मित्र नावाचा नातलग...ना जवळचा ना लांबचा...पण हाकेच्या अंतरावरचा...

मित्र आणि मैत्रिणी या बद्दल एक छान फॉरवर्डेड लेख .
मित्र नावाचा नातलग...ना जवळचा ना लांबचा...पण हाकेच्या अंतरावरचा..
(लेखन...डॉ.महेंद्र वंटे...)
१९६५ चा जून महिना ...चार साडेचार वर्षांची बालकं .. धाकदपटशा करून बालवाडी नामक एका कौलारू खोलीत पालकांनी ढकललेल्या रडारडीच्या गलक्यात मी पण ढकलला गेलो.... कुणी हमसून हमसून तर कुणी भोकाड पसरून..पण सगळेच रडके.. ...या समूह रुदनाकडे मख्ख पणे पाहणाऱ्या जोशी बाई.. प्रत्येकाच्या डोळ्यात ‌एकमेकाविषयी सहानुभूती ..एक दोन दिवस रडण्यात गेले... मग चेहऱ्यावर निर्विकार भाव..मग हासरी आपुलकी... दोन दिवस गाळलेल्या आसवांच्या थेंबात मैत्रीची बीजं ओलावली.... अंकुरली... ...पालवली.. फुलली... आणि फूलतच राहीली.... भावनिक मुळं एकमेकात जी अडकली तो गुंता अजूनही शाबूत आहे. अ..अननसाचा...ब..बदकाचा .. पेक्षा...म... मित्राच्या ओढीने शाळेकडे पावलं खेचू लागली...कुणी चालत तर कुणी बापाच्या सायकलवर तर एखादा फटफटीवर...
कुणी डॉक्टरचा, कुणी सायबाचा, कुणी शिक्षकाचा पण बरीच मोठी पिलावळ कामगारांच्या बिऱ्हाडातील......... सवर्ण,अवर्ण,गौरवर्ण,कृष्णवर्ण, गरीब,श्रीमंत. सामाजिक भेदाभेदीची ही सगळी ओझी घराच्या उंबरठ्यावर सोडून मित्राला भेटण्यासाठी धावणारी.. पाठीवर ओझं फक्त दप्तराचं.. कुणाच्या फडक्यात चटणी भाकरी तर कुणाच्या टीफीन मधे तूप साखर पोळी.
मधल्या सुट्टीत वाटून खाताना
ना जात ना पात 
ना भेद ना भाव.......
मित्रांशी खेळणं आणि सोबत खाणं याच सुखाच्या परमोच्च कल्पना ... बेभान होऊन केलेली पळापळ.. पडणं, धडपडणं,खरचटणं... उचलणं, जखमेवर फूंकरणं,आयोडीन लावणं.. पुन्हा फुंकरणं..
सहवासातून सुखवासाची अनुभूती देणारा सत्संग..
याच सुखाच्या निरागस समागामातून जन्माला आलेला मित्र नावाचा नातलग...ना जवळचा ना लांबचा...पण हाकेच्या अंतरावरचा...
एके काळचा अनोळखी पण आता जीवलग
ना जातीचा ना पातीचा
ना रक्ताचा ना वंशावळीचा
मीही तोच तोच तूही
मी पणाच नाही कुठे..
वयं वाढली.. बुद्धी वाढली.. तशी इयत्ता ही वाढत गेली....
बालवाडीची झाली शाळा...शाळेचं झालं विद्यालय.. तिचं झालं महाविद्यालय.. मित्र नावाच्या नातेवाईकांत नवी भर पडली...मिशी आली ..दाढी वाढली.... खांद्या खांद्यावर जबाबदारी वाढली...
रोटी कपडा और मकान... काळानुरुप गरजा बदलल्या..
बदलल्या सुखाच्या कल्पना.. त्याच्या शोधासाठी पायाला भिंगरी.... झाल्या दिशा वेगवेगळ्या ... झाल्या वेगवेगळ्या वाटा.....काही स्वता:च्या... काही वहीवाटा.....
पण वाटेच्या प्रत्येक वळणावर मागे वळत एकमेकांना अडीअडचणीला" मै हू ना" चा आशावाद देत संसाराची सप्तपदी चालणारे मित्र...
 पोटाची भूक ज्यांनी कधीकाळी वाटून खाऊन भागवली ते आता झाले एकमेकांच्या भावनिक भूकेचे वाटेकरी ..
हक्काने बोलवता येईल असा सुख दुःखातील सहकारी...
लग्नं,बारसं, बर्थडे,पूजा,
दहन,दफन,दहावा,तेरावा...
कुणी कारने, कुणी दुचाकीने तर कुणी बसने ...पण येणार हमखास ‌..नातलगांपेक्षा आधी पोहचणारा तोच मित्र नावाचा नातलग....ना लांबचा ना दूरचा... हाकेच्या अंतरावरचा... 
गेल्या ५० वर्षांत कितीतरी वेळा आला गेला.... दु:खात आणि सुखात.. कधीतरी सहज....वाटलं भेटाव़ं म्हणून आलेला.. वयाने साठी गाठली तरी चवीपुरतं बालपण अजूनही गाठीला जपलेला..

कष्टाने मिळवलेली सुबत्ता आणि दैवाने दिलेली सुखदुःख: भोगलेली पिढी .. 
काहींनी मोजता येणार नाही इतकं मिळवलं तर कुणी सहन होणार नाही इतकं गमावलं... कुणाची सुखं मुठीत सामावलेली.. तर कुणाची मिळकत बॅंकेच्या पासबुकात मावलेली...
पंखात बळ भरलेल्या पाखरांनी आपआपलं आभाळ शोधलं... कुणी लोकल तर कुणी ग्लोबल झालं.
कोणी आजोबा केलं तर कोणी ग्रॅंडपा... मोबाईलच्या पडद्यावर वर नातवाने दिला पा...
पोटाचा घेर सुटला..गुढग्यांचा भार वाढला
केसाने रंग सोडला....डोक्याने केस सोडले..
बीपी, शुगर, संधीवात.... सकाळ दुपार संध्याकाळ.
जेवणाच्या जागी औषधं आली..
तरीही
मित्रांचा कुंज तोच
तीच मैत्रमोहीनी
माझ्या ६१ व्या वाढदिवशी एका हाकेला जमला.. कुणी कारने,कुणी दुचाकीने तर कुणी चालत...पद, प्रतिष्ठा अन् सुबत्तेपायी साठलेलं मी पणाचं ओझं उंबरठ्यावर सोडून..
तोच उत्साह तीच निरागसता...
बालसवंगडी ते शाळकरी.. वर्गात पहिल्या दिवशी एकाच सुरात रडलेले ते तमाम सुदामा... सवंगड्याच्या अनेक सुखात हसलेला आणि प्रत्येक दुखा:त पाणावलेला सुदामा...  
तांबेकर,घारे,नारंग,झानपूरे,सोमण.... 
घाटणेकर,सानप, चव्हाण,आठवले..
किती नावं किती आडनावं...  
ना जात ना पात 
ना भेद ना भाव..
आता ना फडक्यातील भाकरी उरली ना डब्यातील तूप साखर पोळी...उरले आहेत जग नावाच्या बंदीशाळेतील शेवटचे काही तास आणि प्रत्येक सुदाम्याने जपलेले पोहे खास......
शाळा संपल्याची घंटा वाजण्याआधी आनंदाने वाटून खा
ते उरलेसुरले चविष्ट घास..
मित्र नावाच्या नातलगाचे.....
ना जातीचा ना पातीचा
ना रक्ताचा ना वंशावळीचा
ना जवळचा ना लांबचा...पण हाकेच्या अंतरावरचा...🤝🙏

लेखन...डॉ.महेंद्र वंटे...
9673817700
( माझ्या आयुष्यातील तमाम मित्र मैत्रिणींना समर्पित).

टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
 सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

कविता : महात्मा गांधी

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...