बहिर्जी नाईक
बहिर्जी नाईक
दहा दहा दिवस अन्न पाण्याशिवाय राहतो, तर महीना महीना भर एकाच झाडावर दबा धरुन बसतो...!
धावायला लागला तर वाऱ्याच्या कानफाटीत मारल्यासारखे धावतो, पुराच्या डोहात खुशाल उडी मारतो...!
तलवार ,भाला ,फरीगगदा ,पट्टा ,विट्टा ,धनुष्य असे काही चालवतो कि समोर महासागर येऊदे शत्रुचा...!
शत्रुच्या राणीवशात जाऊन राहु शकतो,तर खुद्द औरंगजेबाच्या दरबारात जाऊन त्यालाच कव्वाली ऐकवुन बक्षीस घेऊन येऊ शकतो...!
माणुस म्हणाल तर एकही माणसाचा गुण नाही , जनावर म्हणाल तर दिसतो माणसासारखा...!
मोठमोठ्या गोष्टीत अचुक निर्णय , सावध नियोजन आणि स्वत:च्या देखरेखीखाली प्रत्यक्ष घोडदौड...!
हा बहीर्जी नाईक जणू शिवाजी महाराजांचा तिसरा डोळाच होता...! आणि शिवराय त्याला इतके मानतात की महाराजांच्या राणीवशात एकमेव जिजाऊ माँसाहेब सोडुन कोणी विना परवाना जाऊ शकत असतील तर ते म्हणजे बहिर्जी नाईक...!
महाराजांचा नाईकांवर इतका विश्वास कि हा माणुस चुकुन सुद्धा चुक करु शकणार नाही इतका द्रुढविश्वास...!
पाची पातशाहींना रणांगणात चारी मुंडी चित करुन जेव्हा महाराज राज्यभिषिक्त झाले तेव्हा सुद्धा बहीर्जी नाईक समोर येऊ शकत नव्हते ईतकी गुप्तता पाळत होते नाईक....!
महाराजांचा अभिषेक सुरु होता महाराज मुक्त हस्ताने गरीब फकिराना ओंजळ भरभरुन द्रव्य दान देत होते आणि एक म्हातारा फकिर त्या रांगेत ऊभा होता...!
जक्ख म्हातारा हुंदके देऊन रडत होता आणि डोळे भरुन महाराजांना पाहत होता .... महाराजांनी जेव्हा त्या फकिराला पाहीले तेव्हा मात्र त्यांच्या अश्रुंचा बांध फुटला...!
ओठावर मिश्या नव्हत्या तेव्हापासुन बहीर्जी आणि मी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहीले... आणि आज मराठेशाही स्थापन होत आहे , राज्य आनंदात आहे, आणि ज्याने आजवर सारी संकटे आपल्या छातीवर झेलली तो बहीर्जी फकिर होऊन याचकांच्या रांगेत ऊभा आहे...! काय बोलावे या प्रकाराला...! कसली वेडी माणस असतील ती...!
एका मंदीराला फरशी दान दिली की साऱ्या घराण्याची नाव टाकणारे तुम्ही आम्ही, त्या बहीर्जी च्या काळजाला कधी समजु शकु का ...? स्वत:च्या बायकोला देखील अगदी शेवटपर्यंत माहीती नव्हते की ज्याच्यासोबत मी सात जन्मांचे बंधन बांधले आहे ...तो खुद्द स्वराज्याचा गुप्तहेरप्रमुख बहीर्जी नाईक आहे... इतकी कमालीची गुप्तता...!
आणि एवढा विलक्षण त्याग करुन राजे त्यांना देत तर काय होते ओ...? काहीच नाही... उलट प्रत्येक मोहीमेत जीवाचा प्रश्न... माघारी येईल का नाही शाश्वती नव्हती ...!
ही वेडी खुळी माणसे अशी का जगली असतील ??
बस्स एवढ्या एका प्रश्नाचे उत्तर ज्याला मिळाले त्याच्या आयुष्याचं सोन झाल्याशिवाय राहणार नाही..!!
(लेखक: अज्ञात. कोणाला लेखकांचे नाव ठाऊक असेल तर नक्की कळवावे..!!)
_______________________________________
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा