सुसंस्कार..


_सुसंस्कार.-_

_लेखक- अनामिक._

           आयुष्याच्या प्रवासात कोण, कुठे, केंव्हा आणि कशा स्वरूपात मिळेल काहीच सांगता येत नाही. अशाच एका प्रवासात मला आलेला 
अनुभव थोडक्यात असा.
          माझ्या जिवलग मित्राच्या मुलीचं लग्न होतं राजमुंद्री या गावाला. विशाखापट्टणम पासुन काही मैलांवर असणारं हे गाव.
       मी विशाखापट्टणम स्टेशनवर मिसेससह पोहोचलो. रेल्वे प्रवाशांनी खचाखच भरली होती. पाय ठेवायला जागा नव्हती. काही प्रवासी ऊभ्यानेच प्रवास करीत होते. 
      एकदाची ट्रेन सुरू झाली आणि हायसे वाटले. राजमुंद्रीला जातांना तूली नावाचं एक स्टेशन लागतं. गाडी हार्डली एखादा मिनिट थांबत असेल.
      खिडकीतूनच चहा व्हेंडरला हाक मारून दोन काॅफींची ऑर्डर दिली आणि ईथेच सर्व गडबड झाली. मी ensure करायला हवं होतं की माझ्या वाॅलेटमधे चिल्लर पैसे आहेत की नाहीत. एक दोनशेची नोट होती त्याला दिली. ऊरलेले पैसे वापस घेता घेता ट्रेन सुरु पण झाली.
        झालं, तिकडे रेल्वेचं इंजीन भडकलं आणि ईकडे बायको. थांबता थांबेना. "आधीच सांगितलं होतं तुम्हाला, काॅफी घेऊ नका म्हणून, आणि वेंधळे तर ईतके की पैसे आधीच देऊन टाकले."
       गाडी सुरु झाली. गाडीने वेग घेतला. तो बिचारा व्हेंडर ईच्छा
असुनही पैसे वापस करु शकला नाही. त्याची असहाय्यता मी खिडकीतून पाहात होतो. 
       हिची तडफड सुरूच. "गेले ते दोनशे रुपये." सहप्रवासी
आमचा संवाद एन्जॉय करीत होते. 
       "अगं तो गरीब माणूस आहे. अशी नसतात ही माणसं. त्यांच्या चांगुलपणावर माझा विश्वास आहे."
       "मग द्या काढून त्यांना जेवढे असतील नसतील तेवढे. लक्षात आलं ऊन्हाळा सुरु झाला आहे. ग्रीष्माचे वारे सहन करावेच लागतील. मला माहिती आहे त्याने हे जाणून बुजून केले असणार. दिवसातून असे दोन चार कस्टमर मिळालेत की झाले त्यांचे काम."
       आता माझ्याच्यानेही राहावेना. बायकोला म्हणालो, "ए बाई, जरा ऐकतेस का. काय होणार आहे त्याचे आपल्या या दोनशे रूपयांनी. असली हरामाची कमाई त्यांनाही नकोच असते. आपल्यापेक्षा सुसंस्कारित असतात हे लोक. ऊगांच त्यांना दोष देऊ नकोस. माणसांच्या चांगुलपणावर माझा विश्वास आहे."
      चांगुलपणाच्या माझ्या थिअरीवर बायकोचा विश्वास बसणं शक्यच नव्हतं. सहप्रवासी आमच्या संभाषणाची मजा घेत होते. जो तो आपापल्या मगदुराप्रमाणे अर्थ काढीत होता. काहींच्या मते मी बरोबर होतो तर काहींच्या मते चुकीचा. प्रत्येकातच चांगलं आणि वाईट दोन्ही असतचं असतं. 
       पाहता पाहता पिठापुरम स्टेशन आलं. प्रवाशांच्या विचारांची दिशा बदलली. ते त्यांच्या कामाला लागलेत आम्ही आमच्या.
         तेव्हड्यात एक बारा तेरा वर्षाचा मुलगा माझ्यापुढे येऊन ऊभा राहिला. नीटनेटके स्वच्छ कपडे आणि बोलण्यात आत्मविश्वास. म्हणाला, "साहेब, तुली स्टेशनवर आपण काॅफी प्यायलात का, आणि व्हेंडरला दोनशे रूपये दीलेत ना?. 
        "हो, पण तू तो नाहीस ज्याच्याकडून आम्ही काॅफी मागवली."
       "हो, साहेब बरोबर आहे तुम्ही म्हणता ते. ते माझे वडील आहेत. फोनवरून त्यांनीच मला कळवलं की तुमचे ऊरलेले 180/- रुपये वापस करायचे आहेत, आणि तेच वापस करायला मी आलो आहे. तुमचा बोगी नंबर, सीट नंबर त्यांनी मला फोन करून कळवला आहे साहेब."
       आता चाट पडायची वेळ बायकोवर आली. विश्वासच
बसू शकत नव्हता की असं काही घडू शकतं ते. त्याला विचारलं घरी कोण कोण असतं ते. 
        "मी, माझे वडील आणि मोठा भाऊ. मी दहावीला आहे. मोठा भाऊ बाबांना मदत करतो दुपारच्या वेळी, आणि मी सकाळी मदत करतो."
        "तू असं कर, बाबांचा नंबर दे मला. मी जरा बोलतो त्यांच्याशी."
        " हॅलो काका, तुमच्याकडून काॅफी पिणारा तुली स्टेशनवर
भेटलेला प्रवासी आहे मी. तुमचा सुसंस्कारी मुलगा माझ्यापुढेच ऊभा आहे. सर्व हकीगत सांगितली आहे त्याने. खरोखरच तुम्ही great आहात काका. हे कसं काय जमतं तुम्हाला."
         "साहेब एक सांगु का. भगवतगीता हा माझा आदर्श आहे, पथप्रदर्शक आहे. त्यात 
सांगितलेले चार ऊपदेश, प्रामाणिकपणा, स्वच्छता, दयाळूपणा आणि नेहमीच सत्य बोलावे ज्यामुळे आज मी आणि माझी मुलं Trouble free honest life जगत आहोत. आजच्या शिक्षणात ज्याचा मला अभाव दिसतो आहे."
        आमचं हे संभाषण बायको ऐकतच होती. अकारण guilty feel करीत होती. तिच्या चेहऱ्यावरचे भाव मला डिकोड करता येत होते अपराधीपणाची छटा जाणवत होती. 
      पाहता पाहता राजमुंद्री स्टेशन आलं. स्टेशनवर ऊतरलो ते आनंदातच. एकतर मित्राच्या मुलीचं लग्न म्हणून, आणि दुसरं म्हणजे troublefree honest life जगण्याचा धडा सहजपणे मिळाला म्हणून.
       कर्माच्या सिद्धांतावर माझा विश्वास आहेच. लोकांच्या चांगुलपणावर सुध्दा तेव्हढाच 
विश्वास हवा. जय जगत.🙏
_*लेखक-अनामिक.*_

Vandana Kale,
CC/MSL.



टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- 
 सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

◾विशेष लेख :- प्रारब्धवशात जे आहे तेच होते...उदाहरणासकट

फक्त व्यक्त व्हायला शिका...

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾विशेष लेख :- प्रारब्धवशात जे आहे तेच होते...उदाहरणासकट