*ऍक्टिव्ह मेंदू*
जगाच्या पाठीवर बरेच जीव आपले जीवन व्यतीत करत आहेत कोणी पाण्यात तर कोणी जमिनीवर जीवन जगतायेत. निसर्गाने प्रत्येकाला स्वतःचे अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी काही तरी विशेष गोष्ट दिलेली आहे. ज्याच्या आधारावर प्रत्येक जीव आपापले अस्तित्व टिकवून ठेवण्याचे प्रयत्न करत आहेत.
पृथ्वीवर लाखो प्रजाती जिवंत आहेत. पण त्यांच्यापैकी मनुष्याला एक वेगळी ओळख आहे. आज संपूर्ण पृथ्वीवर मानवाचे वर्चस्व आहे. पृथ्वीच्या पाठीवर माणूस हा असा एकमेव प्राणी आहे ज्याने अवकाशात सुद्धा भरारी घेतली आहे,
हे सर्व कश्याच्या भरवश्यावर केले असं वाटते? तर उत्तर आहे, ते म्हणजे दीड किलो वजनाच्या मेंदूवर! ज्याने सर्व प्रजातींमध्ये आपल्यालाच वर्चस्व मिळवून दिले आहे. त्या मेंदूला आपण आणखी अँक्टीव कश्याप्रकारे ठेवू शकता.
*मेंदूला ऍक्टिव्ह ठेवण्याकरिता ह्या आहेत काही गोष्टी*
*ध्यान*
आपण ऐकले असेल कि पूर्वीच्या काळी ऋषी मुनी शेकडो वर्ष जगत असत. मग ते असे काय करत होते, कि त्यांचे आयुष्य एवढे अधिक होते. तर बऱ्याच अश्या गोष्टी आहेत, कि ज्यामुळे त्यांचे आयुष्य आपल्या पेक्षा अधिक होते, त्यामध्ये सर्वात पहिली गोष्ट हि ध्यानधारणा होती. कारण आपल्या मेंदूला ध्यान केल्यामुळे एक वेगळीच शक्ती प्राप्त होत असते. कारण आपण ध्यानामध्ये आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करतो त्यामुळे आपल्या शरीरातील रक्तप्रवाह नियंत्रित राहण्यात मदत होते. रक्तप्रवाह नियंत्रित राहिल्यामुळे आपल्या मेंदूची कार्य करण्याची क्षमता वाढते.
*पुरेपूर झोप*
अन्नाशिवाय मनुष्य हा २-३ आठवडे जिवंत राहू शकतो. पण झोपेविषयी असे नाही. मनुष्याच्या शरीराची रचनाच अशा प्रकारे केली गेली आहे, ज्यामध्ये मनुष्याला प्रत्येक गोष्ट हि तेवढीच आवश्यक आहे जेवढी त्याच्या शरीराची मागणी आहे. तसेच मानवाच्या शरीराला सरासरी ७-८ तासाच्या झोपेची आवश्यकता असते. जसे आपण आपल्या फावल्या वेळात आपली आवश्यक कामे आटपून घेतो. त्याचप्रमाणे आपला मेंदू सुद्धा आपण झोपल्यानंतर त्याचे कार्य करत असतो. जर मेंदूला त्याचे काम करण्यासाठी पुरेपूर वेळ मिळाला नाही तर तो गोंधळून जातो आणि त्यामुळे आपण लगेच काही गोष्टींवर आपले लक्ष केंद्रित करू शकत नाही. त्यासाठी किमान ७-८ तास झोप घ्या. जेणेकरून तुमचा मेंदू व्यवस्थितरित्या कार्य करेल.
*निर्व्यसन*
कोणतीही गोष्ट जास्त प्रमाणात झाली तर ते विष बनत असतं. त्याचप्रमाणे आपण जर प्रमाणाच्या बाहेर जाऊन व्यसन करत असाल, तर ते आपल्या मेंदूसाठी योग्य नाही, आपल्या मेंदूला एखादी गोष्ट योग्य नसली तर ते आपल्या आरोग्यासाठी सुद्धा योग्य नसते. व्यसनामुळे आपल्याला बऱ्याच आजारांचा सामना करावा लागेल. त्यासाठी आपण कोणतेही व्यसन करत असाल तर ते प्रमाणात करावे. आणि झाले तर स्वतःला व्यसनापासून दूरच ठेवावे.
*शारीरिक व्यायाम*
काही शास्त्रज्ञांच्या शोधात समोर आले आहे कि शारीरिक व्यायामाने आपल्या शरीरातील स्नायुंमुळे आपल्या मेंदूला आणखी कार्यशील होण्यास मदत मिळते. तसेच दररोज केल्या जाणाऱ्या व्यायामामुळे आपल्या रक्तवाहिन्या शुध्द रक्त आपल्या मेंदूच्या त्या भागाकडे पोहचवतात जेथून आपला मेंदू विचार करण्याची क्रिया करत असतो. तसेच व्यायामामुळे आपल्या मेंदूतील “नर्व सेल” आणि “न्यूरॉन्स” यांच्या मधील कनेक्शन वाढते.जे आपल्या मेंदूला आणखी कार्यशील बनविण्यास मदत करते. म्हणून दररोज किमान ४५ मिनिटे व्यायामाला दिले पाहिजेत.
*चांगला आहार*
सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण घेत असलेला आहार! योग्य आहारामुळे आपल्या मेंदूलाच नाही तर आपल्या शरीराला सुद्धा योग्य चालना मिळते. म्हणतात न “You are what you eat” याचा अर्थ असा कि आपण जो आहार घेतो तसेच आपण बनतो. म्हणून आपला आहार योग्य ठेवा. ज्यामध्ये फळे, माशे, मोड आलेले कडधान्य, हिरव्या पालेभाज्या, मसूरची दाळ, इत्यादी. या आहारामुळे आपल्या मेंदूला चालना मिळेल. तसेच मेंदूला आणखी कार्यक्षम होण्यास मदत मिळेल.
*एकावेळी एकाच गोष्टीवर लक्ष*
आपण बरेच वेळा एकापेक्षा जास्त गोष्टींवर लक्ष देण्याचे प्रयत्न करत असतो. जसे TV पाहता पाहता आपण आपल्या मोबाईलवर सोशल मिडियाचा वापर करत असतो. मोबाईल वापरणे आणि TV पाहणेच नाही तर दैनिंदिन जीवनात अश्या बऱ्याच गोष्टी आपण करत असतो. ज्यामुळे आपल्या मेंदूला काही गोष्टी आठवण ठेवायला कठीण जातात. म्हणून नेहमी आपण काम करतेवेळी एकाच गोष्टीवर आपले लक्ष केंद्रित करून आपले काम करा. त्यामुळे विचार करतांना आपला गोंधळ होणार नाही. आणि कोणताही निर्णय आपण सहजरित्या घेऊ शकू.
*निसर्गाचे सानिध्य*
निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याने आपल्यात शारीरिकच नाही तर आंतरिक बदलाव सुद्धा होतात. आपल्या मेंदूला कार्यक्षम बनविण्यासाठी आपला मेंदू तणावमुक्त असणे गरजेचे आहे. तणावमुक्त राहिल्याने मेंदूला कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नाही. आणि मेंदूवरील तणाव हा निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याने खूप कमी होतो. म्हणून आठवड्यातून किंवा महिन्यातून एक वेळ निसर्गाच्या सानिध्यात फिरायला जा. जेणेकरून आपला मेंदू चांगल्या प्रकारे कार्यक्षम होण्यास मदत होईल.
*मित्रांसोबत वेळ घालवा*
आपल्या दिवसाचा जास्तीत जास्त वेळ हा आपल्या परिवाराला तसेच आपल्या मित्रांना द्या. त्यांच्या सोबत आपण काही वेळ व्यतीत केला तर त्यामुळे आपण आपल्या मेंदूला संभाषणाची एक चांगली सवय लागेल आणि त्यामुळे आपला मेंदू कार्यशील राहण्यास मदत होईल. सोबतच मेंदूवर जोर देणारे काही खेळ खेळावे. जेणेकरून मेंदूला व्यस्त राहण्यात मदत होईल आणि मेंदूला सतत कार्यशील राहण्यास सुद्धा मदत होईल.
*नेहमी शिकत राहा*
जेव्हा तुम्ही काहीतरी नवीन शिकत असता तेव्हा तुमचा मेंदू आणखी कार्यक्षम होतो. कारण आपल्या मेंदूमध्ये नवीन शिकल्यामुळे नवीन न्यूरॉन्स बनत असतात. आपल्याला ज्याप्रकारे अन्नाची भूक असते त्याचप्रमाणे आपल्या मेंदूला नवीन शिकण्याची भूक असते. म्हणून आपल्या मेंदूला दररोज काही तरी नवीन-नवीन शिकायला द्या. (उदा.एखादे नवीन पुस्तक, आपलं ज्ञान वाढतील अशा गोष्टी.)
*आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा