आपण असे बदलत आहोत ...

आपण असे बदलत आहोत

वस्तू आणि सेवांची निर्मिती करणे अन त्या बाजारात खपवणे यावर आपल्या सगळ्या व्यवस्थेचा डोलारा उभा आहे आणि त्यासाठी माणसांना या वस्तू आणि सेवांचा उपभोक्ता बनवणे ही या व्यवस्थेची प्राथमिक गरज आहे. जग बदलत जाते म्हणजे नेमके काय होते तर नवनव्या वस्तू अन सेवांचा शोध लागत राहतो, त्यांची निर्मिती केली जाते, त्या लोकांना बाजारात विकल्या जातात अन सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्या वस्तू व सेवा वापरण्याची, त्याचा उपभोक्ता होण्याची सवय लोकांना लावली जाते. या प्रक्रियेत माणूस त्याच्या जन्मापासून ते मरेपर्यंतच्या प्रवासात फार बदलत जातो. वय संपत चाललेल्या, मृत्यूच्या दारावर उभ्या असलेल्या एखाद्या आजीला विचारलं की तिने काय काय बदल पाहिले आहेत तर ती तिच्या एका पातळावर गुजराण करण्याच्या, पायात घालायला चप्पल अन अंघोळीला साबणवडी उपलब्ध नसल्याच्या दिवसापासून आज किमान दोनपेक्षा अधिक साड्या, पायात चप्पल अन रोजच्या अंघोळीला साबणवडीची उपलब्धता असण्याच्या दिवसापर्यंतच्या प्रवासाचे वर्णन करेल. त्या आजीकडे किंवा तिच्या घरात एखादा मोबाईल फोनही असेल अन ती पायात चप्पल नसलेल्या दिवसापासून ते हातात मोबाईल फोन असलेल्या दिवसापर्यंतच्या प्रवसाचेही वर्णन करेल. 
असे बदल सगळ्यांच्याच आयुष्यात झालेले पहायला मिळतील. याचा अर्थ व्यवस्थेला लोकांचे जीवनमान उंचवायचे आहे, लोकांना श्रीमंत करायचे आहे अन त्यात व्यवस्था यशस्वी होताना दिसत आहे असा होतो का? तर मूळीच नाही.
वस्तू व सेवांची निर्मिती करणे अन त्यांची बाजारात विक्री करुन नफा कमावणे हे व्यवस्थेचे ध्येय असते. थोडक्यात नफा कमावणे, त्याची परत कुठेतरी गुंतवणूक करणे अन त्यातून पुन्हा नफा कमावणे या ध्येयाने भांडवली व्यवस्थेची वाटचाल चालू असते. भांडवली व्यवस्थेच्या या ध्येयप्राप्तीसाठी लोकांचे जीवनमान बदलत असलेले दिसत असले तरी लोकांना व्यवस्था वस्तूकेंद्री बनवत असते हे लक्षात घेतले पाहिजे. माणूस, त्याच्या निसर्गदत्त अन जगण्याच्या प्रक्रियेत विकसित झालेल्या भावना व विचार यांना दुय्यम लेखत त्याच्याकडे काय काय आहे, काय असले पाहिजे याच्यावरुन त्याचे मुल्यमापन केले जाते. हे समजावण्यासाठी एका जाहीरातीचे उदाहरण घेता येईल. टिव्हीवरील एका जाहीरातीत एका रिक्षाचालकाची मूलगी नोकरी मिळवण्यासाठी मुलाखत देते. मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नांची ती सफाईदारपणे उत्तरे देते अन बॉस खूष होवून तिला नोकरी देतो. या प्रकारानंतर लगेच तिने घातलेले शुभ्र कपडे अन ते शुभ्र राहावेत यासाठी वापरलेल्या 'वॉशिंग पाऊडर' चे 'टायटल' येते. मुलाखत देताना तिच्यात आलेला आत्मविश्वास हा तिने घातलेल्या शुभ्र कपड्यांमूळे आला अन अर्थात ही सगळी त्या 'वॉशिंग पाऊडर' ची कमाल आहे असे दाखवले जाते. आता ही एखद्या वस्तूच्या खपासाठीची काल्पनिक कथा असली तरी त्यातून कळत, नकळत माणसातला आत्मविश्वास हा त्याच्याकडे असलेल्या गुणांमूळे नव्हे तर तो काय घालतो, काय वापरतो याने दुणावतो असा संस्कार केला जातो. अशा अनेक जाहीरातींच्या माध्यमातून माणसाला अधिकाधिक वस्तूकेंद्री बनवण्याचा प्रयत्न ही व्यवस्था सातत्याने करीत असते. उद्योग जगताने निर्माण केलेल्या वस्तू व सेवांचा अधिकाधिक खप व्हावा अन उद्योजकांना नफा मिळावा यासाठी माणसाला उपभोक्ता बनवणे, वस्तूकेंद्री बनवणे अन त्यासाठी सर्व माध्यमांचा उपयोग करणे सातत्याने चालू असते.
आपल्या जन्मापासून ते मरण्यापर्यंतच्या प्रवासात अनेक नवनव्या वस्तू व सेवांची निर्मिती भांडवली व्यवस्था करीत राहते अन आपल्याला त्याची सवय लावत राहते. आपण असे वस्तूंभोवती, त्यांच्या अधिकाधिक वापराभोवती बदलत राहतो.
आता काहींना वाटेल की यात गैर काय? माणसाचे जीवनमान सुधारले, त्यातून काहींना रोजगार मिळाला अन व्यवस्थेत पैसा फिरत राहिला तर चुकीचे काय?
आपले राहणीमान सुधारणे, आपला नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर वाढणे यात अजिबात काही गैर नाही. पण आपल्या मुलभूत भावना अन विचार दाबून ही प्रक्रिया आपल्या माथी मारली जाणे, आपल्या पचनी पाडली जाणे, आपल्याही नकळत आपल्यावर या प्रक्रियेला हावी केले जाणे, आपल्या जीवनाला विचारकेंद्री नव्हे तर वस्तूकेंद्री केले जाणे घातक आहे.
या प्रक्रियेत "आपण खरेदी केलेल्या वस्तू व सेवांच्या निर्मितीत श्रम करणारांचे काय होते?, त्यांना त्यांच्या श्रमाचा रास्त मोबदला मिळतो का?, या प्रक्रियेतून नफा कमावणारे उद्योजक या नफ्याचे काय करतात?, त्यांच्या संपत्तीत किती भरमसाठ वाढ होत राहते?, या नफ्याचा, संपत्तीचा उपयोग ते सत्तेवर नियंत्रण ठेवून आपल्या हिताची धोरणं आखण्यासाठी अन सर्वसामान्य माणसाला त्याच्या मूलभूत हक्क-अधिकारापासून वंचित ठेवण्यासाठी करतात का?, आपण दिलेल्या करातून उभी राहिलेली सार्वजनिक मालमत्ता खाजगी करुन तिची मनमानेल तशी लूट चालू आहे का?" या सर्व प्रश्नांचा विचार आपण करीत नाही हे घातक आहे.
नवनव्या वस्तूंच्या उपलब्धतेने आपले राहणीमान बदलत असले तरी त्यागतीने जीवनातील मानवी मूल्ये विकसित होण्याची, समाजातील विषमता जानवून ती नष्ट करण्याची जानीव निर्माण होण्याची, शोषणावर उभी असलेली व्यवस्था बदलली पाहिजे यासाठीची पोटतिडिक निर्माण होण्याची प्रक्रिया घडत नसते. 'चार दिन की जिंदगी है ऐश करो..' असंच आपल्या जगण्याचं 'तत्वज्ञान' करुन घेणारी उथळ पिढी या तथाकथित बदलाच्या प्रक्रियेत निर्माण होत असते अन माणसाच्या सर्व प्रकारच्या स्वातंत्र्याचा विचार पिछाडीवर पडत असतो. 
आपण बदलत आहोत पण असे वस्तूंभोवती, जगताना उपभोगल्या जात असलेल्या साधनांभोवती. हे बदल होत असताना आपल्यातला 'माणूस' अधिकाधिक विकसित होत नाहीये. उलट तो त्याच्या माणूसपणाचा शोध घेण्यापासून, माणसामाणसातील संबंध निकोप, शोषणविरहीत करण्याच्या प्रक्रियेपासून कोसो दूर जात आहे. आपण बदलत आहोत, पण हे असे!

© ॲड. शीतल चव्हाण 
(मो. 9921657346)


टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- 
 सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

मस्त आयुष्य जगण्याचा स्वस्त फंडा - एक मजेशीर गणित

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

निसर्ग किमया कि देवता ... Mother Nature

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

फक्त व्यक्त व्हायला शिका...

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...