थोडं प्रेम स्वतः वरही... | Marathi Audio story | Audiobook

आयुष्यात आलेला 'एखादा काळ' हा वाईट नसतोच, वाईट असते ती त्या काळातली आपली परिस्थिती, काळाशी दोन हात करतांना आपली सतत कमी पडत राहाणारी उर्जा, आपल्यातली मानसिक आंदोलने आणि त्या काळातून लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी आपली होत असणारी तडफड.
ही तडफड जितकी जास्त होते , जगण्याची...जगण्यावर प्रेम करण्याची उर्जा तितकी जास्त वाढत जाते.
दुःख माणसाला जिवंत राहाण्याची, आयुष्यावर नव्याने प्रेम करण्याची उर्मी देतं. द्यायला हवं...
पण...
जर आपलं स्वतःवरही प्रेम असलं तरच हे होऊ शकतं.
स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वार्थीपणा कधीच नसतो. ती भेट असते ...आपण स्वतःला दिलेली. 
कुणीतरी येईल , आपल्याला आनंद देईल ही वाट बघत बसण्यापेक्षा आपण स्वतःच स्वतःला आनंद देणारे होऊ शकतोच पण बर्‍याचदा माणसे स्वतःवर प्रेम करण्यासाठीही इतरांची वाट पाहाण्यात आयुष्य घालवतात...
प्रेम म्हणजे स्वतःपर्यंत पोहोचण्याचा प्रवास असतो. जगण्याचा प्रवास असतो. आयुष्याची ओढ असते आणि जिवंतपणाशी जुळलेली नाळ असते...
ओसाड जागी पावसात दाटीवाटीने बहरलेली झुडूपं म्हणजे प्रेम असतं. 
कुठल्याही क्षणी आपलं आयुष्य संपून जाईल, एवढा ऋतू संपेपर्यंतच आपण ह्या जागेवर विसावलेले आहोत, ह्या कशाकशाची पर्वा न करता...नाव गाव काहीच माहीत नसलेली ती झाडे जेव्हा पावसाचे थेंब अंगाखांद्यावर घेतं सुखाने डोलतांना दिसतात , एकाच ऋतूनेही इतकी जोमाने वाढ पकडतात ...ते अनुभवणं म्हणजे प्रेम...
हक्काशिवाय जगलेली ओढ...
पाऊल तिथेच टाकू शकतो जिथे जागा खाली आहे...पण स्वतःच्या आत पोहोचायला जागा लागत नाही...प्रेम आपल्या आत आहे...हक्काचं...स्वतःचं...स्वतःवरचं...

Love yourself ,
आयुष्याचा रंग अजूनही हिरवा आहे !

__________________________________________
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- 
 सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

मस्त आयुष्य जगण्याचा स्वस्त फंडा - एक मजेशीर गणित

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

निसर्ग किमया कि देवता ... Mother Nature

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

फक्त व्यक्त व्हायला शिका...

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...