◾कविता :- व्यथा
पाहून तुझी कामाची लगबग,
होते माझ्याच मनाची तगमग,
करत असते तू सतत कुटुंबासाठी धावाधाव,
मात्र कोणाच्याही नजरेत दिसले नाही कधी....
तुझ्याबद्दल जराही आपुलकी चे भाव,
कसं ग ? तुझं फाटकं नशीब हे आई,
आठवते मला अजूनही तुझी ती अंगाई,
लळीवार शब्दातूनच तुझ्या,
फुटायचा माझ्यासाठी तुझ्या मायेचा पाझर,
किल्मिष आज मनात माझ्या एकच,
होतोय का ? माझ्याकडूनच 'त्या' अंगाई चा आदर,
सवालांच्या ह्या वावटळात मी
आज अडकलो आहे गं आई,
शोधू कुठे मी आज ?
तुझी ती वात्सल्याची अंगाई,
पसरला आहे चोहिकडे आज.....
माणसात हरवलेल्या माणूसकीचा अंधार,
आई आहे फक्त ह्या काळोखात
माझा तुला अन् तुझा मला अधार,
ऋनाणुबंधात आपल्या,
उरली आहे फक्त एवढीच रग,
पाहून तुझी कामाची लगबग,
होते माझ्याच मनाची तगमग.
➖➖➖➖➖➖🔴➖➖➖➖➖➖
दररोज प्रेरणादायक माहिती वाचण्यासाठी खालील Whatsapp समुहा मध्ये सहभागी व्हा
-{ आणि लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
📱आवडल्यास नक्की शेअर करा📱
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा