वादात पडू नका..| दृष्टांत | short Audio story ...
वादात पडू नका..
एका रेल्वे स्टेशनवर एक रेल्वे येऊन थांबते.. जवळूनच एक मुलगा पाणी विकत जात होता. तेवढ्यात एका शेठने त्याला आवाज दिला. 'ये मुला, कितीला पाणी ?' मुलगा म्हटला, '२५ पैसे..' तर शेठ म्हणाले, '१५ पैशात दे.' यावर मुलगा गालात हसला व त्याने ज्या ग्लासमध्ये पाणी काढले होते ते पाणी जाऊन पुन्हा आपल्या मटक्यात परत टाकले. हे सर्व त्या रेल्वेतील एका महाराजाने पाहिले. ते महाराज रेल्वेतून उतरले व त्या मुलाकडे गेले व विचारले, 'तु हसला का ?'
मुलगा म्हणाला, 'शेठला तहान नव्हती लागली. फक्त किम्मत विचारायची होती.' त्यावर त्या महाराजाने विचारले, 'तुला कसं काय माहीत की शेठला तहान नव्हती लागली म्हणून ?' त्यावर त्या मुलाने खूप छान उत्तर दिले,
'जेंव्हा माणसाला खरंच तहान लागते तेंव्हा माणूस किंम्मत विचारत नाही बसत, आधी पाणी पितो मग विचारतो किती द्यायचे ?'
यात खूप मोठी शिकवण आहे..
ज्यांना काही मिळवायचे असते ते वाद विवादात नाहीत पडत, तर ते आपापल्या कामात मन लावतात...
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा