◾कविता :- तू जग मस्त...
तू जग मस्त,
कोण काय करतं,
कुठे काय घडतं,
याचा विचार तू करू नको
बस तू खाऊन- पिऊन रहा स्वस्थ,
तू जग मस्त,
जग झोपलेलं असतांना,
तू जागं रहा,
उघड्या डोळ्यांनी,
मोठ-मोठी स्वन्प पहा,
ती पुर्ण झाली नाही तरी चालेल
मात्र, होऊ देऊ नको तु,
तूझ्या जीवनाचा अस्त,
तू जग मस्त,
स्वार्थासाठी स्वताच्या,
तुला कदचित...
आपल्याच माणसांना सोडावे लागेल,
हितगुज करायला स्वताच्या यशाशी
तुला एकांतच हवाहवासा वाटेल,
घाबरू नकोस,
रहा तू , तूझ्या कामात व्यस्त,
तू जग मस्त,
अश्रू इतरांचे पुसायला तू शिक,
जरा त्यांचं आयुष्य तू जग
होईल तूझ्या हुद्यातली कमी थोडी धग,
समाधानी रहा, लोक काय म्हणतील
करू नकोस याचा विचार,
ठेव नेहमीच तू सदाचार,
तूझ्या वागण्यात फक्त
लाव तू थोडी शिस्त,
तू जग मस्त....
तू जग मस्त....
मंगेश शिवलाल बरई.
हिरावाडी, पंचवटी, नाशिक-४२२००३.
_____________________________________________
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा