◾कविता :- आली आली आषाढी वारी | aali aali ashadhi wari marathi poem | मंगेश शिवलाल बरई
'आली आली आषाढी वारी'
आनंदाची आषाढी वारी,
चला चला जाऊया पंढरी, || घ् ||
फुले जेथे भक्तीचा मळा,
विठु सावळा लावी लळा,
चला चला जावू भिमातिरी,
आली आली आषाढी वारी, || १ ||
लोहदंड क्षेत्री उभी पंढरी,
आवतरली चंद्रभागेतिरी,
पांडुरंग-रखुमाई उभे विटेवरी,
आली आली आषाढी वारी, || २ ||
मातृ पितृ सेवेत असतां दंग,
जाहले प्रकट पाहण्या पांडुरंग,
पुंडलिक नामाच्या भक्ताच्या दारी,
आली आली आषाढी वारी, || ३ ||
धन्य धन्य तो विठु सावळा,
भरतो आषाढी भक्तीचा सोहळा,
भक्तांना त्यांच्या संकटी तारी,
चला चला जाऊया पंढरी, || ४||
मंगेश शिवलाल बरई.
हिरावाडी, पंचवटी, नाशिक -४२२००३.
_________________________________________
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा