कविता :- अशी माझी एकादशी अन् असा माझा उपवास
"अशी माझी एकादशी
अन् असा माझा उपवास",
चहासोबत सकाळच्या
होती न्याहारी वेफरची मस्त,
पाहता-पाहता केले मी,
वेफरचे चार-पाच पुडके फस्त,
फराळात दुपारच्या
साबुदाणा वडा अन्
रताळ्याचा शिरा,
खाण्याच्या बाबतीत
मी तर ठरलो मग कोहीनूर हिरा,
तोंडात लाडू राजगिऱ्याचे
अधुन-मधुन लागले वाजू ,
सोबतीला होतेच बदाम अन् काजू ,
त्यातल्या-त्यात टाईमपासासठी
आले समोर खजुर,
मग मी खाण्यासाठी ते,
झालो जरा, जास्तच अतुर,
मेजवानीत रात्रीच्या,
होती भगर अन् चटकदार आमटी,
दिवसभराच्या उपवासानंतर,
कशी घेऊ हो ?
मी पोटाला चिमटी,
अशी माझी एकादशी
अन् असा माझा उपवास,
स़ोबत फराळाच्या पदार्थांचा
राहतो 'आपुलकीचा सहवास,
मंगेश शिवलाल बरं ई.
पंचवटी, नाशिक ४२२००३.
_________________________________________
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा