पोस्ट्स

◾बोधकथा :- शेवटी मी आई आहे

इमेज
एलीस हि महाराणी व्हिक्टोरिया यांची मुलगी होती. लग्नानंतर तिला मुलगा झाला. मुलाची देखभाल करण्यासाठी राजवाड्यात नोकर-चाकरांची काही कमी नव्हती. तरीही एलीस लहान बाळाची खूप काळजी घेत असे. सतत त्याच्या सोबत राहून ती त्याची देखभाल करीत असे. तो क्षणभर जरी दृष्टीआड झाला तरी तिला चैन पडत नसे. तिचा मुलगा मग १० वर्षाचा झाला. एके दिवशी त्याला संसर्गजन्य रोगाची लागण झाली. तज्ञानी त्याच्यावर उपचार सुरु केले. डॉक्टरांनी तपासणी करून सल्ला दिला कि काही दिवस सर्वांनी याच्यापासून दूर राहावे कारण हा अतिशय जीवघेणा संसर्ग असून तो श्वासोच्छवासाद्वारे फैलावू शकतो. त्यामुळे त्याच्या संपर्कात कुणीही येवू नये. या डॉक्टरांच्या सांगण्यामुळे सर्व नोकरांमध्ये भीती पसरली. कोणीही नोकरचाकर किंवा कुणीच त्याच्या खोलीत जायला तयार नसे. परंतु एलीसने त्या परिस्थितीतही मुलाला एकटे सोडले नाही.ती त्याची सेवा करतच राहिली.एके दिवशी मुलगा म्हणाला,"आई ! बरेच दिवस झाले तू माझी पापी घेतली नाही, मला कुशीत घेतले नाही." शेवटी आईचेच हृदय ते !! एलीसने मुलाला जवळ घेतले व मायेने त्याला कुरवाळले, त्याची पापी घेतली. बरेच वेळ ती त्याच

◾बोधकथा :- नियोजन

इमेज
राजापूरात प्रतिक नावाचा राजा राज्य करत होता. तो अत्यंत बुद्धिमान, निडर, चतूर आणि कनवाळू होता. एकदा एक मोठे ज्योतिषी या नगरात अवतरले. राजाही त्यांच्याकडे नगराचं भविष्य जाणून घेण्यासाठी गेला. राजा ज्योतिषाला म्हणाला, "महाराज, मला माझ्या भविष्याची काळजी नाही. पण माझ्या प्रजेची काळजी मात्र नक्कीच आहे. प्रजेवर काही संकट येणार असल्यास सांगा. " ज्योतिष महाराजांनी आपल्या झोळीतून काही पुस्तकं काढून वाचायला सुरुवात केली. त्यांचा चेहरा चिंताग्रस्त दिसू लागला. ते राजाला म्हणाले, "मी सर्व गोष्टींची नीट पाहणी केली आहे. त्यावरुन असं दिसतंय की येणा‍ऱ्या वर्षांत तुमच्या प्रजेवर दुष्काळाचं मोठं संकट येणार आहे. जर तुम्ही योग्य नियोजन आणि निर्णय घेतलात तर या संकटामुळे प्रजेचं फार नुकसान होणार नाही." ज्योतिषी निघून गेले पण राजाच्या मनातून तो विचार जात नव्हता. मग राजाने वेषांतर करून राज्याचा फेरफटका मारण्याचा निर्णय घेतला. त्यांना असं लक्षात आलं की, प्रजा खूपसं अन्न आणि पाणी वाया घालवते. त्यांनी प्रजेला समजावण्याचा प्रयत्न केला पण कोणीच ऐकण्याचा मनस्थितीत नव्हतं. ज्योतिषी महाराजांच्या वक

◾बोधकथा :- गौतम बुद्धांकडून जीवनाचा मंत्र | free Marathi Audiobook

इमेज
Inspirational Story Of Gautam Buddha In Marathi       आम्हाला येथे नक्की फॉलो करा एक शेतकरी खूपच उदास त्याच्या घराजवळ बसला होता. तेव्हा त्याच्या जवळ एक व्यक्ती आला तो शेतकरी त्या व्यक्तीला आपली व्यथा सांगू लागला. त्या व्यक्तीने त्या शेतकऱ्याला गौतम बुद्धांकडे जाण्याचा सल्ला दिला. गौतम बुद्ध त्यावेळेस शेजारच्याच एका गावामध्ये आले होते. तो शेतकरी या व्यक्तीचे हे वाक्य ऐकत भगवान बुद्धांकडे गेला. भगवान बुद्धांकडे गेल्यानंतर तो त्यांना आपली व्यथा सांगु लागला. “भगवान बुद्ध मला मी एक शेतकरी आहे मला शेती करणे आवडते. परंतु ज्या वेळेस मी काही माझ्या शेतामध्ये पेरतो त्यावेळेस मला त्यातून काहीच मिळत नाही. एकेकाळी पाऊस जास्त होतो आणि दुसऱ्या वेळेस पाऊस काहीच होत नाही त्यामुळे माझे फारच नुकसान झाले आहे मला आता काहीच समजत नाहीये मी काय करू आणि काय नाही. मला दोन वेळचे जेवण देखील मिळणे कठीण होत आहे.”  गौतम बुद्ध त्या शेतकऱ्याचे बोलणे शांती पूर्वक ऐकत होते. तो शेतकरी पुन्हा बोलू लागला गौतम बुद्ध मी एक विवाहित आहे. मला माझी पत्नी आवडते पण कधी कधी ती मला टोचून बोलत असते आणि त्रास देत असते. त्यामुळे आमच्या

◾आरोग्य :- 7 प्रकारच्या विश्रांती..प्रकार

इमेज
7 प्रकारच्या विश्रांती.. दिवसभर खूप दगदगिचे काम करून थकून आपली सगळी एनर्जी संपलेली असते. थकवा घालवण्यासाठी आपण छान झोप घेतो. मस्त झोपून उठल्यानंतर जरा फ्रेश वाटतं , बरोबर ना ? झोप आणि आराम यात नेमका फरक काय असतो ? आपण मस्त झोप पूर्ण केल्यानंतर आपल्याला एकदम फ्रेश वाटायला लागतं, आपल्यामध्ये एनर्जी येते. झोप पूर्ण करणे म्हणजेच आपल्याला गरज असलेल्या विश्रांतीची पूर्तता करणे नक्कीच नाही. आपण जीवनात विश्रांतीचे महत्व जाणून घेत नाही त्यामुळे आपल्यामध्ये कायम विश्रांतीची कमतरता भासते. आपल्या जीवनात या विश्रांती सम प्रमाणात असणं अत्यंत महत्त्वाचे आहे. शरीराला आणि मनाला आवश्यक असे विश्रांतीचे 7 प्रकार असतात. ते आपण सविस्तरपणे पाहुयात.                     शारीरिक विश्रांती                       आपण झोपतो किंवा थोडा वेळ पडून एक डुलकी काढतो त्याला सक्रिय विश्रांती असे म्हणल जात. यासोबतच निष्क्रिय विश्रांती पण असते, जी आपल्या निरोगी आरोग्यासाठी मदत करत असते. योग , स्ट्रेचिंग , मसाज केल्याने निष्क्रिय विश्रांती मिळत असते.                   मानसिक विश्रांती                      दिवसभर दग दग कर

◾कविता :- ध्येयाचा पाठलाग

इमेज
ध्येयाचा पाठलाग       आकाशी घेती झेप पक्ष्यांचे लक्ष थवे, सुंदर सकाळ आली घेऊन नयनी स्वप्न नवे.. तुझ्या प्रत्येक पावलाला  जरी इथे ठेच आहे , ध्येय येईल तोपर्यंत फक्त चालायचे आहे ... येतील अनेक अडथळे या काटेरी मार्गात , तरीही तुला उरायच  आपण ठरवलेल्या सत्कार्यात ... नव्या मार्गाला गवसणी जिद्दीने घालशील , तूझ्या ध्येयाचा पाठलाग पूर्ण मेहनतीने करशील ... ठेव स्वतःवर विश्वास होणार आहे तू यशस्वी, गाठणार आहे शिखर कारण प्रयत्न असतील अगदी मनस्वी...                   रचना भूषण वसंतराव बोबडे मु.पो.ता.कोरपना.जि.चंद्रपूर Mo.no.7030109369,8080502076 __________________________________________ टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-   सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅       आम्हाला येथे नक्की फॉलो करा

◾कविता :- जगण्याचा आनंद

इमेज
वातावरण नाही मुक्त आला आकृतीबंध  विस्तारलेल क्षितीज मृदेचा गेला गंध ... प्रियजनांचा सहवास ठरला आहे भास  भेटिगाठी नाहीत ना जगणं  दिलखुलास .... निसर्गाच्या सानिध्यात नाही  हिंडण फिरणं  मन मोकळे नाही बंदिस्त झालं जगणं  .... हाॅटेल मधे खानं नाही  ना जाणं विनाकारण   एकत्र भेटायला बंदी समान अंतर राखणं .... मैदानावरचा बंद खेळ घरी कोंढुन घेणं  क्षणभरा साठी सुद्धा  बाहेर नाही पडणं .... आले कसलं दिवस हरवत चालल्या आठवणी  अंतर पडलं संवादात भेटत नाहीत कुणी .... जातील का हे दिवस ,निघुन जाईल वेळ  कोरोणाने बिघडला सार्या दुनियेचा मेळ.... ना मोकळी हवा  ना मातीचा  सुगंध  मिळेल का पुन्हा परत जगण्याचा आनंद.... रचना  संतराम पाटील  केनवडे ता कागल जि कोल्हापूर  मो नं 9096769554,9420339554 _____________________________________________ टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-   सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

◾कविता :- मी देव पाहीला

इमेज
मी देव पाहीला संजय धनगव्हाळ *************** स्वतःला विसरून तो रुग्णांसाठी धावला माणसांची सेवा करून माणुसकीला जागला प्राण हाताशी घेवून तो संकटाशी लढत राहीला त्या डॉक्टरच्या रूपात  मी देव पाहीला शव वाहून तो एकसारखा पळत होता जबाबदारीने प्रेत जाळत होता नात रक्ताच नसतानाही तो मदतीचा हात देत राहीला त्या रुग्णवाहकाच्या रूपात मी देव पाहीला ती सुध्दा कार्यतत्पर होती तिला तिच्या जीवाची मुळीच पर्वा नव्हती दिवसरात्र राबून तिने जातीधर्माचा विचार नाही केला त्या नर्सेसच्या रूपात मी देव पाहीला मोकाट फिरणाऱ्यांना किती आवरावे त्यांनाही कळत नव्हते घराबाहेर पडूनका सांगुनही कोणी ऐकत नव्हते घरदार विसरून त्यांनी आपल्या लेकरंबाळांचा विचार नाही केला त्या पोलीसांच्या रूपात मी देव पाहीला नको कोणाला लागण म्हणून तो साफसफाई करत होता साफसुतर ठेवून तो जबाबदारीने वागत होता मरण सोबत घेवून तो काम करत राहीला त्या सफाईकामगारात मी देव पाहीला या करोना काळात कोणालाही भेटता येत नव्हते अंतर राखुन एकमेकांना पहात होते गंभीर परिस्थितीतही एक माणूस दुसऱ्या माणसाशी माणूसकीने वागत राहीला त्या माणसा माणसात मी देव पाहीला संजय धनगव्हाळ

◾कविता :- तुला पाहिले जेव्हा मी

इमेज
तुला पाहिले जेव्हा मी ,  एकटक पाहतच राहिलो ।  मनातील तार वाजत होते ,  मी तर मलाच विसरलो ॥  नजर जाते तुझ्याकडे ,  अंतरी माझ्या धडधडते ।  तू समोर येताच माझ्या ,  मन माझा कासाविस होते ॥  स्वतःला विसरलो होतो ,  विचार फक्त तुझेच होते ।  भेटशिल का माझ्या जीवनी ,  तुझ्याशिवाय करमत नव्हते ॥  तुझा चेहरा वारंवार माझ्या ,  डोळ्यासमोर येत होता ।  तूला सोडून जातांना माझा ,  पायही साथ देत नव्हता ॥  वाट पाहिन तुझी मी ,  केव्हा तरी येशीलना ।  माझ्या प्रेमाला समजून ,  माझी होशिल ना ॥  ----------------------- महेन्द्र सोनेवाने , ( यशोमन ) गोंदिया दिनांक : ११/०५/२०२१ --------–-------------- ____________________________________________ टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-  सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

◾कविता :- तू जग मस्त...

इमेज
'तू जग मस्त...' तू जग मस्त, कोण काय करतं, कुठे काय घडतं, याचा विचार तू करू नको बस तू खाऊन- पिऊन रहा स्वस्थ, तू जग मस्त, जग झोपलेलं असतांना, तू जागं रहा, उघड्या डोळ्यांनी, मोठ-मोठी स्वन्प पहा, ती पुर्ण झाली नाही तरी चालेल मात्र, होऊ देऊ नको तु, तूझ्या जीवनाचा अस्त, तू जग मस्त, स्वार्थासाठी स्वताच्या, तुला कदचित... आपल्याच माणसांना सोडावे लागेल, हितगुज करायला स्वताच्या यशाशी तुला एकांतच हवाहवासा वाटेल, घाबरू नकोस, रहा तू , तूझ्या कामात व्यस्त, तू जग मस्त, अश्रू इतरांचे पुसायला तू शिक, जरा त्यांचं आयुष्य तू जग होईल तूझ्या हुद्यातली कमी थोडी धग, समाधानी रहा, लोक काय म्हणतील करू नकोस याचा विचार, ठेव नेहमीच तू सदाचार, तूझ्या वागण्यात फक्त लाव तू थोडी शिस्त, तू जग मस्त.... तू जग मस्त....               मंगेश शिवलाल बरई.         हिरावाडी, पंचवटी, नाशिक-४२२००३. _____________________________________________ टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-   सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

◾बोधकथा :- शेठजी आ‍‍‍णि त्‍याचा मित्र

इमेज
एका शेठजवळ अपार संपत्‍ती होती, एके दिवशी त्‍याच्‍या मनात विचार आला की एक भव्‍य शिवमंदिर बनवावे. सहा महिन्‍यात मंदिर बनवून पूर्ण तयार झाले. मंदिर बनवून जे धन शिल्‍लक राहिले ते धन त्‍याने मंदिराच्‍या घुमटात गुप्‍त रितीने ठेवले. या गोष्‍टीचा उल्‍लेख त्‍याने आपल्‍या डायरीमध्‍ये करून ठेवला. त्‍यानंतर तो तीर्थयात्रेला निघुन गेला. परंतु तो रस्‍त्‍यातच मरण पावला. शेठला चार मुले होती. शेठजीच्‍या मृत्‍युनंतर काही दिवसातच त्‍यांना पैशाची चणचण भासु लागली, तेंव्‍हा त्‍यांनी आपल्‍या वडीलांची डायरी तपासायला सुरुवात केली. त्‍या डायरीत त्‍यांना घुमटातल्‍या धनाचा उल्‍लेख असलेली नोंद त्‍यांना पाहायला मिळाली. त्‍यात असेही लिहीलेले होते की, चैत्र शुद्ध नवमीला धन घुमटात ठेवण्‍यात आले आहे, त्‍या मुलांनी घुमट तोडला मात्र त्‍यात धन निघाले नाही. तेव्‍हा ते आपल्‍या वडिलांच्‍या बुजुर्ग मित्राकडे आले, आणि समस्‍या सांगितली. वडीलांच्‍या त्‍या बुजुर्ग मित्राने त्‍या चारही मुलांना चैत्र शुद्ध नवमीला रात्री बारा वाजता त्‍या ठिकाणी खोदायचे आहे जिथे तुमच्‍या वडीलांनी धन ठेवले आहे असे सांगितले, चंद्राच्‍या प्रकाशात घुमटाच

◾विशेष लेख :- आयुष्यातील हार...

इमेज
सर्वांनी हि पोस्ट जरूर वाचावी. " मी जगदीश महाजन. मी रिटायर्ड क्लास वन आँफिसर आहे. ही आमची पहिलीच फाँरेन टूर आहे" बँकाँकच्या हाँटेलमध्ये मी सगळ्या ग्रुपला माझी ओळख करुन दिली. "साहेबांनी त्यांची अपूरी ओळख आपल्याला करुन दिलीये." आमचा ग्रुप लिडर सर्वांना सांगू लागला. "तुम्हाला कल्पना नसेल पण साहेबांचे आपल्या मुख्यमंत्र्यांशी खुप जवळचे संबंध आहेत. आमदार, खासदारांसोबत तर त्यांची रोजची बैठक असते" सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. मी मनातून खुष झालो पण मी तसं चेहऱ्यावर दाखवलं नाहीं. हळूहळू सगळे आपला परीचय करुन देऊ लागले. बऱ्याच जणांची ही पहिलीच विदेशवारी होती तर काही जणांची दुसरी किंवा तिसरी. सर्वात शेवटी एक साधारण कपडे घातलेला एक माणूस उभा राहिला. त्यांच्या कपड्यांमुळे म्हणा किंवा सगळ्यांना जेवणाचे वेध लागले होते त्यामुळे म्हणा कुणी त्याला गांभीर्याने घेण्याच्या मुडमध्ये नव्हतं. "मी सदानंद पाठक आणि ही माझी पत्नी मीनाक्षी पाठक. मी एका शैक्षणिक संस्थेत क्लार्क म्हणून काम करतो. आमची ही नववी फाँरेन टूर आहे" त्या हाँलमध्ये एकदम शांतता पसरली.मला तर आश्चर्याचा धक्काच

बोधकथा :- कृती

इमेज
एका गावात एक गरीब माणूस राहत होता शिक्षण नाही त्यामुळे कोणते चांगले कामही मिळत नव्हते, तो भिक्षा मागून आपले पोट भरत होता. एके दिवशी त्याला भिक्षेच्या रुपात तांदूळ मिळाले, तांदूळ त्याला फार दिवसांनी मिळाले होते. तो फार आनंदी होता. दुसऱ्या एका घरातून त्याला भाकरी आणि भाजी मिळाली. त्याने ती भाजीभाकरी खाल्ली आणि तांदूळ एका मडक्यात भरून भिंतीला असलेल्या खुंटीला अडकवून ठेवले. तो खाटेवर पडून आराम करू लागला.मडक्याला पाहून तो विचार करू लागला, त्यात आज तांदूळ आहेत. उद्याही तांदूळ मिळाले तर मडके अर्धे भरून जाईल, आणि असे जर तांदूळ मिळताच राहिले तर काही दिवसातच मडके तांदळाने भरून जाईल.मग आपण तांदळासाठी अशी ४-५ मडकी करू. २-३ महिन्यानंतर एक लहान पोतेभर तांदूळ जमा झाले कि ते तांदूळ आपण विकून टाकू. त्यातून पैसा मिळेल मग आपण अजून तांदूळ खरेदी करू ते जास्त भावाने विकू त्यात पैसा मिळेल असे करता करता आपल्याला भरपूर पैसा मिळू लागेल. पैसा जमा झाला कि आपण लग्न करू, मग मुले होतील, ती सुंदर आणि खोडकर असतील. मुलांना मी चांगले संस्कार करेन, त्यांनी जर ऐकले नाही तर तर त्यांना लाथ मारेन, असे विचार करत असताना त्याने

◾बोधकथा :- देव श्रेष्ठ की असुर

इमेज
देव आणि राक्षस यांचे वडील प्रजापती, एक दिवस देव आणि राक्षस मिळून प्रजापतीकडे गेले आणि त्यांना विचारले, आमच्यात मोठे कोण ? प्रजापतीने सांगितले कि तुम्ही सारे आज माझ्याकडे जेवायला थांबा. जेवण झाले कि... तुमच्या प्रश्नाचे उत्तर देतो.   देव ३३ कोटी... राक्षसही कितीतरी कोटी ! त्यामुळे प्रजापतीने सुचवले कि आपण दोन पंगती करू... या राक्षसांना प्रत्येक गोष्टीची घाई... ते म्हणाले, " पहिल्या पंगतीला आम्ही येणार " प्रजापतीने सगळी तयारी केली. पाने मांडली,वाढून तयार झाली.  राक्षस घाईघाईने आले. प्रजापती दुरून पहात होते. राक्षसांनी जेवायला येण्यापूर्वी हातपाय स्वच्छ धुतले नाहीत. सगळे राक्षस पंगतीत बसेपर्यंतही आधी आले त्यांना दम नव्हता. त्यांनी लगेच जेवायला सुरवातही केली.  तेव्हा प्रजापतीने एक मंत्र म्हटला त्याबरोबर राक्षसांचे हात कोपरात ताठ होऊन गेले. पानातला घास तर उचलला... पण कोपरात हात वाकेना... त्यामुळे घास तोंडात जाईना. तासभर प्रयत्न केला तरी राक्षस उपाशीच राहिले. पंगत संपली. प्रजापतीने लगोलग दुसऱ्या पंगतीची तयारी केली. देव स्वच्छ हातपाय धुवून आले. गोंधळ न करता शिस्तीत पानांवर बसले. त्य

◾संगीत :- मनाला शांत करणारे काही निवडक हिंदी गाणी

इमेज
टेंशन मध्ये हि गाणी नक्की टेंशन घालवतील ______________________________________________ टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-   सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

◾आरोग्य :- तुम्ही नैसर्गिकरित्या... तुमचा मूड बदलू शकता !

इमेज
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ *   तुम्ही नैसर्गिकरित्या...  तुमचा मूड बदलू शकता ! ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ आपल्या धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करत असतो. सध्या धावपळ करत एकाच वेळी अनेक काम करण्याचे कसब देखील मिळवले आहे. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर होतो. त्यानंतर तुम्हाला कोणीही काहीही मदत करू शकत नाही. आपण स्वतः कडून एका रोबोट प्रमाणे कामे करून घेतो. नंतर आनंद शोधण्यासाठी आपण भौतिक गोष्टीचा आधार घेतो. त्याऐवजी आपण आदर्श आणि प्रामाणिक नात्यांचा आधार घ्यायला हवा.     आपण एकदा डोळे बंद करून स्वतःला विचारायला हवे की, मला खरंच काय मिळवायचे आहे? काही लोकांना त्यांचा मूड किंवा मनस्थिती सुधारण्यासाठी औषधांची गरज असते. ज्याप्रमाणे चिंता, नैराश्य, तणाव, मनोविकार असलेले रुग्ण उपचार घेतात. जीवन शैलीतील एक बदल तुम्हाला उच्चतम आनंद मिळवून देऊ शकतो. तुम्हाला वाटेल खरंच हे शक्य आहे का? मी हे पाहिलंय माझ्या ग्राहकांवर हे आजमावले आहे. चला जाणून घेऊ काय आहे हे आनंदी जीवनाचं रहस्य? * उगवत्या सूर्याकडे बघा * : होय, उगवत्या सूर्याकडे बघितल्याने तुमचा मूड बद

◾यशाचा मंत्र :- एका शून्यातून तयार झालेला हिरो - #बोमन_इराणी

इमेज
एका शून्यातून तयार झालेला हिरो - #बोमन_इराणी!.. मित्रांनो, बोमन इराणी तुम्हाला आवडतो का? मुन्नाभाई एम बी बी एस मधला डॉ.रस्तोगी, थ्री इडियट्स मधला इंजिनीअरींग कॉलेजचा प्रिंसिपल, विरु सहस्त्रबुद्धे उर्फ व्हायरस, आणि अशाच अनेक विविधरंगी भुमिकांमुळे बोमन आज एक लोकप्रिय अभिनेता आहे.  पण बोमनचा एक विनोदी अभिनेता बनण्यापर्यंतचा प्रवास सोपा होता का? बोमनचा जन्म मुंबईतल्या एका पारशी घरात झाला,  बोमन जन्मण्याच्या सहा महिने आधीच बोमनच्या वडीलांचे निधन झाले, बोमनला तीन बहिणी होत्या, दोन मावश्या, आणि एक आत्या होती,  सतत सर्व स्त्रियांच्या सहवासात राहील्यामुळे लहानग्या बोमनचाही स्वभाव काळजी करणारा आणि भित्रा झाला, त्याला *डिस्लेक्सिया* नावाचा रोग होता, शाळेत, अभ्यासात बोमन अतिशय मंद होता, बोलताना तो तोतरे बोलायचा, त्यामुळे त्याचे मित्र त्याची मस्करी उडवायचे, न्युनगंडामुळे बोमन इराणी स्वतःला अपयशी मानु लागला होता, त्याने स्वतःसाठी कसलीही मोठी स्वप्ने पाहिली नाहीत,  त्याचे मित्र डॉक्टर, इंजिनीअर आणि सी.ए. झाले, मात्र बोमन कधीच काही मोठे मिळवण्यासाठी स्वतःला पात्र समजायचा नाही.  बोमनने स्वतःसाठी वेटरचा

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾विशेष लेख :- प्रारब्धवशात जे आहे तेच होते...उदाहरणासकट