चुक ...

🌀🌀🌀🌀🌀🏵️🌀🌀🌀🌀🌀
'चुक'.

आज जवळ जवळ पंचवीस वर्षांनी भेटत होते ते एकमेकांना... अगदी ठरवल्याप्रमाणे. पंचवीस वर्षांपुर्वी ह्याच दिवशी... जेव्हा त्यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब झालं होतं... घरातून बॅग घेऊन बाहेर पडतांना, ती म्हणाली होती त्याला.*

*"एकदाच भेटू एकमेकांना, नी प्रामाणीकपणे सांगू की आपण घेतलेला निर्णय बरोबर होता की चुकला होता".*

*त्यांची पहिली भेट ज्या रतलाम स्टेशनवर झाली होती तिथेच भेटायचं ठरलं होतं त्यांचं. ठरल्याप्रमाणेच अजिबात एकमेकांना काॅल न करता... एकमेकांशी काॅन्टॅक्ट करायचा बिलकूल प्रयत्न न करता, दोघेही आले होते... आणि एकमेकांना बघून बावचळलेही होते. दोघेही पन्नाशीच्या आसपास... त्याची दाढी वाढलेली... तिच्या डोळ्यांवर चश्मा आलेला... पण आता पुर्वीसारखा तिचा हात आपसुकच केस सावरायला गेला नव्हता... की त्याचाही, शर्ट नीट ईन झालाय की नाही ते चेक करायला... गौण होतं त्यांच्यासाठी आता आपापलं दिसणं... महत्वाचं होतं ते फक्त तिथे, त्यावेळी एकमेकांचं असणं.*

*खूप गप्या मारल्या दोघांनी... अगदी त्यांच्या आयुष्यातल्या 'मांडू' फेजपासून ते फक्त 'भांडू' फेजपर्यंतच्या... खूप जुन्या आठवणी, जुने किस्से, आणि निघतांनाची, निरोप घेतांनाची एक जुनी मिठी. तिचा नवरा आला साधारण तीन तासांनी तिला न्यायला... नवर्‍या बरोबर चालत जाणार्‍या तिच्या पाठमोर्‍या आकृतीकडे बघत राहिला तो... स्वतःच्या भरल्या डोळ्यांना दुषणं देत, तिची पाठ दिसेनाशी होण्याआधीच धुसर केल्याबद्दल.*

*"तरी मी तुला सांगत होतो की तो नाही येणार म्हणून... ऊगिच तीन तास मुर्खासारखी वाट बघत बसलीस त्याची, त्या बाकड्यावर... लांबून लक्ष ठेऊन होतो मी... वेड्यासारखी एकटीच बोलत काय होतीस, हसत काय होतीस, हातवारे काय करत होतीस... जाणारे - येणारे सगळे बघत होते तुझ्याकडे... पण मी म्हंटलं जाऊ दे... होऊ दे तुझ्या मनासारखं एकदाचं... म्हणून मग तू सांगितल्याप्रमाणे तीन तासांनीच आलो तुला न्यायला... अगं कोण येणार असं एक्स बायकोला भेटायला?... काही सेल्फ रिस्पेक्ट आहे की नाही?... मी असतो त्याच्या जागी, तर मी ही नसतो आलो... अगदी मेलो असतो पण आलो नसतो".*

*एवढं बोलून तिचा नवरा चरफडतच, पुढे टॅक्सी शोधायला गेला. आता ती घळाघळा रडू लागली होती... तोंडावर हात ठेऊन, अनावर झालेले हूंदके आवरु लागली होती... एव्हाना तिला कळून चुकलं होतं सारं... कीव येत होती तिला तिच्या आत्ताच्या नवर्‍याची.*

*"हाच बहुतेक फरक होता त्याच्यात नी तुझ्यात... ठरल्याप्रमाणे, ठरल्याजागी 'तो' मेल्यावरही आला... मनःस्वीपणा आजही तस्साच आहे त्याचा, तो जळला नाही म्हणायचा बरोबरीने... हो थोडा रसिकपणा वाढलाय खरा".*

*वैतागल्या चेहर्‍याने टॅक्सी, टॅक्सी ओरडणार्‍या... नी तिच्याकडे आता अजिबात लक्ष नसलेल्या, नवर्‍याकडे बघून ती बोलली हे... 'त्या' ने मघा मारलेल्या मिठितून, तिच्या अंगावर चिकटलेला... 'Calvin Klein' चा वेडावणारा गंध श्वासात भरुन घेत... कबुल करत मनाशी स्वतःच्या...*

*"निर्णय चुकला खरा आपला".*

*सचिन श देशपांडे.*
🌀🌀🌀🌀🌀🏵️🌀🌀🌀🌀🌀

टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
 सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

मस्त आयुष्य जगण्याचा स्वस्त फंडा - एक मजेशीर गणित

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

निसर्ग किमया कि देवता ... Mother Nature

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

फक्त व्यक्त व्हायला शिका...

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...