◾कविता :- जगण्याचा आनंद
वातावरण नाही मुक्त आला आकृतीबंध
विस्तारलेल क्षितीज मृदेचा गेला गंध ...
प्रियजनांचा सहवास ठरला आहे भास
भेटिगाठी नाहीत ना जगणं दिलखुलास ....
निसर्गाच्या सानिध्यात नाही हिंडण फिरणं
मन मोकळे नाही बंदिस्त झालं जगणं ....
हाॅटेल मधे खानं नाही ना जाणं विनाकारण
एकत्र भेटायला बंदी समान अंतर राखणं ....
मैदानावरचा बंद खेळ घरी कोंढुन घेणं
क्षणभरा साठी सुद्धा बाहेर नाही पडणं ....
आले कसलं दिवस हरवत चालल्या आठवणी
अंतर पडलं संवादात भेटत नाहीत कुणी ....
जातील का हे दिवस ,निघुन जाईल वेळ
कोरोणाने बिघडला सार्या दुनियेचा मेळ....
ना मोकळी हवा ना मातीचा सुगंध
मिळेल का पुन्हा परत जगण्याचा आनंद....
रचना
संतराम पाटील
केनवडे ता कागल जि कोल्हापूर
मो नं 9096769554,9420339554
_____________________________________________
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा