कविता :- दीक्षाभूमी ... | मराठीचे शिलेदार समुह नागपूर

➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
   ‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित 'बुधवारीय काव्यरत्न' कविता स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
  🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗

         🔵विषय : दीक्षाभूमी🔵
    🍂बुधवार : १३/ १० /२०२१🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
दीक्षाभूमी

नागवंशाची नागपूर नगरी
पवित्र तीर्थक्षेत्र  बौद्धांतरी

वर्षानुवर्षे अनादी काळात
नागवंशी  जगत  संघर्षात

हक्कांसाठी  होते  झगडत
भीमराव, तेच कूळ  सांगत

दलितांचे जीवन हलाखीत
पाहून,सोसून भीम क्रोधीत

अपमान,अवहेलना करिती
अस्पृश्यास उच्चभ्रू  छळती 

तयारीच नव्हती सवर्णांची
माणसात तयां  गणण्याची 

कुशाग्र  बुद्धीचा हा बॅरिस्टर
आढावा  देशाचा घेई चौफेर

ज्या  धर्मात  नसे मी  मानव
नाही ठेवली  तयाची कणव 

स्विकारला बौद्ध धर्म  जावून
हजारो    अनुयायांना   घेवून

दिक्षाभूमी तीच ठरली  तीर्थ
दलितांना उद्धारण्या प्रित्यर्थ

शिका,संघटीतव्हा,संघर्ष करा
जागविली चेतना  दलितांतरा

आस लाखोंना तिथे जाण्याची
दैवता    ह्दयात    स्मरण्याची!

सौ.संगीता पांढरे
इंदापूर, पुणे
©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह
♾️🔹♾️🔹🔵🔸🔵♾️🔹♾️🔹
दीक्षाभूमी

लक्ष  लक्ष  काळजांच्या
बंदिस्त  श्वासांना   मुक्त
करणारा  मूल्य प्रवर्तक
भीमराव  आमुचा संयुक्त

अंधारगुहेतील  दगडांच्या
प्रत्येक मस्तकात त्यावेळी
पेरले तू  सुरुंग हक्कासाठी
लक्ष अनुयायीच्या मांदियाळी

लाखोंच्या साक्षीने  त्यावेळी 
लढवला  समतेचा  संगर
तृषीतांच्या ओठांवर ओतला
अथांग करुणेचा महासागर

अनिष्ठ रूढीचे कुजके ढिगारे
तुडविलेस बाबा  पायतळी
वांझ संस्कृतीच्या  विरोधात
ठोकली आसमंतात आरोळी

नागपूरच्या दीक्षाभूमी येथे 
दिक्षा  बहुजनांना  देऊनी
जीवनाचे कल्याण जाहले
कोटी हृदयात बुद्ध कोरुनी

ते फिरवलेले  धम्मचक्र
असेच  गतिमान होईल
छेदून इथल्या शेंदरी गढ्या
गीत क्रांतीचे जग हे गाईल

आजही जिवंत त्या स्मृती
निळ्याशार  नभांगणात
क्रांतीसूर्य  भीमरावांचा
जयघोष चौफेर आनंदात

सौ माधुरी काळे कावडे
वणी जिल्हा यवतमाळ
©सदस्य मराठीचे शिलेदार समूह
♾️🔹♾️🔹🔵🔸🔵♾️🔹♾️🔹
दीक्षाभूमी

अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी
शोषित समाजाला दिले भान भीमाने
अंधारलेल्यांना दिला प्रकाश 
ज्ञानाच्या निळ्या रक्ताच्या शाईने 

विजयादशमीच्या दिनी दीक्षाभूमीवर 
घेतली बौध्द धर्माची दीक्षा 
बुद्धाच्या शरणी जाऊनी
दिली सकला परिवर्तनाची नव दिशा 

माणुस म्हणुनी जगण्याची जाणीव
दीक्षाभूमीच्या पायथ्याशी शोषितांना दिली
अन् लाखो दीनांच्या दीपस्तंभाने 
सन्मानानं जगण्याची शक्ती दिली 

दीक्षाभूमी दलितांचे श्रध्दास्थळ 
मानवतेचे असे सदा प्रेरणास्थान
बावीस प्रतिज्ञांचा स्तंभ अन् बोधिवृक्ष
करी बौध्द धर्माचे पुनरुज्जीवन

सौ. सुनिता लकीर आंबेकर
दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव 
©सदस्या मराठीचे शिलेदार समुह
♾️🔹♾️🔹🔵🔸🔵♾️🔹♾️🔹
दीक्षाभूमी

नागांच्या त्या पवित्र भूमीत
इतिहास नवा घडविला
धम्मक्रांती करून बाभिमाने
बुद्धांचा मार्ग दाखविला

समता,मानवता, बंधुत्वाची
गुढी ती उभारली
धम्मक्रांताची ज्योत पेटवून
पंडीतांचे मान झुकवली

अशी लेखणी चालवून
अधिकार, हक्क बहाल केली
समस्त नागरीकांना 
एका धाग्यात बांधली

त्या विजयादशमी दिनी 
दिक्षाभूमीत भरे सोहळा
आदर्श घेऊन भिमबाबाचा
नागांच्या भूमीत लेकरे होतात गोळा

निळा झेंडा घेऊन हाती
वाजतगाजत फेरी निघती
त्रिशरण,पंचशिलाचा 
चारही दिशात नाद घुमती

माझ्या त्या भीमबाबान
बघा दावली नवी वाट
दिनदुबळ्या लोकांच्या जीवनाची 
उगवली सोनेरी पहाट...
उगवली सोनेरी पहाट...

 सुधा अश्वस्थामा मेश्राम
 अर्जुनी/मोर.गोंदिया
 ©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समुह
♾️🔹♾️🔹🔵🔸🔵♾️🔹♾️🔹

दीक्षाभूमी

सजली सारी दीक्षाभूमी
नाही कुठे दिखावा 
फक्त आणि फक्त जळतो
इथे ज्ञानाचा दिवा 

साहित्य भूमी च ती 
इथे ज्ञानाचे भांडार 
अज्ञानाला आता नाही थारा 
शांती दिसे अपरंपार 

धन्य धन्य ते महामानव 
जगण्याचा हक्क त्यांनी दिला 
लिहिले त्यांनी संविधान 
देश चाकोरीत आणला 

घेतली त्यांनी दीक्षा 
याच पवित्र स्थळी 
येती अनुयायी देशभरातून 
वाहती श्रद्धेने आदरांजली 

वाढविली नागपूर ची शान 
भव्य स्मारक इथे झाले 
जगाने  ही दिला सम्मान 
डॉ. बाबासाहेब अमर झाले 

डॉ. संजय भानुदास पाचभाई, नागपूर
©सदस्य  मराठीचे शिलेदार समूह
♾️🔹♾️🔹🔵🔸🔵♾️🔹♾️🔹
     दीक्षाभूमी

प्रथम मानवंदना
   धम्मचक्र प्रवर्तन दिनाला
    आनंदाने भारावलेल्या
    अनमोल त्या क्षणाला.
   
    चला जाऊया दीक्षाभूमी
 पॉसष्टवा धम्मचक्र प्रवतक दिनी
    सजवू हा मंगल सोहळा
      चौदा ऑक्टोंबर दिनी

      शांतीचे संदेश देणारे तथागत
            भगवान गौतम  बुद्ध 
          यांना नमन करुनिया
         विश्वरत्न डॉ. बाबासाहेब 
      यांनी दिलेल्या बुध्द धम्माचा 
        आचरण करूया.

   पन्नास वर्षे पुढील, दीक्षाभूमी येथील
               बौधिवूर्क्ष पाहूया
     लाखो अनुयायी एकत्र हवूनिया
        दीक्षाभूमीची रौनक वाढूविया.

     पंच शिल शेंडे हाती घेऊनी
    निळ्या रंगाने, दीक्षा भूमी रंगऊया
 बुद्ध धम्माचा प्रसारक करून आणखी
        अनुयायीना धम्मदीक्षा देऊया.
 
               शूर,तू वीर तू
  या नागलोकाचा 'महामानव'तू
  आमांस  बुध्दधम्म आचरणास देऊन
करितो वंदन, या धम्मचक्र प्रवतक दिनी
          दीक्षा भूमीतील हा
      सोहळा मंगलमय करुनी

 सौ.ज्योती पाटील खोब्रागडे
      रा.लोणावळा जि. पुणे
 ©सदस्या मराठीचे शिलेदार समूह.
♾️🔹♾️🔹🔵🔸🔵♾️🔹♾️🔹
दीक्षाभूमी

दलितांच दु:ख पाहून
जळलास अंतरी भिमा तू
अभिमानाने उंच केलीस 
दिनदुबळ्यांची मान तू।

जाग्रुत करून सारा समज
समतेचा मार्ग दाखवलास
शिका संघटित व्हा हा
मोलाचा संदेश तू दिलास।

विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर
धर्मांतराची घोषणा तू केलीस
वास्तूशिल्प उभारले तू दिक्षाभूमी
लाखो अनुयायांना बुद्धमय केलेस।

धम्मक्रांतीची ज्योत लावून
हिंदू धर्माला तू त्यागलास
शांतीचा बौध्द धर्म स्वीकारून
इतिहास भिमा तू घडवलास।

१४ आँक्टोंबरला जनसागर
नागपूर दिक्षाभूमीवर येतो
धम्मचक्र अनुवर्तन दिन
दरवर्षी भारतात साजरा होतो।

सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर
©मराठीचे शिलेदार समूह
♾️🔹♾️🔹🔵🔸🔵♾️🔹♾️🔹
दीक्षाभूमी

विषमतेला तिलांजली देण्या
    येवले मुक्कामी घोषणा केली
चौदा ऑक्टोबर छप्पन साली
    बुद्ध धम्माचीचं  दीक्षा घेतली

अशोका विजयादशमी दिनी
     चंद्रमुनी हस्ते  लाखो जनात
बुद्धधम्माचं बीज रुजविलंय
     कोटी कोटी जणांच्या मनात

पावन झालीय नागपूर भूमी
     बुद्ध धम्म  दीक्षा सोहळ्याने
डॉ. बाबासाहेब  आंबेडकर
     महामानवाच्या  धम्मक्रांतीने

नागपूरची  पवित्र  दीक्षाभूमी
    जनसागर येतो देशविदेशातून
नतमस्तक होती पवित्रस्थळी
     स्मरून बुद्धाला  मनामनातून

धम्म  बुद्धाचा, मार्ग  शांतीचा
     प्रज्ञा, शिल,करुणेने भरलेला
भल्याभल्यांचे दुःख निवारक
     बुद्धधम्म मार्गदर्शक  ठरलेला

प्रतिवर्षी धम्मचक्र प्रवर्तनाला
     दीक्षाभूमीला जनसागर येतोय
स्वयंप्रेरणे,स्वयंशिस्तीत राहून
     बुद्ध तत्वाचे आचरण करतोय

    ✍️बी. एस. गायकवाड
          पालम, परभणी
 ©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह
♾️🔹♾️🔹🔵🔸🔵♾️🔹♾️
दीक्षाभूमी...

मन जाणुनी घेतले
दलितांचे भीमराया
मिळविण्या न्याय त्यांना
झटलास लढवय्या...!!१!!

दुःख जाणुनी घेतले
जळलास मनोमनी
समतेचा मार्ग दिला
धम्मचक्र आवर्तुनी....!!२!!

दीक्षाभूमी नागपुरी
ज्योत पेटली शांतीची
केली रक्षा धर्माची
अन निळ्याचं रंगांची...!!३!!

गुणवान राजा माझा 
झाला बॅरिस्टर भीमा
घडविला इतिहास
अभिमान तुझा आम्हां...!!४!!

होई साजरी जयंती
चौदा एप्रिल रोजीच
हर्ष मिळे अनुयाया
आठवण भिमाचीच...!!५!!

बौद्ध धर्माची दिलीच
शिकवण दलितांना
स्वावलंबी शिक्षणाची
ज्योत पेटवी दिव्यांना...!!६!!

संघटीत करुनिया
क्रांती ज्योत पेटवली
किती सोसले दुःखही
वाहूनिया श्रद्धांजली...!!७!!

सौ. माधुरी पाटील, शेवाळे
जिल्हा- नाशिक
©सदस्य मराठीचे शिलेदार समूह
♾️🔹♾️🔹🔵🔸🔵♾️🔹♾️🔹
 दीक्षाभूमी

विजयादशमीच्या दिवशी
दीक्षाभूमीवर रंगतो सोहळा
धम्म परिवर्तनाची पर्वणी
पाहण्या धम्म बांधव होई गोळा

दिनदलितांची हि पंढरी
निळ्या रंगात दीक्षाभूमी रंगली
बाबासाहेबांच्या विचारांची दीक्षा
घेण्या अनुयायांची मैफिल जमली

अशोका नंतर फिरविले
भीमाने चक्र धम्माचे
बुद्धम शरणम् गच्छामि
मंत्राने दर्शन घडविले बुद्धाचे

गुलामगिरीतून केली सुटका
मार्ग दाखविला सत्याचा सोपा
जातीभेदाची मोडली घटिका
दीक्षाभूमीवर निर्माण केला एकोपा

शिक्षण म्हणजे वाघिणीचे दूध
शिका संघर्ष कराचा दिला नारा
संविधान लिहून घडविली क्रांती
भीमराव नावाचा होऊनी गेला एकच तारा

ज्ञानाचा जळे अखंड दिवा
इथेच स्थापिली साहित्य भूमी
शांततेच आणि मानवतेच
 प्रतीक म्हणजे दीक्षाभूमी

कुशल डरंगे,अमरावती
©सदस्य मराठीचे शिलेदार समूह
♾️🔹♾️🔹🔵🔸🔵♾️🔹♾️🔹

 
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
         🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻
                  ✒राहुल पाटील
                      ७३८५३६३०८८
© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖


___________________________________
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
 सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

मस्त आयुष्य जगण्याचा स्वस्त फंडा - एक मजेशीर गणित

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

निसर्ग किमया कि देवता ... Mother Nature

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

फक्त व्यक्त व्हायला शिका...

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...