा त्याची करंगळी खंडिंत दिसली. 
यज्ञाला खंडिंत अवयवाचा बळी चालत नाही. म्हणून राजाला सोडून दिले. 

    तेव्हा राजाला मंत्र्याची आठवण आली आणि मंत्र्याचे ते शब्द आठवले... 
*"जे होत ते चांगल्यासाठी होतं."*

    राजा दरबारात आला. त्याने मंत्र्याला तुरूंगातून बाहेर काढलं. " जे होत ते चांगल्यासाठी होतं " हे माझ्या बाबतीत सिद्ध झालं. तु तर तुरूंगात होतास तुझ्यासाठी काय सिद्ध झालं .
    मंत्री म्हणाला मी तुमचा खास मंत्री  तुम्ही शिकारीला जाताना मला नेहमी बरोबर घेऊन जाता .  यावेळी मला नेले असते. तुमची करंगळी खंडित झाल्यामुळे तुम्ही  
वाचला असता. पण मी खंडित नसल्यामुळे माझा नरबळी दिला असता. 
राजाला ते पटले
*"जे होतं ते चांगल्यासाठी होतं."*

*🔅तात्पर्य :~*

 *आपल्या आयुष्यात काही गोष्टी अशा सहज होतात ज्या आपल्या  इच्छेविरूध्द घडतात. त्यावेळी जर असा  सकारात्मक  विचार केला तर...*
 *जे होत  ते चांगल्यासाठी होतं.*

टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

आपली सहल खूप छोटी आहे ... Short Tour

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट