◾कविता :- तुजविण शून्य ...

➖➖➖➖🌸🌈🌸➖➖➖➖

‼ 'मराठीचे शिलेदार कविता ' समूहात काल देण्यात आलेल्या विषयावर निवडक सदस्यांनी केलेले 'कविता लेखन'.‼

➖➖➖➖🌸🌈🌸➖➖➖➖

मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम

➖➖➖➖🌸🌈🌸➖➖➖➖

♾🧡♾🧡♾🧡♾🧡♾🧡♾

     🙏विषय :-  तुजविण शून्य🙏

       🎋दिनांक:-२९ जानेवारी २०२१ 🎋

♾🧡♾🧡♾🧡♾🧡♾🧡♾

"जगणे ते माझे जाहले

आता तुजविण शून्य"

"कशाचीही सर नाही

येणार भेटले जरी अन्य"

"सहवास लाभला तुझा

झालो मी जीवनी धन्य"

"आता उरल्यात आठवणी

जग हे तुझ्याविना शून्य"

"तुझ्या सहवासात होतो

सुखी समाधानी आनंदी" 

"होतीस तू फक्त निरागस 

निर्मळ मनाची स्वच्छंदी"

"या जन्मी तरी तुझ्यासारखी

भेटणार नाही सखी सोबती"

"नाही मिळणार तो सहवास

जरी भेटले अवती भोवती"

"लाभले ते क्षण सुखाचे

केले तू कितीतरी पुण्य"

"तुझ्याच आठवणीत राहीन

बाकी फक्त तुजविण शून्य"

✍️ श्री हणमंत गोरे

मुपो:घेरडी,ता:सांगोला,जि:सोलापूर

(©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह)

🌀❄️🌀❄️🌀❄️🌀❄️🌀

➖ तुजविण शून्य ➖ 

             तुझ्या सोबतीनं सखे

      सर्वांर्थी वसंत फुलला 

उन्हात चांदणं पडता

      हृदयचोर कसा खुलला ? 

तुझ्या स्नेहगंधाचा ठेवा 

      हृदयकुपीला करे सुगंधी

स्वप्नकिनारा गं गाठताना

      शब्दास्राची का जुगलबंदी

शब्दबाण लागता जिव्हारी

       गर्भगळीत झाला गाभारा

स्वप्नभंगाच्या गं दाहकतेनं

       घोंघावतोय गं वादळवारा

संशयाचं भूत मानगुटीवर

       विश्वासाला गं गेलाय तडा

लुप्त झालं चांदणं सुखाचं

       तुटलं नातं ना रंगला विडा

तुजविण शून्य सखे जीवन

      होईल कसे गं मनोमिलन ?

जखमेवर मीठ नकोस चोळू

     ओठांना ताक लागलं पोळू

  ✍️ श्री.संग्राम कुमठेकर

          मु.पो.कुमठा (बु.)

    ता.अहमदपूर जि.लातूर

सहप्रशासक/परीक्षक/संकलक

©️मराठीचे शिलेदार समूह

🌀❄️🌀❄️🌀❄️🌀❄️🌀

कशी वर्णु गं मी

आई तुझी थोरवी

अतुलनीय माया तुझी

पदोपदी मोहवी.

तुच माझी छाया

तुच माझे सर्वस्व

नीतीमुल्य रुजवून

दिले मला पूर्णत्व.

तुच माझे दैवत अन्

मनमंदिरातील कळस

तुच माझे अंतराळ नि

अंगणातील तुळस.

आई तुझ्यामुळेच घेई

लेकरू तुझं गगनभरारी

तुझ्या आशीर्वादानेच येई

जीवनास नवी उभारी.

तुजविण शुन्य हे

जग आहे सारे

अंतरी लुकलुकती

आठवणींचे तारे.

✍️सौ.सुजाता सोनवणे

सिलवासा दादरा नगर हवेली.

सदस्या मराठीचे शिलेदार समूह.

🌀❄️🌀❄️🌀❄️🌀❄️🌀

♾🧡♾🧡♾🧡♾🧡♾🧡♾

➖➖➖➖🌸🌈🌸➖➖➖➖

           🙏संकलन/मुख्य सहप्रशासक🙏 

 ✏सौ.कल्पना शाह,डोंबिवली,जि.ठाणे                  

 ©मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह

➖➖➖➖🌸🌈🌸➖➖➖➖

असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी आमचे YouTube चैनल सबस्क्राईब करा

दररोज प्रेरणादायक माहिती वाचण्यासाठी खालील Whatsapp समुहा मध्ये सहभागी व्हा

-{ आणि लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-

📱आवडल्यास नक्की शेअर करा📱

टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

फक्त व्यक्त व्हायला शिका...

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾थोडं मनातलं :- नवरा बायको मधील प्रेमल संवाद| Marathi Audiobook | audio story

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट