शिक्षण आणि बदलते जग

....मला समजलेल मानसशास्त्र 337....

         .. सध्या शिक्षणातून अधोगती होते की.. प्रगती.. हा प्रश्न पडतो...अस म्हटलं जातं..की.. शिक्षणामुळे विचारांची व्याप्ती वाढते..आपण ..सारासार विचार करायला शिकतो.. दृष्टीकोन बदलतो.. नकारात्मक व सकारात्मकतेचा फरक कळतो.....आपण अधिक चांगल्या प्रकारे विचार करु शकतो
व....आपले हित अहित ..आपल्याला कळते.पण खरच असं आहे ?

                               ज्या शिक्षणामुळे ..अहंकार किंवा गर्वावर... आपणास विजय मिळवता येत नसेल..तर त्या शिक्षणाला.. किंवा स्वताला सुशिक्षित म्हणवून घ्यायला.. काय अर्थ आहे...मतभेद व मनभेद ...मिटविण्यासाठी एकदुसर्‍यास समजून घ्यावे लागते..पण तसे होतांना दिसत नाही.. उलटपक्षी ...स्वताचा अहंकार जपण्यासाठी.. जर स्वताची बुद्धी पणाला लावून...प्रतिपक्षाला नामोहरम केले जात असेल..तर खरच ..आपण सुशिक्षित होवून काय साधलं ...हा प्रश्न पडतो.

      आज घडीला कौटुंबिक हिंसा..वाद..डायव्होर्सचे.. प्रमाण वाढले आहेत.. त्यामुळे कित्येक कुटुंब.. देशोधडीला लागली आहेत. एकत्र कुटुंब पद्धतीला दोष देत ......स्वतंत्र म्हणजे विभक्त कुटुंब पद्धत .‌जन्मास आली....पण त्यातुनही काही साध्य झाले नाही.. 

                     खरंतर ..पतिपत्नी.. आणि मुलं.. ह्या कुटुंब पद्धतीत ..वादाला कारणंच नसली पाहिजेत..पण चौकोनी कुटुंबातही.. जर एकदुसर्‍याशी जमत नसेल..व त्याचा अंत जर कौटुंबिक वादविवाद..फारकत.. किंवा आत्महत्येत होत असेल ..तर गरज आहे आहे.. आपली मानसिकता तपासून पहाण्याची.. त्यासाठी शिकलं पाहिजे..... एकदुसर्‍यांच्या भावनांचा आदरकरण्याची....एकदुसर्‍यास समजून घेण्याची.. आणि त्यासाठी गरज आहे..... आत्मपरिक्षणाची..कारण जो स्वतातील गुणदोष ओळखायला शिकेल..तोच इतरांना..... गुणदोषासह स्विकारुन.‌.. मार्ग काढायला शिकेल.

               म्हणून विभक्त असो ..वा एकत्र कुटुंब पद्धत.. जोपर्यंत ...एकदुसर्‍यांच्या..विचारांचा..भावनांचा आदर करायला शिकत नाही.. तोपर्यंत यातून मार्ग निघणार नाही..आणि त्यासाठीच गरज आहे..निपक्षपातीपणे.. आत्मपरिक्षणाची..कारण हे शिक्षण महाविद्यालयांपेक्षा.. स्वताचा.. अभ्यास केल्यावर जास्त मिळते... म्हणून शिक्षणाइतकाच.. स्वअभ्यास म्हणजे आत्मपरिक्षण महत्वाचे.. व ..ते ..योग्य निरिक्षणातूनच साध्य होईल.

                          मग करुया आत्मपरिक्षण.. इतरांच्या भावना व विचारांचा आदर..मात्र हे एकाने करुन साधणार नाही ..तर हे प्रत्येकानेच करायला हवे..तरच घडेल ..एक आनंद व समाधानाने परिपूर्ण कुटुंब व ..समाज.

     नेहमीप्रमाणेच स्वस्थ राहा ❤️ मस्त राहा ❤️

टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

फक्त व्यक्त व्हायला शिका...

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾थोडं मनातलं :- नवरा बायको मधील प्रेमल संवाद| Marathi Audiobook | audio story

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट