◾यशाचा मंत्र :- तुम्हाला दैनंदिन जीवनातल्या न आवडणाऱ्या गोष्टी | Most likely things in life
-------------------------------------------
तुम्हाला दैनंदिन जीवनातल्या न
आवडणाऱ्या गोष्टी
--------------------------------------------
१) खोटे हास्य :
हि गोष्ट रोजच सर्वांना करावी लागते . स्वतःच्या डोक्यात काही तणाव असेलतरी कोणी भेटले की खोटे हास्य करुन बोलावे लागते. काही न आवडणार्या लोकांना देखील खोटी स्माईल द्यावी लागतेच . या रोजच्या औपचारीक हास्याचा कंटाळा येतो.
२). वरीष्ठांच्या हो मधे हो मिसळावे लागते :
स्वतःचे मत वेगळे असेल तरीही आपल्यापेक्षा मोठ्या असणार्या व्यक्तीच्या मताला हो म्हणावे लागते कारण, आपण त्यांच्या खाली काम करत असतो . मग भलेही ,नंतर त्या व्यक्तीचं मत चुकीचं व तुमचं मत बरोबर निघालं तरीही मौन ठेवावे लागते .
3. रस्त्यावरील महानायक :
स्वतःच्या वाहन चालवण्याच्या अडाणी शैलीने ट्राफिक जाम करणारे महानायक जाम परेशान करतात . त्यात भर म्हणुन स्वसुखासाठी व स्वमृत्युसाठी खाल्लेली पुडी रस्त्यावर थुंकुन दुसर्यांच डोकं फिरवणार्यांचा सामना करणेही तितकीच नावडती गोष्ट . रोजच असे रस्त्याला मौत का कुआं समजणारे २-३नग नक्की दिसतात .
४). नेहमीच गडबड असणारे महानुभव व्यक्ती :
प्रत्येक मिनिटाला झालं का ?अजुन किती वेळ ? असे प्रश्न
ज्या कामासाठी जातोय त्यासाठी वेळ काढावा आणि घाई करु नये ,ईतकी साधी गोष्ट कसं समजत नसेल बरं
५). धुळ,प्रदुषण :
मी ज्या ठिकाणी राहते. त्या ठीकाणी थर्मल पॉवर स्टेशन असल्याने रोजच भरपुर प्रदुषण व धुळीचा सामना करावा लागतो ही दैनंदिन जीवनातील सर्वात नावडती गोष्ट.
६). रोजचे कंपनीचे निर्थक मेसेजेस व कॉल्स :
बापरे!! लोन पाहिजे का ? समजुतदार साथिदार पाहिजे? लॉटरी लागली आहे तुमच्या नंबरला . असे विना कारण येणारे मेसेजेस डोकं खराब करतात . कंपनीच्या कॉल्सबद्दल तर काय बोलावे , माणुस काही महत्वाच्या कामात असेल व मोबाईल जरा अंतरावर असेल . बरोबर त्याच वेळेला लगेच फोन वाजणार .मग आपल्याला वाटते जाऊ देत . कंपनीचा असेल असे म्हणुन आपण दुर्लक्ष करणार . पण परत विचार येणार ,महत्वाच्या कुणाचा फोन येत असेल तर चला बघुच ,म्हणुन पाहिलं की दिसणार स्पॅम नंबर . हा रोजचा प्रसंग रोज कोणासोबत तरी नक्कीच घडत असेल व त्या मोबाईल कंपनीला तळतळाट लागत असेल
हे कंपनीचे मेसेज डिलीट करण्यात आपण आयुष्यातला किती वेळ घालतो याचा हिशोब नाहिच
-----------------------------------------------
संकलन :- सतीश अलोणी
------------------------------------------------
••• वरील लेख आवडला तर नक्की शेअर करा •••
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा