नकळत आत्मपरीक्षण ...
१ -- सिग्नलवर उभ्या असलेल्या एका फकीराने हात पुढे केले. मी खिसे तपासले तर फक्त हजाराची नोट निघाली. मी त्याला देऊन टाकली. बाबा सांगायचे साधू-फकीराला रिकाम्या हाती धाडू नये. तेव्हा मी विचारलेलं, "तो स्वस्थ, हट्टाकट्टा असला तरीही?" त्यावर बाबांनी हजरत अली साहेबांचं एक वचन ऐकवलेलं, "देवाने आपल्याला आपल्या लायकीपेक्षाही खूप दिलेलं असतं." दुसऱ्या दिवशी मला पुन्हा त्या सिग्नलला थांबावं लागलं. आणि मी पाहिलं.. कालचा भीक मागणारा फकीर आज नारळ विकतो आहे. ●●●●● २ -- "माझी तीन मुलं आहेत. ते नेहमी एकत्र राहावेत. म्हणून मीे तीन मजली घर बांधलं," असं आमचा बाप म्हणायचा. तो गेल्यावर आम्ही हे घर विकायला काढलं. आम्ही तीन भाऊ ना एकत्र राहू शकतो, ना आमच्या बायका. घर विक्रीची बातमी पेपरमध्ये दिली. बरेचजण घर घ्यायला ऊत्सूक होते. त्यातल्या एकाशी सौदा ठरला. मी सहज म्हणून त्यांना विचारलं, "हे घर तुम्हांला का आवडलं?" त्यावर ते म्हणाले, " माझी तीन मुलं आहेत. ते नेहमी एकत्र राहावेत. म्हणून मला तीन मजली घर हवंय...' ●●●●● ३ -- खूप चालायला लागयचं तेव्हा रडायला व्हायचं.