भाऊबीजेची कथा...

🔸भाऊबीजेची कथा.🔸

सूर्याला दोन अपत्य होती. मुलाचे नाव यम आणि मुलगी यमुना अशी त्याची नावे होत. सूर्याच्या मुलीचे म्हणजेच यमुनेचे लग्न झाल्यावर यम हा आपल्या बहिणीला सासरी भेटायला खूप कमी जात असे. यमाला माहीत होते की तो मृत्यूची देवता आहे म्हणून आपल्या बहिणीच्या संसारावर आपली काळी सावली पडायला नको आणि तिच्या वर कोणतेही संकट यायला नको आणि म्हणूनच तो बहिणीकडे जाण्यास टाळाटाळ करायचा. यमुनेच्या सासरच्या लोकांनाही यमाचे त्यांच्या घरी येणे अजिबात आवडत नव्हते, पण यमुनेच्या मनात मात्र भावाबद्दल वाटणारी ओढ तिला स्वस्थ बसू देत नव्हती लहानपणापासून एकत्र राहिलेले, पण त्यानंतर असे अचानक भावाचा विरह तिला सहन होत नसे, आणि त्यामुळेच यमुनेचे यमाला खूप कळकळीची विनंती केली. त्यावेळी न राहून मात्र यमाला यमुनेला भेटायला जावेच लागले. ज्या दिवशी यम यमुनेच्या सासरी तिला भेटायला गेला, तो दिवस म्हणजेच कार्तिक शुध्द द्वितीया होय..!! यम बहिणीच्या घरी गेल्यावर यमुने नेे त्याचे अगदी आनंदाने आदरतिथ्य केले. पाटावर बसवून त्याला ओवाळले..! यमानेही बहिणीसाठी साडी, चोळी, अलंकार अनेक भेटवस्तू तिला दिल्या आणि म्हणाला, यमुने माग अजुन काय हवं आहे तुला तुझ्या भावाकडून! तेव्हा यमुना म्हणाली "मला तर कसली कमी नाही, नको धन नको आणखी काही पण तू दरवर्षी याच दिवशी मला भेटायला येत जा..! आणि हो, या दिवशी जी कोणी बहीण भावाला ओवाळेल त्या तिच्या भावावर तुझी नजर पडू देऊ नको ..! त्यांचे मृत्यू पासून संरक्षण करावे." यमाने यमुनेला तथास्तु म्हटले, आणि म्हणूनच या दिवशी सगळीकडे भाऊबीज साजरी करतात. या दिवशी बहीण भावाला ओवाळत आपल्या भावावर कोणत्याही प्रकार चे संकट येऊ नये आणि आलेल्या संकटापासून त्याचे रक्षण व्हावे हाच यामागील उद्देश होय.
❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄

टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
 सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

कविता : महात्मा गांधी

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...