◾माहिती :- माणसाचा स्वभाव...

माणसाच्या स्वभावाचा अंदाज घेण्याचे अनेक मार्ग आहेत .  

हस्ताक्षर, सही, दिसणे ,काही लकबी, वगैरे पण कधीकधी असे वाटते की पंगतीत वाढलेले ताट जेवताना,जेवण्याच्या आधी / नंतर त्याची जी प्रतिक्रिया असते त्यावरूनहि त्याच्या स्वभावाचा थोडा अंदाज येऊ शकतो.

म्हणजे बघा ..... 
समोर जेवणाचे ताट वाढून झाले आहे आणि आता खायला सुरुवात करायची आहे तेव्हा तो पहिला पदार्थही त्याच्या स्वभावाला अनुसरून उचलतो.
जसे की 
पुरण किंवा त्याबरोबरचे गोड पदार्थ पहिल्यांदा उचलणारी माणसे स्वभावाने पण गोड असतात,

तळण,पापड उचलणाऱ्या माणसांचा पापड लवकर मोडतो, 
त्यांच्यात patience कमी असतो.

वरणभात पहिल्यांदा खाणारी माणसे त्याप्रमाणेच साधी सरळ असतात ,ती कुठेही, कोणत्याही परिस्थितीत राहू शकतात.

भजी उचलणारी माणसे भज्या सारखीच कुरकुरीत,नर्मविनोदी आणि गप्पात प्रसन्नता आणणारी असतात,यांच्या सोबत असताना कधी कंटाळा येत नाही.

जेवणाची सुरुवात खिरीपासून आणि शेवट दहिभाताने करणारी नियम पाळणारी, आणि बऱ्यापैकी निरोगी असतात,

लोणचे कुठले आहे ? आंब्याचे, लिंबाचे का मिक्स हे पाहणारे आंबटशौकीन असतात

काही सगळ्या पदार्थाची थोडी थोडी चव घेऊन बघतात ते लोक अतिचिकित्सक असतात.
     
यात आणखी दोन उपप्रवाह आहेत.
पहिला जेवणाच्या आधी काही reactions असणारे आणि दुसरा जेवणा नंतरची reaction असणारे.
   
जेवणाच्या आधी ताटे ,भांडी घ्यायला सुरुवात झाली की भांडे स्वच्छ आहे का नाही हे बघणार आणि ताट वाढून झाल्यावर किंवा आधी पाणी चांगले आहे का नाही हे बघून त्याची चर्चा करणार. 
हे लोक जेवणाचा आनंद घ्यायचा सोडून यावरून मूड बिघडवून घेतात .
अशी माणसे कटकट्या स्वभावाची आणि जुळवून घेणारी नसतात, अशांना मित्रमंडळी कमी किंवा नसतीलच तर ते हि याच catagory तील असतात.
 
पंगतीत ताटे वाढणे सुरु आहे,
अशा वेळेला समोरच्याच्या पानात अमुक आहे... माझ्या पानात नाही... आत्ताच हवे म्हणून लोक वाढपी ला (चार चार वेळेला) बोलावून वाढून घेतात ,भले त्यांना तो पदार्थ जाणार असो वा नसो. 
हे लोक jelous असतात.
सतत त्यांना स्वतःची तुलना इतरांशी करायची सवय असते .
    
गोड पदार्थ वाढणारा मुख्य स्वयंपाकी ते वाढत असतानाच 
"मी काय म्हणालोे अहो बासुंदीच आहे ,म्हणजे 160 रुपये ताट, स्वस्त पडले " 
असा डायलॉग मारणारे एकतर लग्नात मुलाकडचे असतात किंवा अत्यंत व्यवहारी , कंजूष मनोवृत्तीचे असतात.

जेवणाच्या आधी आणि जेवताना सुद्धा जे लोक
'बाकी सगळे ठीक होते ,पण टॉयलेट काही नीट स्वच्छ नव्हते".
ती अत्यंत निगेटिव्ह मनोवृत्तीची असतात .
समोर चांगले ताट वाढले आहे त्याचा आस्वाद घ्यायचा सोडून असले काहीतरी फालतू विषय काढून ते स्वतःची जागा दाखवून देतात.

ताट वाढल्यावर त्यावर यथेच्छ ताव मारून मस्त ढेकर देणारे एकतर खवय्ये असतात किंवा स्वभावतःच आनंदी!
    
या सर्वांपलिकडे एक विशेष catagory आहे .
सगळे जेवण झाल्यावर 
"ताक आहे का ?" 
म्हणून विचारणार आणि नाही  म्हणल्यावर 
" अरेरे ताक असते ना तर मजा आली असती " 
असा शेरा मारणारे ... किरकिरे    
    
😩😩

टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

◾विशेष लेख :- प्रारब्धवशात जे आहे तेच होते...उदाहरणासकट

फक्त व्यक्त व्हायला शिका...

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट