◾जिवन मंत्र :- मनावरचं ओझं कमी करण्यासाठी ...
💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏
मनावरचं ओझं कमी करण्यासाठी मनातलं दुःख हे बोललंच पाहिजे . परंतु ते कोणाशी बोलायचं हे मात्र समजलं पाहिजे . आपण फक्त एकाच ठिकाणी चुकतो . काहीजणांची लायकी नसताना त्यांना जवळ करतो . सल्ला घेते वेळी किंवा देते वेळी समोरचा माणूस योग्य असणं महत्त्वाचं असतं .
जो चांगल्या वृक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते म्हणून नेहमी चांगल्या व्यक्तीच्याच सहवासात राहणे योग्य . आपली संगत आपले भविष्य घडवित असते . आपण कोण आहोत यापेक्षा आपण कोणाच्या संगतीत आहोत हे जास्त महत्त्वाचे आहे .
सुसंस्कृत माणसाची संगत आणि यशस्वी लोकांचे मार्गदर्शन आपल्या जीवनात नक्कीच चांगले बदल घडवू शृकते . जीवनामध्ये नेहमीच सल्ल्याची गरज नसते . कधीकधी धीर देणारा हात , ऐकून घेणारे कान आणि समजून घेणाऱ्या हृदयाची गरज असते.
🌹🌹🌹🌹🚩🙏🏽🌹🌹🌹🌹
मस्त
उत्तर द्याहटवा