प्रयत्न सुरू ठेवा, यश नक्कीच मिळेल...
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आज अचानक मन जरा स्थिरावलं... काय गमावलं, काय कमावलं... याचा हिशोब मला कळेना, म्हणून मी जरा मागे डोकावून पाहिलं.. नवीन काही करायचं ठरवलं तर.. हरण्याची भीती कायम मनाला सतावत होती. अख्खा जग समोर आणि मी जगाच्या मागे आहे, हा विचार एकसारखा मनात गोंधळ घालत होता..
एरवी मला सगळेच म्हणायचे, तू काहीच करु शकत नाही..!
असे म्हणणारे खूप मिळाले. पण मी का करु शकत नाही...? कसं करु शकत नाही...? हे ठरवणारे ते कोण..!! कोण का करू शकतो, कसं करू शकतो.. का करू शकत नाही.. हे आपण कुणाबद्दल नाही ठरवू शकत.. मुळात तो आपल्याला अधिकारच नाही.
काय करायचं, काय नाही. हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं..!!
पण कुठेतरी ऐकलं होतं.. प्रत्येक नवीन गोष्टीची सुरुवात ही 'हो' म्हणून करायची असते. मनात ठरवलं आणि प्रत्येक गोष्ट स्वतःच्या मनाने करू लागलो. आजपर्यंत आयुष्यात प्रवास करताना थोडी घाई झाली.
पण आज कुठे समोर जाऊन मनाला शांती मिळाली.
मी यशस्वी झाल्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. जिंकल्यानंतर हरण्याची भीती मनात राहीलीच नाही. रोजचा माझा तो अस्वस्थ चेहरा आज पाठीमागे लपून बसला होता. आणि आज तोच चेहरा बहरून आलेल्या मोगऱ्यासारखा हसत, खेळत होता.
यशस्वी होण्याची जिद्द मनात असेल तर हरण्याची भीती मनात ठेवू नका. एखादी गोष्ट साध्य करायची असेल, मिळवायची असेल.. तर मिळेपर्यंत त्या ध्येयाचा, त्या गोष्टीचा पाठलाग सोडू नका.. तुमचे प्रयत्न सुरू असतील तर आपोआपच एक दिवस नक्कीच यश तुमच्या पदरी पडेल..
- विशाल मोहुर्ले
पवनपार, सिंदेवाही, चंद्रपूर
मो. ७०८३३३५०५३
______________________________________________
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा