पोस्ट्स

वादात पडू नका..| दृष्टांत | short Audio story ...

इमेज
दृष्टांत वादात पडू नका.. एका रेल्वे स्टेशनवर एक रेल्वे येऊन थांबते.. जवळूनच एक मुलगा पाणी विकत जात होता. तेवढ्यात एका शेठने त्याला आवाज दिला. 'ये मुला, कितीला पाणी ?' मुलगा म्हटला, '२५ पैसे..' तर शेठ म्हणाले, '१५ पैशात दे.' यावर मुलगा गालात हसला व त्याने ज्या ग्लासमध्ये पाणी काढले होते ते पाणी जाऊन पुन्हा आपल्या मटक्यात परत टाकले. हे सर्व त्या रेल्वेतील एका महाराजाने पाहिले. ते महाराज रेल्वेतून उतरले व त्या मुलाकडे गेले व विचारले, 'तु हसला का ?' मुलगा म्हणाला, 'शेठला तहान नव्हती लागली. फक्त किम्मत विचारायची होती.' त्यावर त्या महाराजाने विचारले, 'तुला कसं काय माहीत की शेठला तहान नव्हती लागली म्हणून ?' त्यावर त्या मुलाने खूप छान उत्तर दिले, 'जेंव्हा माणसाला खरंच तहान लागते तेंव्हा माणूस किंम्मत विचारत नाही बसत, आधी पाणी पितो मग विचारतो किती द्यायचे ?' यात खूप मोठी शिकवण आहे.. ज्यांना काही मिळवायचे असते ते वाद विवादात नाहीत पडत, तर ते आपापल्या कामात मन लावतात... टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-   सदर लेख आवड

मित्र नावाचा नातलग...ना जवळचा ना लांबचा...पण हाकेच्या अंतरावरचा...

इमेज
मित्र आणि मैत्रिणी या बद्दल एक छान फॉरवर्डेड लेख . मित्र नावाचा नातलग...ना जवळचा ना लांबचा...पण हाकेच्या अंतरावरचा.. (लेखन...डॉ.महेंद्र वंटे...) १९६५ चा जून महिना ...चार साडेचार वर्षांची बालकं .. धाकदपटशा करून बालवाडी नामक एका कौलारू खोलीत पालकांनी ढकललेल्या रडारडीच्या गलक्यात मी पण ढकलला गेलो.... कुणी हमसून हमसून तर कुणी भोकाड पसरून..पण सगळेच रडके.. ...या समूह रुदनाकडे मख्ख पणे पाहणाऱ्या जोशी बाई.. प्रत्येकाच्या डोळ्यात ‌एकमेकाविषयी सहानुभूती ..एक दोन दिवस रडण्यात गेले... मग चेहऱ्यावर निर्विकार भाव..मग हासरी आपुलकी... दोन दिवस गाळलेल्या आसवांच्या थेंबात मैत्रीची बीजं ओलावली.... अंकुरली... ...पालवली.. फुलली... आणि फूलतच राहीली.... भावनिक मुळं एकमेकात जी अडकली तो गुंता अजूनही शाबूत आहे. अ..अननसाचा...ब..बदकाचा .. पेक्षा...म... मित्राच्या ओढीने शाळेकडे पावलं खेचू लागली...कुणी चालत तर कुणी बापाच्या सायकलवर तर एखादा फटफटीवर... कुणी डॉक्टरचा, कुणी सायबाचा, कुणी शिक्षकाचा पण बरीच मोठी पिलावळ कामगारांच्या बिऱ्हाडातील......... सवर्ण,अवर्ण,गौरवर्ण,कृष्णवर्ण, गरीब,श्रीमंत. सामाजिक भेदाभेदीची

जगण्याची मंत्र : डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

इमेज
शिक्षण तज्ञ :-डॉ.बाबासाहेब आंबेडकर. डॉ बाबासाहेब आंबेडकर हे एक भारताचे फार मोठे तत्वज्ञ ,विद्वान, शिक्षण तज्ञ होतेच त्यांचे हे पैलू जगाला माहीत आहेत तसेच सर्वांना ज्ञात आहे .माञ बाबासाहेब  आंबेडकर यांच्या आयुष्याचा एक वेगळा भाग त्यांच्या आयुष्यात होता तो जगासमोर क्वचितच आला असेल किंवा त्यांच्या जगण्यातून तो नेहमीच अधोरेखित व्हायचा मात्र त्याबद्दल फार थोडे लिहलं गेले आहे किंवा वाचण्यात आले आहे तो भाग म्हणजे बाबासाहेब हे शैक्षणिक क्षेत्रातील  उत्तम असे मानसशास्त्रज्ञ होते .होय त्यांनी मानसशास्त्रात पदवी घेतली किंवा नाही हे मला निश्चित माहित नाही मात्र मानसशास्त्रातील मोठं मोठे नियम ,सिद्धांत, त्यांनी न मांडता कृतीतून दाखवून दिले. बाबासाहेब यांचे आयुष्य हे एखाद्या मानसशास्रज्ञाला सुद्धा अभ्यासण्यासारखे आहे.सर्वप्रथम मी हे ठामपणे सांगू शकतो की जर प्रत्येक विद्यार्थ्यांने बाबासाहेब यांचे आयुष्य हे जर त्यांच्या आयुष्यात मानसशास्त्रिय दृष्टीकोनातून अभ्यासले तर आयुष्यात विद्यार्थी नापास किंवा अपयशी होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तसेच पालकांनी सुद्धा जर त्यांच आयुष्य मानसशास्त्रिय दृष्टिकोनातून

तारे जमीन पर ... | Tare jameen par motivational zindagi

इमेज
आमीर खान चा पिक्चर पण मात्र हिरो आहे एक मनाने हरलेला लहान ईशान नावाचा नायक 

माणुसकी ... Manuski | New Marathi Poem | संतराम नाना पाटिल

इमेज
कविता : माणूसकी बोल माणसा खडे बोल  मी बोलतोय मनी  एक काळ आसा होता  मला विचारत नव्हतं कुणी ...                                मोल होत वस्तुला                              देवान घेवानही वस्तुची                             जगण्यासाठी त्या काळी                                नव्हती गरज पैशाची .... सोनं  चांदी  विकायची आणा गीनी रूपायात  काठीला सोने बांधून  लोक फिरायचे गावात...                           गावालाही गावपण होते                             चावडीत लोक बसायचे                            सर्व मान्य तोडगा काढून                             न्याय निवाडा करायचे .... सारे गाव सरपंच पाटील  नाममात्र एकजण  अन्याय नसे कोणावरच  जोडले जायचे सगळेजन ....                                  निवडणूक नसली तरी                            गावगाडा एकाने हाकायचा                             क्षणिक सुखासाठी कोण                               गावच नाही विकायचा.... परस्परांच्या प्रेमावरती  ठरायची तेंव्हा माणुसकी  नाती गोती जपायची  म्हणजे वाढायची लायकी ....                             सोने चांदी पैसा नव्हता       

सावली माणसाची ... Savli Mansachi | मंगेश शिवलाल बरई | New Marathi Poem | आयुष्यावर कविता | Audio Poem

इमेज
Your browser does not support the audio element. सावली माणसाची ... सावली माणसाची... आयुष्यभर त्याच्यासोबत चालणारी, सुख-दुःखात साथ निभावणारी, जिवाभावाची सखीच... सावली माणसाची... स्वच्छ प्रकाशात स्पष्ट दिसणारी, अंधारात माञ... काही काळासाठी साथ सोडणारी, सावली माणसाची... त्याच्या वयाबरोबर वाढणारी, त्याचं आस्तित्व दाखवणारी , कधी कधीतर... त्याच्यात अस्तित्वात हरवणारी, सावली माणसाची... माणसातली माणुसकी जपणारी, त्याच्या नजरेत, त्यालाच असते सावरणारी, सावली माणसाची... असली काळाबरोबर दिशा बदलणारी, तरीही... आयुष्यभर त्याच्यासमोर चालणारी. मंगेश शिवलाल बरई. हिरावाडी,  पंचवटी, नाशिक-४२२००३. Audio poem, audio story, Marathi Audiobook टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-   सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

एक प्रेरणादायी जगप्रवास अनुभव... Free Marathi Audiobook Blog | Yashacha mantra

इमेज
Your browser does not support the audio element. 🔰 एक प्रेरणादायी जगप्रवास अनुभव.. ✨ "रशियात ९० ते ११० वषे वयाची 1 कोटी लोक आहेत." सकाळी ५ वाजता उठून १० मिनिट मेडीटेशन, ६ किलोमिटर फिरणे नियंत्रीत आहार... खातांना आणि बोलतांना जिभेवर नियंत्रण. दैनंदिनी निर्व्यसनी आणि आत्मविश्वास, चिकाटी व नियोजन ह्या शिदोरीवर हे रशियन औषधीची एक मात्रा / गोळी न घेता दृष्ट लागावी असे आनंदी जीवन जगत आहेत. ह्या नास्तीक मंडळींना राग / क्रोध, तिरस्कार, द्वेष आणि अहंकार काय असतो हे संसारी असूनही माहीत नाही. एका आंतरराष्ट्रीय संमेलनात एक महिना त्यांच्या सहवासात आलेल्या माझ्या सारख्या अनेकांचा हा अनुभव. त्यांच्या मते 'क्रोध' हा लुळा असतो. 'राग' हा पांगळा असतो जसे उकाड्याने शुध्द दूध नासते तसे 'क्रोधाने' स्नेह / प्रेम / जीवन नासते. ह्या लोकांना मी बुद्धाचे / विवेकानंदाचे / ज्ञानेश्वरीचे / रामायण / महाभारत / सर्व संतांचे तत्वज्ञान सांगितले त्यावर ह्या वयोवृद्धांनी ह्या सर्वांचा सार एका वाक्यात सांगितला. "शांतीने रागाला... नम्रतेने अभिमानाला... सरळतेने मायेला तसेच सम

तर, हे असे आहे ...

तर, हे असे आहे .. कष्ट करुन रापलेल्या सर्वसामान्य माणसांना आपली पोरं राजकारणात जावीत असं मूळीच वाटत नाही. त्यांनी डॉक्टर, वकील, इंजिनिअर, प्राध्यापक, शिक्षक, पोलिस, किमान शिपाई असलं काहीतरी झालं पाहिजे असं त्यांना वाटतं. यातलं काही नाही झालं तर सचोटीने एखादा धंदा, चांगली शेती, मेहनतीचं का असेना पण जादा झंजट नसलेलं काम केलं पाहिजे असं या अनुभवाचे चटके सोसलेल्यांना वाटतं. तसं आता कुठलही क्षेत्र सचोटीचं राहिलेलं नाही पण आपल्या आयुष्याचा, संसाराचा गाडा चालवताना अनंत तडजोडी कराव्या लागणाऱ्या, कधी-कधी चुकीची, अनैतिक वाटणारी कामं कराव्या लागणाऱ्या माणसांनाही आपल्या पोरांना त्यांच्या आयुष्यात अशा तडजोडी, अशी चुकीची कामं करावी लागण्याचे प्रसंग येवू नयेत असे मनापासून वाटत असते. कित्येक माणसं आयुष्याच्या संघर्षात मार्ग भरकटून व्यसनी होतात. आपण चुकीचे वागत आहोत हे त्यांना कळत असते. पण वळत नसते. व्यसनापेक्षा जास्त पश्चात्तापाचे वीष त्यांना खात असते. अशाही माणसांना आपल्या पोरांनी आपण ज्या वाटेने जात आहोत, ती वाट धरु नये असे मनापासून वाटत असते.राबणारी ही माणसं अशी पापभिरु असतात, हळवी असतात. त्यांच्य

सुखाच्या शोधात...

सुखाच्या शोधात...              आज सुमारे दहा वर्षांनी मनोज कॉलेजमध्ये आला होता. अनेक मुले-मुली पाठीला दप्तर लावून कॉलेजच्या आवारात ये-जा करताना त्याला दिसत होती. काही झाडाखाली बसली होती, गप्पा मारत होती. या विद्यार्थ्यांमध्ये मनोज आपलं कॉलेज जीवन शोधत होता. सर्वकाही तसेच होते, फक्त त्या विद्यार्थ्यांमध्ये तो नव्हता, त्याचे मित्र नव्हते.              दोन-तीन प्राध्यापक सेवानिवृत्त झाले होते. काहींनी त्याला ओळखले तर, काहींना त्याला आपली ओळख पटवून द्यावी लागली. अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी आलो, असे म्हटल्यानंतर प्राध्यापकांनी त्याचे कौतुक केले. पदवी कशी पूर्ण करता येईल, याबाबत सर्व चौकशी करून तो परत पार्किंगच्या दिशेने निघाला. त्याची सायकल पार्किंग मध्ये होती.                  कॉलेजच्या परिसरात एक टेम्पो उभा होता. त्यात बरीचशी 'रोपे' होती. 'रोपे' उतरवण्याचे काम चालू होते. खाली उतरवून ठेवलेल्या रोपांकडे पाहत पाहत पुढे जात असताना, करड्या रंगाची साडी घातलेली, सडपातळ बांध्याची, तीस-पस्तीस वर्षे वय असलेली तरुणी त्याला दिसली. तिला पाहताच मनोजची गती मंदावली. तिच्या चेह

कर्माची परतफेड ...

🌹 कर्माची परतफेड 🌹            एकदा एका राजाने आपल्या तीन मंत्र्यांना 'तुम्ही जंगलात जाऊन एक एक पोते भरून फळे घेऊन या', असा आदेश दिला...          पहिल्या मंत्र्याने विचार केला की, प्रत्यक्ष राजानेच आपल्याला फळे आणायला सांगितली आहेत... म्हणून आपण चांगल्या प्रतीचीच फळे घेऊन गेले पाहिजे... त्याप्रमाणे त्याने चांगली फळे शोधून घेतली...         दुसऱ्या मंत्र्याने विचार केला की, राजाने सांगितले आहे तर खरे, पण राजा तर इतर कामात इतका व्यस्त असतो की, तो कशाला एक एक फळ तपासून पाहणार आहे?... म्हणून त्याने मिळतील ती चांगली वाईट फळे आणली...          तिसऱ्या मंत्र्याने विचार केला की, राजा कशाला पोते उघडून पाहणार आहे की, त्यात फळे आहेत की आणखी काही?... तो तर बाहेरून फक्त पोत्याचा आकार पाहील, म्हणून त्याने जंगलात न जाताच पाला पाचोळा आणि फळांच्या आकाराचे दगड धोंडे भरून आणले...          दुसऱ्या दिवशी तिघेही मंत्री आपआपली पोती घेऊन दरबारात हजर झाले... फळे काय आणि किती आणलीत हेही न पाहता राजाने प्रधानजींना आदेश दिला की, या तिघांनाही राज्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी एक महिना स्थानबद्ध करण्यात या

आपण असे बदलत आहोत ...

आपण असे बदलत आहोत वस्तू आणि सेवांची निर्मिती करणे अन त्या बाजारात खपवणे यावर आपल्या सगळ्या व्यवस्थेचा डोलारा उभा आहे आणि त्यासाठी माणसांना या वस्तू आणि सेवांचा उपभोक्ता बनवणे ही या व्यवस्थेची प्राथमिक गरज आहे. जग बदलत जाते म्हणजे नेमके काय होते तर नवनव्या वस्तू अन सेवांचा शोध लागत राहतो, त्यांची निर्मिती केली जाते, त्या लोकांना बाजारात विकल्या जातात अन सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्या वस्तू व सेवा वापरण्याची, त्याचा उपभोक्ता होण्याची सवय लोकांना लावली जाते. या प्रक्रियेत माणूस त्याच्या जन्मापासून ते मरेपर्यंतच्या प्रवासात फार बदलत जातो. वय संपत चाललेल्या, मृत्यूच्या दारावर उभ्या असलेल्या एखाद्या आजीला विचारलं की तिने काय काय बदल पाहिले आहेत तर ती तिच्या एका पातळावर गुजराण करण्याच्या, पायात घालायला चप्पल अन अंघोळीला साबणवडी उपलब्ध नसल्याच्या दिवसापासून आज किमान दोनपेक्षा अधिक साड्या, पायात चप्पल अन रोजच्या अंघोळीला साबणवडीची उपलब्धता असण्याच्या दिवसापर्यंतच्या प्रवासाचे वर्णन करेल. त्या आजीकडे किंवा तिच्या घरात एखादा मोबाईल फोनही असेल अन ती पायात चप्पल नसलेल्या दिवसापासून ते हातात मोबाईल फो

पक्ष्यांपासून शिकण्यासारखे ...

★पक्ष्यांपासून शिकण्यासारखे★   🦜१. ते रात्री काही खात नाहीत.  🦜२. रात्री फिरत नाहीत  🦜३. आपल्या पिलांना स्वतः ट्रेनिंग देतात, दुसऱ्या ठिकाणी पाठवत नाहीत.   🦜४. हावरटासारखे ठोसून कधी खात नाहीत. तुम्ही त्यांच्यापुढे मूठभर दाणे टाका, ते थोडे खाऊन उडून जातात.. ... बरोबर घेऊन जात नाहीत..!!   🦜५. अंधार पडल्यावर झोपून जातात, आणि पाहाटेच उठून, गाणी गात उठतात.   🦜६. ते आपला आहार कधीही बदलत नाहीत.   🦜७. आपल्या जातीतच विवाह करतात (एकत्र राहतात) बदक आणि हंसाची जोडी कधी होत नाही.  🦜८. आपल्या शरीराकडून सतत काम करवून घेतात, ऍक्टिव्ह ठेवतात, रात्रीशिवाय विश्रांती करत नाहीत.   🦜९. आजारी पडले तर काही खात नाहीत, बरे झाल्यावरच खातात.  🦜१०. आपल्या मुलांवर प्रचंड प्रेम करतात व काळजी घेतात.  🦜११. आपापसात मिळून मिसळून राहतात. अन्नावरून भांडणे झाली, तरी परत एकत्र येतात.  🦜१२. निसर्ग नियमांचे न कुरकुरता शांतपणे पालन करतात.   🦜१३. आपलं घर इको फ्रेंडलीच बनवतात. *खरोखर त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखे आहे की नाही..??!! त्यांच्या या सवयी अंगिकरून आपल्याला आपलं, जीवन पण सुखी व निरोगी ठेव

वाढदिवस ...

— वाढदिवस —           वाढदिवस म्हणजे आयुष्याचा वाढलेला दिवस किंवा जितके दिवस आयुष्य लाभलं आहे त्या दिवसात झालेली वाढ!           प्रामुख्याने तीन वाढदिवस साजरे केले जातात - १. व्यक्तीचा, २. व्यक्तीच्या लग्नाचा, ३. संस्थेचा! हल्ली तर कसलेही वाढदिवस साजरे केले जातात. पहिली नजरभेट, पहिल्यांदा फिरायला जाणं, मागणी घालणं, एकमेकांच्या आई-वडिलांना भेटणं, इतकंच नव्हे तर पहिल्या ब्रेकअपचाही वाढदिवस साजरा केला जातो.           वाढदिवस हा वैयक्तिक आणि अगदी घरगुती असा आनंदाचा क्षण आहे. वाढदिवस का आणि कसा साजरा करावा? व्यक्तीची जोपर्यंत शारीरिक/बौद्धिक वाढ होत असते तोपर्यंत वाढदिवस साजरा करावा. हे साजरेपण अत्यंत साधं असावं. त्या व्यक्तीसाठी नवे कपडे किंवा काही उपयुक्त वस्तू म्हणजे वाचनीय पुस्तके, बौद्धिक खेळ भेट म्हणून घ्यावे. त्या व्यक्तीने सकाळी लवकर उठावं. तिचं आन्हिक उरकल्यावर सूर्योदयाच्या वेळी आई/आजी/ताईने औक्षण करावं आणि सूर्यासारखे तेजस्वी-प्रकाशमान जीवन लाभो, निरोगी-उदंड आयुष्य लाभो असे शुभाशिर्वाद देऊन भेटवस्तू द्यावी, त्या व्यक्तीच्या आवडीचा स्वयंपाक करावा जेणेकरुन त्या व्यक्तीचा संपू

प्रवास वर्णन : पं.नरेंद्र मोदींचा बर्लिन दौरा ....

🙏🏻दिव्यत्वाची जेथे अनुभूती तेथे कर माझे जुळती🙏🏻 एप्रिल च्या सुरुवातीलाच अचानक संध्याकाळी रवींद्र जी चा फोन आला आणि कळले की आपले सर्वांचे लाडके, आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी २ मे ला बर्लिन ला येणार आहेत. मनात म्हंटले, भारतात सुरक्षा कारणाने महाकठीण असले तरी इथे जर्मनी मध्ये राष्ट्रकार्यासाठी आपल्या प्रेरणास्त्रोत असलेल्या, राष्ट्रहिताय निरंतर तत्पर असणाऱ्या ह्या भारत मातेच्या सच्च्या भक्ताची आपली नक्की भेट होणार. महिनाभर मनात हुर हुर होतीच आणि म्हणता म्हणता तो २ मे उजाडला. कार्यक्रमा करता विविध आयोजन दृष्टीने कामे करायला बर्लिन च्या भारतीय दूतावासाने स्वयंसेवक (म्हणजे संघाचा स्वयंसेवक नव्हे हं!! शुद्ध मराठी मध्ये सांगायचे तर व्हाॅलेंटिअर) म्हणून नोंदणी करून घेतली होती. अर्थात मी पण त्या कार्यक्रमा करता एक व्हाॅलेंटिअर होतो.  मोदी जी सकाळी सहा वाजता येणार आहेत तेंव्हा मोदी जी चे स्वागत आणि भेट म्हणून सर्व नोंदणीकृत व्हाॅलेंटिअरनी सकाळी ५:३० च्या आधीच त्यांच्या नियोजीत विश्राम गृही पोहोचावे असे सांगण्यात आले होते. एवढ्या सकाळी पोहोचायचे म्हणजे एक दिवस आधीच बर्लिन ला येऊन ठेप

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

फक्त व्यक्त व्हायला शिका...

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...