पोस्ट्स

ई-बुक :- माझ्या कविता | Arjun apparao jadhav

इमेज
माझ्या सर्व कविता ई-बुक स्वरूपात उपलब्ध आहेत... माझ्या सदर सर्व कविता वाचण्यासाठी खालील दिलेल्या  बाय बटन वर क्लिक करून  खरेदी करा ! _______________________________________ टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-   सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅ Buy Now

बोधकथा :- गाय आणि वाघ

इमेज
एक गाय गवत चरायला जंगलात जाते. संध्याकाळच्या वेळेस तिच्या लक्षात आले की, एक वाघ तिच्याकडे दबक्या पावलाने येत आहे. ती भीतीने इकडे तिकडे पळू लागली. वाघ सुद्धा तिच्या पाठीमागे धावू लागला. धावता धावता गाय एका तलावापाशी पोहचली आणि घाबरलेली गाय त्या तलावात शिरली.. वाघ देखील तिच्या पाठीमागे त्या तलावात शिरला. त्या दोघांनाही कळून चुकले की तलाव फारसा खोल नाही आणि त्यात पाणी सुद्धा कमी आहे ,मात्र चिखल जास्त आहे. त्या दोघांमधील अंतर तसे कमी होते परंतु ते दोघेही काही करू शकत नव्हते. गाय त्या चिखलात हळूहळू रुतायला लागली. वाघ तिच्या अगदी जवळ होता, परंतु तो सुद्धा त्यात रुतायला लागला होता. दोघेही अगदी गळ्यापर्यंत रुतलेली होती. दोघेही हलू शकत नव्हते. थोड्या वेळाने गाईने वाघाला विचारले, तुझा कोणी गुरू किंवा मालक आहे का ? वाघ रागाने म्हणाला , मी तर या जंगलाचा राजा आहे; माझा कोणी मालक नाही; मीच ह्या जंगलाचा मालक आहे. गाय त्याला म्हणाली ,परंतु तुझी शक्ती तुला याक्षणी काहीच उपयोगाची नाही. वाघ गायीला म्हणाला की, तुझे हाल देखील माझ्या सारखेच आहेत की . तेव्हा गाय त्याला हसून म्हणाली, बिलकुल नाही माझा माल

माणसं मनातली..!!

इमेज
माणसं मनातली..!! मोगऱ्याचं फूल ओंजळीत घेतलं की त्याचा गंध मनाला, शरीराला प्रसन्न करून जातो. सहवासातील माणसाचं देखील असंच असतं. काही माणसं काही क्षणातच मनाला खूप आवडतात, आपली होऊन जातात. तर, काही कितीही सहवासात राहिली, तरी त्यांची आतून ओढ नसतेच... चेहरा बघण्यापेक्षा नेहमीच समोरच्याच्या मनात उतरून बघावं. शोधूनही तिथं माणूसपण सापडत नसेल, तर त्याचं सुंदर दिसणंही मग किळसवाणं वाटतं... शरीराची सुंदरता वया बरोबर संपते, तर मनाची सुंदरता शेवटपर्यंत टिकून राहाते. शरीराला वय असतं, मनाला ते कधीच नसतं... शेवटी काय, आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो, शरीर तर निमित्त मात्र असतं. माणसाच्या स्वभावात गोडवा, शालीनता, प्रामाणिकपणा, आणि विनयशीलता असेल, तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तरी ती हवीहवीशी वाटते... म्हणूनच बाहेर लक्ष दिव्याची सुंदर आरास असूनही, देवघरातील समईच्या तेजापुढं आपण नतमस्तक होतो... आयुष्यात अशी माणसं कधी भेटली तर त्यांच्यावर जीवापाड प्रेम करावं!! आपल्या आवडत्या माणसाचं आपल्या सोबत असणं, ही आयुष्यातील सगळ्यात मोठी कमाई... ती प्रत्येकाच्या वाट्याला येतेच असं नाही. आजकाल अशी

फक्त व्यक्त व्हायला शिका...

इमेज
शब्दरूपं आले....मुक्या भावनांना. व्यक्तं होणं....मग ते शब्दांतून असो स्पर्शातूनं असो डोळ्यांतून असो वा असो फक्त श्वासांतून...... वा सहवासातून. व्यक्त होणं खूप गरजेचं असतं असं मला वाटतं... शब्दातून व्यक्त होणं व्हा व्यक्त होण्याचा खरा "राजमार्ग" आहे...मात्र बऱ्याच वेळा शब्दं फुरंगटून बसतात....भावना रुसूनं बसतात...आणि मग होत राहते घुसमट....मनातल्या मनात थिजलेल्या या अबोल अशा क्षणांची...शब्दांची! सुरू होते घालमेल...मनातल्या स्वप्नांची. पण अचानक कधीतरी.... एका निवांत क्षणीं होतो साक्षांत्कार... नि शब्द घेवू लागतात मनासारखा आकार...आणि साकारू लागते भावभावनांची अनोखी अशी मूर्ती जी क्षणांत बोलू लागेल आणि मुक्या मुक्या झालेल्या भावनांही शब्दरूप घेवू लागतील...                आपण मनुष्य प्राणी खूप भाग्यवानं आहोत की आपल्याला "भाषेचं" हे 'अमूल्य दान' ईश्वराने दिलेलं आहे.भाषा ही एखाद्या नदी सारखी प्रवाही असते..जी कायम खळाळतं राहते.नदीचं हे खळाळणं...आणि भाषेचं उच्चारणं हे कानाला नेहमीचं मधुर वाटत राहतं.याच भाषेच्या उच्चारातून घडत राहतो तो संवाद..इतर कोणतेही प्राणी आपल्या स

आयूष्याची दिशा ठरवण्याच एक वय असतं...

इमेज
आयूष्याची दिशा ठरवण्याच एक वय असतं. पोटपाण्यापुरती शेती असली तरी काहीतरी नोकरी असावी म्हणून सुरूवातीला शेती ऐवजी नोकरी हा पर्याय निवडला जातो.. नोकरीत प्रत्येक दिवस काहीतरी सुधारणा होईल, पगारवाढ होईल या आशेने बारा - पंधरा वर्ष निघून जातात..  नंतर केवळ नोकरीच्या भरोशावर कुटूंबाच भागत नाही याची जाणीव झाल्यावर उगाच नोकरी निवडली, शेती केली अस्ती तर बर झाल असा पश्चाताप मनात येऊ लागतो. पण...... नोकरीत पंधरा वीस वर्ष गेलेले असतात, आता पुन्हा नोकरी सोडून शेती करणे शक्य नसतं.. कारण शेतीच काम शिकण्याच्या काळात शेती हा पर्याय नाकारून नोकरीचे प्रयत्न करून नोकरी स्विकारलेली असते.. चाळीस - पंचेचाळीस वयात शुन्यातून शेती शिकणे शक्य नाही.. नोकरीत भागत नाही.. नोकरी सोडून आता शेतीकडे वळू शकत नाही.. ईकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती होते.. आणि हीच परिस्थिती सरकार माहीत असते आणि तुम्हाला गृहीत धरले जाते.. त्यांना माहित असतय तुम्ही हतबल आहात, कितीही कमी पगार द्या, कितीही राबवून घ्या.. आता तुम्ही काहीच करू शकत नाही.. पुन्हा पण.. आत्महत्या हा पर्याय नाहीच.. सरकार कधीच पर्याय शोधू शकत नाही.. तो आपल्याला

कानाचे आत्मवृत्त...

इमेज
कानाचे आत्मवृत्त 👂👂 मी आहे कान! खरं म्हणजे 'आम्ही आहोत' कान! कारण आम्ही दोन आहोत! आम्ही जुळे भाऊ आहोत. पण आमचं नशीबच असं आहे की आजपर्यंत आम्ही एकमेकांना पाहीलेलंही नाही. कुठल्या शापामुळे आम्हांला असं विरुद्ध दिशांना चिकटवून पाठवून दिलंय काही समजत नाही. दुःख एवढंच नाही, आमच्यावर जबाबदारी ही फक्त 'ऐकण्याची' सोपविली गेल्ये. शिव्या असोत की ओव्या, चांगलं असो की वाईट, सगळं आम्ही ऐकतच असतो. हळूहळू आम्हांला 'खुंटी' सारखं वागविलं जाऊ लागलं. चष्मा सांभाळायचं काम आम्हांला दिलं गेलं. फ्रेमची काडी जोखडासारखी आम्हांवर ठेवली गेली. (खरं म्हणजे चष्मा हा तर डोळ्यांशी संबंधित आहे. आम्हाला मध्ये आणण्याचा प्रश्नच नव्हता.) लहान मुले अभ्यास करीत नाहीत किंवा त्यांच्या डोक्यात काही शिरत नाही तेव्हा मास्तर पिरगळतात मात्र आम्हांला! भिकबाळी, झुमके, डूल, कुडी हे सर्व आमच्यावरच लटकविलं जातं. त्यासाठी छिद्र 'आमच्यावर' पाडावी लागतात, पण कौतुक होतं चेह-याचं! आणि सौंदर्य प्रसाधने पहाल तर आमच्या वाट्याला काहीच नाही. डोळ्यांसाठी काजळ, चेह-यासाठी क्रीम, ओठांसाठी लिपस्टिक! पण आम्ही

"बंड्याची चाळ" | संजय धनगव्हाळ | विनोदी कथा

इमेज
"बंड्याची चाळ" संजय धनगव्हाळ (विनोदी कथा) **************** बंड्या म्हणजे चाळीतला विनोदी पुरुष तो रोजं काहीना काही कारणाने चाळीत हाश्यकल्लोळ करायचा बंड्याचा विनोदी स्वभाव असल्यामुळे चाळीकरी सतत हसतचं रहायचे बंड्याचा सर्वांना एकच सल्ला होता.माणसाने कसं नेहमीच हसतं रहायचे.कितीही चिंता दुःख ताणतणाव असला तरी हसल्यामुळे माणूस नौराशात रहात नाही. चेहरा नेहमीच हसरा राहतो आणि आनंदाने फुलतो म्हणून रोज रात्री सर्व चाळकरी जेवण आटोपल्यावर चाळीतल्या ओट्यावर एकत्र जमून विनदांचा हाश्यगजर करतं असे.तसे चाळीत नमुनेही भरपूर होते.त्यापैकी एक म्हणजे दामू मास्तर,एक नंबरचा बावळट तिरसट माणूस. त्याच्यासारखा तामसी माणूस साऱ्या पंचक्रोशीत नव्हताचं. त्यांची एकुलती एक कंन्या चिंगी,तिच बंड्याशी सुत जुळलं होतं पण दोघांच लग्न काही होईना,मग काय बंड्या काही केल्या शांत बसणारा नव्हता.एकदा तो ज्योतिष्याचा वेश धारण करून दामू मास्तरच्या घरी धडकला.मास्तरलाही भविष्य जाणून घ्यायची उत्सुकता म्हणून मास्तरने बंड्याच्या हातात हात दिला आणि काय.... ( पुढिल भाग वाचण्यासाठी कृपया इथे क्लिक करा ) संजय धन

खालील जिवनाच्या वाटेवर/विषयांवर आधारित मार्गदर्शन पर लेख

इमेज
जिवन जगताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्या आसपास घडणाऱ्या प्रत्येक घटना मागे एक कारण आहे विनाकारण येथे या विश्वात काहिच नाही घडत. जीवन म्हणजे काय जन्म मृत्यू बालपण शिक्षण भय सुख दु:ख आनंद त्याग स्वार्थ ब्रम्हचर्य परिपूर्ण अहंकार करिअर रडणं हसणं मैत्री प्रेम माणुसकी देशप्रेम एकनिष्ठ ध्येय व्यायाम वाचन लेखन पर्यटन सवय संगत ऐकणे बोलणं आभार वेळ काळाशी मैत्री भविष्य यश अपयश तयारी नियोजन डेरिंग मोटिवेटेड खगोलीय यांत्रिक _________________________________ टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-   सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

गरूडाच्या पिल्लांची ट्रेनिंग कशी असते ?

इमेज
🦅 गरुड 🦅 *गरुड पक्षी ज्याला आपण गरुड किंवा शाहीनसुद्धा म्हणतो.*  *ज्या वयात इतर पक्ष्यांची पिल्ल आवाज करायला शिकतात त्या वयात मादी गरुड तिची पिल्ल पंजामध्ये पकडते आणि उंच उडते.*  *इतर कुणालाही पक्ष्यांच्या जगात असे कठोर आणि घट्ट प्रशिक्षण नसते.* *मादी गरुड तिच्या पिल्लाला सुमारे 12 कि.मी. वरपर्यंत नेते.*  *जेवढ्या वर विमान उडत असते एवढ्या वर जाण्यास मादी गरुड ७/८ मिनट घेते.*  *येथून त्या चिमुरड्या पिल्लाची कठोर परीक्षा सुरू होते.*  *त्याला येथे सांगितले जाते आपण कशासाठी जन्माला आलो आहोत?*  *आपले जग काय आहे?* *आपली उंची किती आहे?*  *आणि नंतर मादी गरुड आपल्या पंजातून त्या पिल्लाला खाली सोडते.* *वरुन खाली पडत असताना 2 कि.मी. अंतरानंतर खाली येताना, त्या पिल्लाला कळतच नाही की त्याच्या बरोबर काय घडतं आहे.* *अंदाजे 7 किमी च्या अंतरानंतर पिल्लाचे पंख हळू हळु उघडण्यास सुरुवात होते.*  *सुमारे 9 किमी अंतरावर त्यांचे पंख आगमनानंतर पूर्णपणे उघडले जातात.*  *जीवनाचा हा पहिला टप्पा असतो जेव्हा पिल्लू आपले पंख फडफडू लागतो.*  *आता ते पिल्लू जमिनीपासून फक्त सुमारे 3000 मीटर अंतरावर आह

कविता :- आमचाही एक जमाना होता

इमेज
🌹 आमचाही एक जमाना होता 🌹 पाचव्या यत्तेपासून शाळेत सायकलने आम्हाला पाठवायची पद्धत होती,बस ची चैन परवडत नव्हती.  आम्ही गाडीखाली येऊ अशी  भीती आमच्या आई वडिलांना कधी वाटलीच नाही.           पास / नापास हेच  आम्हाला कळत होतं... *%* चा आणि आमचा  संबंध कधीच नव्हता.        शिकवणी लावली,  हे सांगायला लाज वाटायची....  कारण *"ढ"* असं  हीणवलं जायचं...        पुस्तकामध्ये झाडाची  पानं आणि मोरपिस ठेवून  आम्ही हुशार होऊ शकतो,  असा आमचा दृढ विश्वास  होता...        कापडाच्या पिशवीत आणि नंतर चैन म्हणून पत्र्याच्या पेटीत  पुस्तकं आणि वह्या  रचण्याचा शिरस्ता हे आमचं  एक निर्मितीकौशल्य होतं.        दरवर्षी जेव्हा नव्या  इयत्तेचं दप्तर भरायचो  त्याआधी, पुस्तकं आणि  वह्यांना कव्हर्स घालणे,  हा आमच्या जीवनातला  एक वार्षिक उत्सव  असायचा... चौकात जाऊन वर्ष सम्पल्यानंतर  पुस्तके विकणे आणि त्यातली थोडी रक्कम पेरू साठी  आणि गोळीवाल्याकडून गोळ्या खाण्यासाठी  ढापण्यात आम्हाला काहीही लाज वाटत नसे.        आई वडिलांना  आमच्या शिक्षणाची फारशी  फिकीर नव्हती आणि   आमचे शिक्षण त्यांच्यावर  फारसा बोजाही

मास्तर...वेगळाच

इमेज
मास्तर...वेगळाच          सिनसिनाटी एअरपोर्ट पासून माझं हॉटेल साधारण अर्ध्या तासाच्या अंतरावर होतं. रस्त्यात एक अपघात झाला होता. त्यामुळे मला जवळपास एक तास लागला. उबर टॅक्सी केली होती. डोनाल्ड नाव होतं ड्रायव्हरचं. साधारण पंचावन्न वगैरे वय असावं. डोनाल्ड गप्पा मारत होता. तो ज्या पद्धतीने माझ्याशी बोलत होता त्याने मी आश्चर्यचकित झालो होतो. जगातल्या घडामोडीबद्दल त्याला ज्ञान होतं. भारताबद्दल त्याला माहिती होती. मी डोनाल्डला विचारलं "उबर टॅक्सी चा बिझिनेस करण्याआधी, तू काय करत होता?". त्याने जे उत्तर दिलं, ते ऐकून मी सर्द झालो. तो म्हणाला "आयएनजी मध्ये मी फायनान्स चा व्हाईस प्रेसिडेंट होतो. आणि त्यानंतर अकसा मध्ये." मी आपल्या मराठी मानसिकतेला जागून त्याला विचारलं "इतक्या चांगल्या पगाराची नोकरी तू का सोडली?". डोनाल्ड म्हणाला "भविष्यात मला जितके पैसे लागतील ते माझे जमा झाले होते. मला फक्त आजचा खर्च भागवायची गरज होती. माझ्या फायनान्स जॉब मध्ये टेन्शन होतं आणि तितक्या पैशाची गरज नव्हती. उबर बिझिनेस हा परफेक्ट ऑप्शन होता. मला पैसे मिळतात, अनेक ठिकाणी फिरायला म

कविता :- माझं गाऱ्हाणं

इमेज
माझं गाऱ्हाणं मिच मला सांगतो आरशात पाहून चेहऱ्यावरचे भाव पहातो भाव तसे बदललेले दिसतात अश्रुंनाच फक्त ते कळलेले असतात मग कुठेतरी एकांतात एकटाच बसतो आणि माझे दुःख मलाच ऐकवतो तेव्हा कितीतरी वेदना अवतीभवती असतात काळजावरच्या जखमाही सोबत दिसतात खूप गहिवरून येते मनावरचे ओरखडे पाहून एक एक घाव आठवतांना हुंदके येतात राहून राहून भावनाही अपमाना   खाली  दाबल्या जातात अंतकरणात गुदमरून  मेलेल्या दिसतात दोन शब्द प्रेमाचे बोलं कोणीही बोलतं नाही आपुलकीचा होकार  कोणी देत नाही पदोपदीच्या तिरस्काराचा  कंटाळा आला असतो खचलेल्या देहाला  भावनिक आधारही नसतो खरचं कुणाच काहीही होवू दे जे घाव देतात ते  दुसऱ्यांसाठी कमी आणि स्वतःसाठी जास्त जगतात हळव्या मनावर हळवी फुंकरही घालत नसतात काय सांगावं या जगातं  खरेपणाने वागणाऱ्यांना  कोणी जगु देतं नाही द्रुष्ट वृत्तीचा वध करण्यासाठी कोणी राम होवू देत नाही *संजय धनगव्हाळ* धुळे ९४२२८९२६१८ ________________________________ टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-   सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

Osho च्या गोष्टी

इमेज

कविता :- दीक्षाभूमी ... | मराठीचे शिलेदार समुह नागपूर

इमेज
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖    ‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित 'बुधवारीय काव्यरत्न' कविता स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना‼ ➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖ मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम ➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖   🎗🎗🎗 सर्वोत्कृष्ट दहा 🎗🎗🎗          🔵विषय : दीक्षाभूमी🔵     🍂बुधवार : १३/ १० /२०२१🍂 ➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖ दीक्षाभूमी नागवंशाची नागपूर नगरी पवित्र तीर्थक्षेत्र  बौद्धांतरी वर्षानुवर्षे अनादी काळात नागवंशी  जगत  संघर्षात हक्कांसाठी  होते  झगडत भीमराव, तेच कूळ  सांगत दलितांचे जीवन हलाखीत पाहून,सोसून भीम क्रोधीत अपमान,अवहेलना करिती अस्पृश्यास उच्चभ्रू  छळती  तयारीच नव्हती सवर्णांची माणसात तयां  गणण्याची  कुशाग्र  बुद्धीचा हा बॅरिस्टर आढावा  देशाचा घेई चौफेर ज्या  धर्मात  नसे मी  मानव नाही ठेवली  तयाची कणव  स्विकारला बौद्ध धर्म  जावून हजारो    अनुयायांना   घेवून दिक्षाभूमी तीच ठरली  तीर्थ दलितांना उद्धारण्या प्रित्यर्थ शिका,संघटीतव्हा,संघर्ष करा जागविली चेतना  दलितांतरा आस लाखोंना तिथे जाण्याची दैवता    ह्दयात    स्मरण्याची! सौ.संगीता पांढरे इंदापूर, पुणे ©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह ♾️🔹♾️🔹🔵

10 Teachings of Lord Krishna That Will Change The Way You Look At Life

इमेज

जगातील काही कटू वचने

इमेज
🙏🙏परफेक्ट जोड्या फक्त चपलाच्या असतात बाकी सगळं गैरसमज आहे. 🙏🙏कचरापेटीत पडलेली भाकरीच सांगते की माणूस पोट भरल की त्याची लायकी विसरतो. 🙏🙏जेवताना शेतकऱ्याचे आणि झोपताना सैनिकाचे आभार मानायला विसरु नये. 🙏🙏कोणतेही कर्म करा पण एक गोष्ट विसरु नका परमेश्वर नेहमी ONLINE असतो. 🙏🙏SORRY माणसाने म्हटले की भांडण संपते आणि डॉक्टरनी म्हटले की माणूस संपतो. 🙏🙏नातं हृदयातून असाव रक्ताची नातं हल्ली वृद्धश्रमात सापडतात. 🙏🙏लाकडाच्या ओंडक्यानी भरलेल्या ट्रकच्या फळीवर लिहिले होते "झाड़े लावा झाड़े जगवा". 🙏🙏नाती जीवंतपणीच संभाळा ताजमहल जगाने पाहिला पण मुमताजने नाही. 🙏🙏"चमचा" ज्या भांडयात असतो त्यालाच तो रिकामा करतो "चमच्या" पासून सावध रहा. 🙏🙏"उपवास" नेहमी अन्नाचाच का करता? कधी कधी क्रोधाचा आणि वाईटाचाही करा. 🙏🙏"भावना" ही जगातील सर्वात खतरनाक नदी आहे ह्यात सगळे वाहून जातात. ___________________________________ टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-   सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना.

इमेज
समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत. अतीकोपता कार्य जाते लयाला, अती नम्रता पात्र होते भयाला । अती काम ते कोणतेही नसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १ ।। अती लोभ आणी जना नित्य लाज, अती त्याग तो रोकडा मृत्य आज । सदा तृप्त नेमस्त सर्वां दिसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। २ ।। अती मोह हा दु:ख शोकास मूळ, अती काळजी टाकणे हेही खूळ । सदा चित्त हे सद्विचारे कसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ३ ।। अती ज्ञान अभ्यासल्या क्षीण काया, अती खेळणे हा भिकेचाच पाया । न कष्टाविणे त्वा रिकामे बसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ४ ।। अती दान तेही प्रपंचात छिद्र, अती हीन कार्पण्य मोठे दरिद्र । बरे कोणते ते मनाला पुसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ५ ।। अती भोजने रोग येतो घराला, उपासे अती कष्ट होती नराला । फुका सांग देवावरी का रुसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ६ ।। अती स्नेह तेथे अवज्ञा उदंड, अती द्वेष भूलोकीचे पंककुंड । अती मत्सरे त्वां कशाला कुसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ७ ।। अती आळशी वाचुनी प्रेतरूप, अती झोप घे तोही त्याचाच भूप । सदा सत्कृतीमाजी आत्

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾विशेष लेख :- प्रारब्धवशात जे आहे तेच होते...उदाहरणासकट